श्री स्वामी समर्थ एकदा चोळाप्पा श्रीपाद भट व अन्य सेवेकर्यांसह धाकट्या मणूर गावी आले भीमा नदीस मोठा पूर आला होता चोळाप्पा म्हणाला महाराज येथे भोजनाची काहीच तयारी नाही काय करावे समर्थ म्हणाले पलीकडे जायचे होते पण भीमेस महापूर आला आहे बरे नौकाही पलीकडच्यातिरी आहे पलीकडे जाऊन नौका आणतो कोण चोळाप्पा म्हणाला सांगती भोपळे नाहीत नौकेशिवाय पुरात उडी घालणे म्हणजे प्राण देणे समर्थ हसून म्हणाले जर आमचा लठ्ठेश्वर (श्रीपाद भट) पंडित जाईल तर नौका अवश्य घेऊन येईल श्रीपाद भटाने गुरू आज्ञा प्रमाण समजून समर्थ नामाचा जयजयकार करीत त्या भयंकर महापुरात उडी मारली सर्व सेवेकरी घाबरून समर्थांस म्हणू लागले महाराज श्रीपाद भटाचे रक्षण करा महाराज म्हणाले मरतो कशाने आता नौका घेऊन येईल पाहा श्रीपाद भटाने नामस्मरण करीत नदीच्या पलीकडे जाऊन नौका आणली नंतर समर्थांसह सर्व मंडळी पलीकडे थोरल्या मणूरास गेली.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थ सोबत असताना नदीला आलेल्या पुराचेच काय पण प्रत्यक्ष कळीकाळाचेही भय बाळगण्याचे कारण नव्हते बाळाप्पासह अन्य सेवेकर्यांनी पलीकडे जाऊन नौका आणण्याची असमर्थता दाखविली चोळाप्पाचे उदगार म्हणजे न जाण्याविषयीची सबब आहे श्री स्वामी समर्थांचा निःस्सीम भक्त मानल्या गेलेल्यांची ही स्थिती तर तुमच्या आमच्यासारख्या बद्दल न लिहिणेच योग्य पण श्री स्वामींना लठ्ठ्याबद्दल (श्रीपाद भट) पूर्ण भरोसा होता ते सर्वसाक्षी व त्रिकाल ज्ञानी असल्यामुळे त्यांना प्रत्येकाची आध्यात्मिक पात्रता ठाऊक होती म्हणूनच ते हसून म्हणाले आमचा लठ्ठेश्वर पंडित जाईल आणि नौका अवश्य घेऊन येईल झालेही तसेच श्रीपाद भटाने श्री स्वामींची आज्ञा प्रमाण मानून (खरे तर गुरू आज्ञा ही सर्व श्रेष्ठ असते एकलव्याने उजव्या हाताचा अंगठा क्षणार्धात कापून दिला गुरू आज्ञेमुळेच ना) श्री स्वामी समर्थ नामाचा जयजयकार करीत भीमा नदीच्या महापुरात उडी मारली श्री स्वामीं ळ श्रीपाद भटाच्या गुरुनिष्ठेची कल्पना नसलेले सेवेकरी मात्र घाबरून श्री स्वामींस श्रीपाद भटाचे रक्षण करण्याबाबत विनवित होते श्री समर्थांचे भक्कम संरक्षण कवच श्रीपाद भटास असल्यामुळे त्यांनी निःक्षून सांगितले मरतो कशाने आता नौका घेऊन येईल पाहा झालेही तसेच सदगुरु श्री स्वामी समर्थांच्या शिष्यावरील गुरुकृपेचे हे उदाहरण आपणास काहीच का प्रबोधित करणार नाही.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या