एकदा कलकत्त्यातून एक गोरा बॕरिस्टर एका पारसी गृहस्थासह अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून दर्शनास आला त्यांना महाराजांस बरेच प्रश्न विचारावयाचे होते श्री स्वामींचे दर्शन घेऊन खाली बसले श्री स्वामींच्या तोंडाकडे पाहून ते दोघेही दिपून गेले आणि एकच काय तो प्रश्न त्यांनी केला आपण कोठील त्यावर श्री स्वामी उत्तरले आम्ही प्रथम कर्दळीवनातून निघालो पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिले बंगालादेश हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले नंतर गंगातटाकाने फिरत फिरत हरिद्वार केदारेश्वर गंगोत्री बद्दीनारायण द्वारका अयोध्या वगैरे हजारो तीर्थे पाहून गोदातटाकास आलो मग हैद्राबाद मंगळवेढ्यास बरीच वर्षे होतो मग पंढरपूर बेगमपूर व मोहोळास आलो तेथे काही दिवस राहून अक्कलकोटास आलो तो येथेच आहोत असे साहेबास सांगितले.


अर्थ भावार्थ मथितार्थ

आपण कोठील ही गोरा बॕरिस्टरने तेव्हा श्री स्वामींस विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अद्यापही निश्चित स्वरुपात मिळालेले नाही त्यांच्या प्रकटीकरणाचे गूढ अद्यापही कायमच आहे अद्यापही त्याबाबत मतमतांतरे आहेत आपल्या आवाक्यात आपल्याला जेवढे जमेल जेवढे झेपेल त्यावरच समाधान मानणे तूर्तास भाग आहे आपण कोठील शक्य तितके परंतु तरीही संदिग्ध उत्तरे श्री स्वामींनी दिली पण जेव्हा खोदून खोदून त्यांना विचारले जात असे तेव्हा ते टाळक्यात पायपोस अशा भाषेत दरडावित असत श्री स्वामी समर्थांच्या वरील दोघा अधिकारी शिष्यांची शक अथवा इसवीसन सोडला तर स्थळ मास तिथी वर्षे इत्यादीबाबत एकवाक्यता आहे याचा अर्थ त्यांच्या वयोमर्यादेचे गूढही कायम आहे पण शके अथवा इसवी सनाचा मुद्दा गौण आहे ते अक्कलकोटात अश्विन शुद्ध पंचमी शके १७७९ (२३.९.१८५७) मध्ये अवतरले हे तर वास्तव सर्वज्ञात आहे त्यावेळी चोळाप्पाला पाहाताच ते म्हणाले.

"चोळ्या तू सुखरुप आहेस का !
कारे भुललासि मायबाप आचार्य !
तू रामचंद्र सराफ तनय !
पूर्व भक्त आमचा !!१७१!!
अक्षय वटवृक्षीचा विहार !
विसरलासी मुळपुरुष दत्तनगर !
ऐकोनि उमजला चोळा पूर्वसमाचार !
साष्टांग नमस्कार करीतसे !!१७२!!
(श्रीगुरुलीलामृत अ.१९)


याचा अर्थ त्यावेळचा विजयसिंग हा चोळाप्पाच होता श्री स्वामींनी त्यास जुन्या खेळाचे स्मरण करुन दिले असे श्री स्वामी समर्थांच्याबाबतीत आपण कोठील या प्रश्नांची उत्तरे विविध व सर्वच गूढरम्य आहेत पण या परब्रह्याचे अवतरण आणि पृथ्वीवर विविध ठिकाणी परिभ्रमण झाले हे वास्तव आहे त्यामुळे त्यांच्याबाबत ते नेमके कोठील हा प्रश्न अनुत्तरितच आहे या प्रश्नाचे श्री स्वामींनी वेळोवेळी दिलेली उत्तरे पेलण्याचे सामर्थ्य मानवी आवाक्यातले दिसत नाही म्हणून आपल्या हाती जेवढे गवसले आहे त्यावर समाधान मानणेच सध्यातरी इष्ट आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या