शिंपी मुला बाळांसह प्रसाद घेऊन महाराजां समोर बसला शिंप्यास समंध बाधा होती समंध शिंप्याच्या अंगात संचार करुन डुलू लागला आणि मस्ती करु लागला संन्याशास (श्री स्वामीस) असले खेळ कशास पाहिजेत म्हणून मोठमोठ्याने ओरडत नाचू लागला समंधाची ही कृती बराच वेळ चालली मादरचोदाच्या मुसक्या बांधा असे महाराज म्हणताच समंधाचे हात पाय लुळे होऊन तो खाली पडला नंतर महाराजांचे पाया पडून मी अनाथ आहे मजवर महाराजांनी कृपा करुन मजला गती द्यावी अशी प्रार्थना वारंवार करुन तो समंध श्री स्वामींच्या सारखा पाया पडे हे पाहून श्री समर्थांनी त्याच्यावर कृपा करुन त्यास गती दिली पुढे तो शिंपी महाराजांचा निरोप घेऊन आपले गावी परत गेला पुढे तो दर पौर्णिमेला अक्कलकोटास समर्थांची वारी करीत असे.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

त्या शिंप्यास समंध बाधा होती याची जाणीव त्याला नव्हती पण श्री स्वामी त्याबद्दल कसे अनभिज्ञ राहणार शिंप्याची समंध बाधा घालविण्यापूर्वी श्री स्वामींनी त्याच्याकडून अन्नदानाचे पुण्य करुन घेतले ५० लोकांच्या स्वयंपाकात ५०० माणसे जेवू शकली त्याच्या या पुण्यशील कृतीमुळे काही प्रमाणात का होईना समंध बाधित शिंप्याचे प्रारब्ध सौम्य झाले होते समंधाला नेहमी गती (म्हणजे पुढील अवस्था) हवी असते तशीच त्या शिंप्यामधील समंधालाही हवी असणारच प्रसाद भोजनानंतर समंधबाधित शिंपी श्री स्वामींपुढे येऊन बसला श्री स्वामी हे तर अशा समंधाचे कर्दनकाळ समंधाचा क्रोध श्री स्वामींना पाहताच उफाळून आला संन्याशास (श्री स्वामीस) असले खेळ कशास पाहिजेत म्हणून तो मोठमोठ्याने ओरडून नाचू लागला परंतु श्री स्वामी समर्थांचे दर्शनच इतके प्रभावी होते की त्यापुढे समंधाची मात्रा चालली नाही श्री स्वामी महाराज गरजले मादरचोदाच्या मुसक्या बांधा श्री स्वामी मुखातील वाक्य म्हणजे महामंत्र हे वाक्य ऐकताच त्या समंधाची स्थिती लुळी पांगळी झाली समंध पूर्णतः हतबल झाला त्याला ती अवस्था सहन होईना समंध श्री स्वामींची प्रार्थना करुन सारखा पाया पडू लागला श्री स्वामी तर कृपेचे सागर त्यांनी समंधावर कृपा करुन त्यास मुक्ती दिली त्या सरशी समंधबाधित शिंपी समंधातून मुक्त होऊन उठून बसला समंध मुक्त शिंप्याने त्याचे ऊर्वरित आयुष्य श्री स्वामी उपासनेत घालविले या लीलेचा मथितार्थ इतकाच की श्री स्वामी समर्थ सेवा कुणामध्येही अदृश्य स्वरुपात असलेली समंध बाधा अथवा पिशाच्च बाधेचे उच्चाटन करुन त्या व्यक्तीस मुक्त आनंदी व सुखी करत श्री स्वामी समर्थांच्या या सामर्थ्याबद्दल श्री गुरुलीलामृतात म्हटले आहे मंत्र -तंत्र-यंत्र-धूप-अंगारे-दोरे!अन्न वस्त्र फलादिक सर्व उतारे!न लगती पंचाक्षरी भूत काढणारे!द्रव्य घेणारे फसवूनि!!१३३!!अंगात आणणे बोलविणे!हे काहीच न लगे करणे!केवळ दत्तात्रेय स्वामिदर्शने!पिशाच्चादि पिवती सुगतीस!!१२३४!!"(श्री गुरुलीलामृत अ.४८ श्लो.१३३,१३४) ब्रम्हनिष्ठ वामनबुवा वाम्बोरीकरांनी श्री गुरुलीलामृतात केलेले वर्णन सद्यःस्थितीतही लागू पडणारे आहे ज्यांचे समंध भूत पिशाच्च प्रारब्ध आदीबाबत घोर अज्ञान आहे भोंदू साधू बुवा आदी अशा साध्या भोळ्या गरीब लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतात मंत्र-तंत्र-यंत्र-धूप-अंगारे-धुपारे आदींचा वापर करुन लुटतात हे सर्व आपण ऐकतो पाहतो वाचतो पण बोध काय घेतो श्री स्वामी समर्थांना अपेक्षित असलेली अंधःश्रद्धा वाढू न देणे ही सुद्धा श्री स्वामी समर्थ उपासनाच आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या