वरील लीला भागात आलेले संन्याशाचे नम्र भाषण ऐकून भक्तवत्सल दीनानाथ दत्त दिगंबर म्हणाले जाव हमारे माहूरगड में मजे में चूप बैठे रहो त्यावर तो संन्यासी उत्तरला अच्छा गुरु आप परमात्माकी आज्ञा सर्वथा सिरपर मान्य है एवढे बोलल्याबरोबर श्री स्वामींनी त्याच्या अंगावर भगवी छाटी व मृगजिन फेकले ते घेऊन तो माहुरगडी आला तेथे दत्तगुरुच्या स्थानावर मृगजिनावर अक्कलकोट स्वामींना पाहून त्याने साष्टांग दंडवत घातले श्री स्वामींची किमया व सर्व व्यापकता त्यास अनुभवास आली तो त्याच्या सोने करण्याच्या पूर्व किमयेचा धिःक्कार करु लागला आपण येथे सुखानंदात आहोत वामनबुवांस ते पूर्ण गुरुभक्त असल्याचे त्याने लिहून कळविले.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

पश्चात्तापदग्ध झालेल्या किमयागार संन्याशाच्या वामनबुवास लिहिलेल्या पत्राचा हा अंश आहे श्री स्वामींचा हुकूम शिरसावंद्य मानावयास तो तयार झाला यावरुन श्री स्वामी महाराजांचे त्याच्यावर किती प्रभावी गारुड झाले होते याची कल्पना येते श्री स्वामींच्या आज्ञेनुसार तो माहुरगडाला आलातर दत्तगुरुंच्या स्थानावर मृगाजिनावर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ बसलेले त्याने पाहिले श्री स्वामी अक्कलकोटातही होते आणि माहुरगडावर दत्तप्रभूंच्या स्थानावरही होते दत्तप्रभू आणि श्री स्वामी समर्थ एकच आहेत याची त्यास प्रचिती आली हे सर्व अचंबित करणारे होते आजपर्यंत तो प्राप्त झालेल्या सिद्धीचा दुरुपयोग करीत होता आता त्याला त्याची चूक कळून आली होती त्याला आता पश्चात्ताप झाला होता पश्चात्तापा सारखी दुसरी शिक्षा नसते श्री स्वामींनी नाशिकच्या गंगा नदीच्या काठापासून अक्कलकोट आणि अक्कलकोटपासून माहुरगडापर्यंत त्याच्या मानसिक स्थितीत आणि वृत्तीत मोठे विलक्षण बदल क्रमाक्रमाने घडवून आणले होते यातून श्री स्वामींची एखाद्यात परिवर्तन करण्याची लीला अथवा किमया अभूतपूर्व असल्याचे आढळून येते तोच किमयागार संन्याशी त्याच्या पूर्व किमयेचा धिक्कार करु लागला खरी किमया जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंतच खोट्या किमयेची किंमत आहे असे त्याला आता निःसंशय वाटू लागले होते तुम्हा आम्हालाही तसे वाटू लागण्यात कोणतीच हरकत नसावी.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या