एकदा महाराज अक्कलकोटाबाहेरील असलेल्या श्रीरामचंद्राच्या देवालयात एक प्रहरापर्यंत बसले तेथून ते आंब्याच्या वाडीत एका आंब्याच्या झाडाच्या सावलीत जाऊन बसले त्यांच्या मागून सर्व सेवेकरी मंडळीही तेथे गेली सेवेकर्यांनी श्री स्वामींना प्रार्थना केली की महाराज येथे काहीच भोजनाची तयारी नाही व वार्याने दिवाही राहत नाही काय करावे करिता श्री स्वामींनी कृपा करुन अक्कलकोटात चलावे तेव्हा समर्थ म्हणाले कन्या येणार आहेत हा वाक्यार्थ कोणासही कळेना तेव्हा समर्थ म्हणाले चोरांपासून मंडळीचे निवारण व्हावे म्हणून चार भुजंग तुमच्या रक्षणास ठेविले आहेत असे सांगून महाराज निद्रिस्त झाले सेवेकरीही झोपले सुमारे मध्यान्ह रात्रीच्या समयास काही चोर सामान नेण्याकरता आले सामानास हात घालीत आहेत तोच चार मोठे भुजंग धावत येऊन चोरांचे मागे लागले भुजंगास पाहून चोर पळू लागले चोरांची चाहूल लागल्यामुळे सर्व सेवेकरी जागृत झाले दिवे लावून पाहतात तो महाभुजंग सर्वांस आश्चर्य वाटले व चोरही पळून गेले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलेत श्री स्वामी समर्थांचे आंब्याच्या वाडीत जाणे सेवेकर्यांचेही त्यांच्या मागोमाग जाणे भोजनाची व्यवस्था नाही दिवाही राहत नाही हे सांगणे कन्या येणार आहे याचा कुणासही अर्थ न कळणे चोरापासून संरक्षण म्हणून चार भुजंग सर्व सुरक्षित वरकरणी साध्या सोप्या वाटणाऱ्या श्री स्वामी समर्थांच्या या लीलेतून फार मोठा प्रबोधन आशय व्यक्त झाला आहे ते आंब्याच्या वाडीत जाऊन बसले सेवेकरीही बरोबर होतेच ते मात्र म्हणू लागले तेथे भोजनाची काहीच तयारी नाही ही लीला संधिकाळात घडली कारण वार्याने दिवाही राहत नाही अशी सेवेकर्यांची तक्रार होती खाण्या पिण्याचाच विचार करणाऱ्यांना कन्या येणार आहेत या श्री स्वामींच्या उदगाराचा बोध होत नव्हता कसा होणार येथे खायला नाही प्यायला नाही चला अक्कलकोटला असा सततचा लकडा सेवेकर्यांनी श्री स्वामींमागे लावला होता पण श्री स्वामी तर हेतूपूर्वक संध्यासमयी येथे मुक्काम ठोकून बसले होते त्यांची अवज्ञा कोण करणार श्री स्वामींच्या या कृतीचा मथितार्थ काय निर्गुण संध्यासमयी कोणत्याही प्रकारच्या विषयांच्या उपभोगास मुळीच स्थान नसते आणि येथे विषयांचा उपभोग न मिळणे हीच उपासमार सर्व सेवेकरी म्हणजे इंद्रिये उपासमारीच्या भीती पोटीच सर ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये चुळबुळत होती अस्वस्थ होती म्हणूनच ती सारी मंडळी आंब्याची वाडी म्हणजे परमार्थ अध्यात्म सोडून आपल्या मूळ प्राकृतिक स्वरुपाकडे म्हणजेच घर प्रपंचाकडे वळण्याची घाई करीत होते पण श्री स्वामी ऐकण्यास तयार नव्हते त्यांनी सर्वांना दक्ष राहण्याची सूचना दिली मध्यरात्री चोर येतील आणि तुम्हाला नागवतील म्हणून तुमच्या संरक्षणासाठी चार भुजंग ठेवले आहेत हे चार चोर म्हणजे 

  • १) कषाय = विषय सेवन
  • २) लय = निद्रा
  • ३) आवरण = अज्ञान विक्षेप भ्रम भय आदींचे बुद्धीवरील आवरण म्हणजे अज्ञान 
  • ४) रसास्वाद आत्मसंतुष्टता 


हे ते चार चोर होत हेच चार चोर कर्मेंद्रियांना व ज्ञानेंद्रियांना नागवतील हे जाणूनच श्री स्वामींनी अध्यात्म सत्संग वासना त्याग अथवा वासना नियंत्रण आणि प्राणायामाचा राजयोग हे चार भुजंग इंद्रियांच्या रक्षणासाठी ठेवले आहेत या विघ्नरुपी चोरांनी मध्यरात्री म्हणजे अज्ञान = अविद्येच्या तामसी अवस्थेत इंद्रियावर डाका घालताच या चार भुजंगांनी त्यास पळवून लावले या भुजंगापुढे या विघ्नांचा टिकाव लागणे शक्यच नाही तेव्हा आपण साधक उपासक सेवेकरी भक्त आदींनी दररोजच्या जीवनात वावरताना आचार विचार आणि व्यवहार करताना वरील कषाय लय आवरण आणि रसास्वाद या चार चोरांपासून सतत जागरुक राहवे हाच या लीलाकथेतून अर्थबोध घ्यायचा आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या