कोणा एका यात्रेकरुने सुंदराबाईस काहीही न देता महाराजास दोन पेढे खाण्यास दिले इतक्यात बाईची नजर तिकडे गेली त्या यात्रेकरुकडे ती पूर्वी पैसे मागत होती ते त्याने दिले नाहीत म्हणून तिचा त्या यात्रेकरुवर राग होता तिने महाराजांजवळ जाऊन त्यांचा गळा धरत म्हणाली नाही पेढा खायचा त्यावेळी महाराज म्हणाले चोळ्या रांडेला मस्ती फार आली.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

महाराजांनी अगोदरच चोळाप्पाला सुंदराबाई डोक्यावर मिरे वाटील म्हणून बजावले होते येथे चोळाप्पा हे साध्या सुध्या भोळ्या सरळ मनाचे प्रतीक आहे सुंदराबाई ही लोभी स्वार्थी मत्सरी अधिकार गाजवणारी कुवासनांचे मूर्तिमंत प्रतीक आहे तर श्री स्वामी हे विवेकाचे प्रतीक आहे सदगुरु स्वरुप विवेकाने या वासनेला थारा देऊ नको असे मनाला अगोदरच बजावले होते पण साध्या भोळ्या सरळ मनाने विवेकाच्या या महत्त्वपूर्ण सूचनेकडे दुर्लक्ष करुन वासनेला जवळ केले तिच्यावर विवेकाच्या सेवेच्या काही जबाबदाऱ्याही सोपविल्या मुळातच जहांबाज कजाग असणाऱ्या वासनेच्या सर्वांवरच अंमल सुरू झाला तिचाहा अंमल सर्वांनाच त्रासदायक ठरु लागला पुढे पुढे तर या वासनेची मुजोरी इतकी वाढली की ती विवेकावरही अंमल वा अधिकार गाजविण्याचा प्रयत्न करु लागली म्हणजे श्री स्वामी समर्थांवर अशाच एका प्रसंगी एक यात्रेकरू श्री स्वामींसाठी भक्ती भावाने पेढे घेऊन येतो श्री स्वामींनी ते स्वीकारावेत असे त्यास मनोमन वाटत असते पण वासनारुपी सुंदराबाई त्यास आडकाठी करते लोभी वृत्तीच्या सुंदराबाईस यात्रेकरुंकडून पैसे हवे होते प्रत्यक्ष परब्रम्ह श्री स्वामी समर्थांपेक्षाही तिला पैशाचा मोह अधिक होता पैसे मिळत नाहीत हे बघताच तिला संताप येऊन पेढे देण्यास त्या यात्रेकरुस ती मज्जाव करते परंतु तो यात्रेकरू त्या कजाग लोभी वासनारुपी सुंदराबाईस न जुमानता श्री स्वामींस पेढे देण्यात यशस्वी होतो हे तिच्या लक्षात येताच वासना विवेकाचा (श्री स्वामींचा) गळा आवळून पेढा नाही खायचा असे दरडावून मग्रुरीच्या भाषेत बोलते तेव्हा काहीसे तटस्थतेने वा अलिप्तपणे वासनेने पूर्णतः माखलेल्या सुंदराबाईकडे श्री स्वामी बघत होते याचा अर्थ तिच्या जुलूम जबरदस्तीचा अतिरेक आणि मग्रुरी त्यांना मान्य होता असे नव्हे म्हणूनच ते म्हणतात रांडेला मस्ती फार आली आहे श्री स्वामींच्या या कठोर उदगारांची सर्वांनाच जाणीव होते की आता सुंदराबाईचे काही खरे नाही एक ना एक दिवस तिला येथून जावेच लागणार आणि झालेही तसेच योग्य वेळ येताच श्री स्वामी तिची हकालपट्टी करतात विवेक वासनेला निर्धाराने दूर सारतो सुंदराबाईचे या लीलेतील पात्र आपणास बरेच काही प्रबोधित करते.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या