एके दिवशी सुंदराबाईचे आणि भुजंगाचे भांडण झाले ते तिला सहन न होऊन ती विहिरीवर जीव देण्यास गेली आणि पाण्यात पाय सोडून रडत बसली श्री स्वामींनी तिला आणण्यास दोन तीन सेवेकर्यांस पाठविले परंतु ती येईना तेव्हा महाराजांनी विहिरीवर जाऊन तिला परत आणले ती महाराजास सांगू लागली ब्राह्यणास वाण्याने मनास वाटेल तशा शिव्या द्याव्या काय महाराजांच्या दरबारात न्याय अन्याय काही नाही त्यावर श्रीसमर्थ तिला हसत हसत म्हणाले अग भिंतीला खुंट्या कोनाडे काय थोडे असतात तसेच आपल्या देहाला सर्व अवयव आहेत तर त्याने तुझ्या कोणत्या अवयवाला शिव्या दिल्या हे मला सांग हे ऐकून तिला जास्त राग आला


अर्थ भावार्थ मथितार्थ

सुंदराबाईच्या अप्पलपोट्या वृत्तीमुळे तिचे सतत कुणाशी ना कुणाशी भांडणे होत असेच एकदा तिचे व भुंजगाचे कडाक्याचे भांडण झाले माझ्याशी तो भांडला मला घाण घाण शिव्या दिल्या आणि हे सर्व पाहून ऐकूनसुद्धा महाराज एका शब्दानेही भुजंग्याला काही बोलले नाही की त्यास आवरले नाही असा त्रागा करीत ती जीव देण्यासाठी विहिरीवर गेली व विहिरीत पाय सोडून विहिरीच्या कठड्यावर बसली जीव देण्याचे तिचे हे नाटक सर्वज्ञानी श्री स्वामी समर्थ जाणून होते तरीही ते स्वतः तिला आणावयास गेले शेवटी महाराज तिची समजूत घालू लागले त्यावर ती त्यांनाच रडत रडत सांगू लागली भुजंगा वाण्याने एका ब्राह्यण स्त्रीस शिव्या दिल्या तुमच्या दरबारात काही न्याय आहे की नाही चोराच्या उलट्या बोंबासारखे तिचे हे बोलणे ऐकून त्यांना हसू आले तुझ्या कोणत्या अवयवाला कोणत्या शिव्या दिल्या असे तिला विचारताच ती रागे भरुन निरुत्तर झाली येथला मथितार्थ असा आहे की सुंदराबाई ही देहबुद्धीस्वरुप माया आहे श्री स्वामी हे विवेक स्वरुप सदगुरु आहेत ते अलिप्तपणे राहत असल्यामुळे मायेच्या कजागपणाला महत्त्वाकांक्षेला वर्चस्वाला आणि आक्रमकतेला मोकळे रान मिळाल्याने ती अनिर्बंध वागू लागली ती वर्णभेदाचा उल्लेख करुन भांडते ती देहत्यागाची भाषा करते पण विवेक स्वरुप सदगुरुस ठाऊक असते की तिची देह त्यागाची वेळ अजून आलेली नाही सदगुरु स्वरुप विवेक तिला देह त्यागापासून परावृत्त करुन परत आणतो आणि म्हणतो भिंतीला खुंट्या कोनाडे असावेत तसे देहालाही अवयव असतात त्यातील कोणत्या अवयवास शिव्या दिल्या ते तिला सांगता येत नाही सदगुरु स्वरुप विवेकाने घातलेल्या समजुतीने ती शांत होते देहात निरुपयोगी असे काही नाही देहबुद्धी जीवाच्या कर्ममोचनासाठी उपयोगी असते म्हणून तिचा दुःस्वास करु नये तिला दूषणे देऊ नये कारणापुरता तिच्याशी संबंध ठेवावा जेवढ्यास तेवढे जितक्यास तितके असे वर्तन असावे कोणत्याही इंद्रिय लालसेच्या शमवणुकीचा अट्टाहास नसावा वृथा त्रागा भानगड कटकटी करु नये हा इथला अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या