सर्व सेवेकर्यांसह श्री स्वामी समर्थांची स्वारी थोरल्या मणूरातील यल्लम्माचे देवळात उतरली त्यावेळी येथे महामारीचा उपद्रव फार होता इतका की रोज दहा पंधरा माणसे महामारीने मरत गावच्या पाटलांनी श्री स्वामींकडे येऊन प्रार्थना केली की महाराज माझा मुलगा हनुमंत हा शरपंजरी पडला आहे त्याचा घटकेचा भरवसा नाही तरी श्री स्वामींनी कृपा करुन मुलास गुण द्यावा गावातील इतर लोकांनीही रडून रडून आकांत मांडला होता आप्पा पाटलाच्या मुलाचा प्राण जाऊ लागला तेव्हा पाटील श्री स्वामी चरणावर येऊन कोसळले तेव्हा चोळाप्पा समर्थांस म्हणाला महाराज हा प्रसंग आम्हास पाहवत नाही लवकर देवळात चलावे मुलगा निरोप घेऊन चालला आता येथे बसणे चांगले नाही समर्थ म्हणाले त्यास कोण निरोप देतो कडुनिंबाचा पाला मुलाच्या सर्व शरीरास लावा आणि पाण्यात वाटून तोंडात घाला अशी श्री स्वामींची सूचना ऐकून पाटलाने कडुनिंबाचा पाला आणून अंगास लावला व तोंडात घातला त्यासरशी मुलगा चलन वलन करु लागला सर्वांना आनंद झाला दुसरे दिवशी पाटलाने श्री स्वामींची षोडशोपचारे पूजा करुन सर्व सेवेकर्यांस भोजन घातले दुसरे दिवसापासून समर्थ कृपेने गावातील महामारीचा उपद्रव बंद झाला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीला भागात श्री स्वामी समर्थ सेवेकर्यांसह थोरल्या मणूरला पोहोचले तेव्हा महामारीच्या (पटकीच्या) रोगाने गावात थैमान घातले होते दररोज दहा पंधरा माणसे दगावत होती सर्व गावच भयभीत झाला होता तेव्हा आताच्या सारख्या रोगावर नियंत्रण मिळविणार्या सोयी सुविधा व औषधोपचार नव्हते लोक महामारीच्या रोगापुढे हतबल झाले होते श्री स्वामी समर्थांचे त्या गावात यल्लमा देवीच्या मंदिरात उतरणे हाच मोठा दिलासा आधार होता गावाच्या आप्पा पाटलांचा मुलगा हनुमंता हाही महामारीच्या रोगाच्या तडाख्यात सापडला होता पाटील श्री स्वामींकडे येऊन मुलास वाचविण्याबद्दल विनवित होते गावभर निर्माण झालेल्या महामारीच्या हाहाकारामुळे गावकर्यांनी रडूनरडून आकांत मांडला होता हनुमंताची अखेरची अवस्था पाहून चोळाप्पा श्री स्वामींस यल्लम्माच्या देवळात परतण्याविषयी सुचवित होता परंतु श्री स्वामी समर्थ हे तर तमाम रयतेच्या सुख दुःखात सदैव सामील होणारे त्यांचे दुःख यातना अथवा पीडा दूर करणारे त्या सर्वांनाच वार्यावर सोडून चोळाप्पाचे ऐकून यल्लम्माच्या देवळात येऊन स्वस्थ बसणे हे श्री स्वामींना रुचणारे नव्हते खेद याचा वाटतो की श्री स्वामींच्या निकट आणि सतत सेवेत राहणाऱ्या चोळाप्पास श्री स्वामींचा आचार विचार धर्म तत्त्वज्ञान आणि सामर्थ्य याचे कसे आकलन झाले नाही कसे होणार तोही तुमच्या आमच्या सारखाच घर प्रपंच असणारा एक साधा सुधा प्रापंचिक राग लोभ मोह माया मत्सर द्वेष यासारख्या षडरिपूत गुरफटलेला त्याला काय किंवा तुम्हा आम्हाला काय अनंतकोटी ब्रम्हांडनायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्री स्वामी समर्थ कसे कळावेत आपण सर्वच मर्यादित परिघात वावरणारे त्यांनी हनुमंताला तर वाचवलेच कसे ते सर्व लीलेत आले आहे परंतु महामारीग्रस्त थोरल्या मणूर गावालाही वाचवले सर्वांना आनंदीत केले ह्या लीलाकथा भागाचा अजूनही एक मथितार्थ आहे श्री स्वामी समर्थ सदेह अक्कलकोटात व आजूबाजूच्या पंचक्रोशित वावरत होते त्या मागासलेल्या काळातही अनेकांना बरे करीत होते गावा गावांना महामारी पटकी सारख्या महाभयंकर रोगापासून वाचवित होते सद्यःस्थितीतही निर्गुण निराकार स्वरुपात वावरणारे श्री स्वामी समर्थ अनेकांच्या वेदना दुःख अडीअडचणींचे निवारण करतात मैं गया नही जिंदा हूँ चा प्रत्यय आणून देतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठशी आहे हे ब्रीद खरे करुन दाखवतात पण कुणासाठी ते हे सर्व करतात जे शुद्ध निर्मळ निर्मोही वृत्तीचा आचार विचार आणि व्यवहार ठेवतात निष्ठापूर्वक त्यांची उपासना करतात हाच बखर क्र २५१/१ व २५१/२ या दोन्ही भागांचा मुख्य अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या