श्री स्वामी समर्थ अक्कलकोटात आल्यावर आपल्या गावात कोणी साधू आले असल्याची हकिकत श्रीमंत मालोजीराजाचे सेवकांनी राजास सांगितली राजांनी त्यास उत्तर दिले साधू खरे कशावरून म्हणावे आता त्यांनी दर्शन दिल्यास आम्ही त्यास खरे साधू म्हणू राजा इतके बोलण्याचा उशीर तो दिगंबर स्वामीराज राजापुढे येऊन उभे राहिले राजास मोठे आश्चर्य वाटले राजाने मनोभावे श्री स्वामींचे दर्शन घेतले पुढे काही वेळाने श्री स्वामी महाराज उठून गेले.



अर्थ भावार्थ मथितार्थ 

श्री स्वामी समर्थांनी आपले अवलियापण देवत्व गाव वेशीसमोर असलेल्या फाटकातील रिसालदार अहमद अली खानास दाखवले होते म्हणून त्याने मोठ्या उत्सुकतेने कोणी महान साधू अक्कलकोटात आल्याची हकिकत श्रीमंत मालोजीराजास सांगितली त्या सर्व सामान्य सेवकावर साधूच्या खरेपणाबद्दल कसा विश्वास ठेवणार पण अहमद अलीखानास साधूच्या खरेपणाचा अनुभव याचि देही याचि डोळा आला होता अजून तो राजास यावयाचा होता मालोजीराजांच्या दृष्टीने त्यांनी ऐकलेल्या पाहिलेल्या अथवा अनुभवलेल्या भोंदू साधू पैकीच हा देखील एक असावा त्याबद्दलच हा नोकर सांगत असावा नाही तरी नोकराची समज तरी काय असते असे राजास वाटणे साहजिक होते म्हणून श्रीमंत मालोजीराजे म्हणाले साधू खरे कशावरून म्हणावे आता त्यांनी दर्शन दिल्यास आम्ही त्यास खरे साधू म्हणू राजाच्या या संशयात शंकेत तशी काहीच चूक नव्हती काही गोष्टीस साक्षित्वाची पुराव्याची अनुभूतीची अथवा प्रचितीची आवश्यकता असते म्हणून राजाच्या या उदगारात तसे काही गैरही नव्हते सूक्ष्मातल्या सूक्ष्म संवेदना भावभावनांच्या शब्दांच्या बोलण्याच्या लहरी वा स्पंदने क्षणात पकडणार्या श्री स्वामी समर्थांना राजाचे बोलणे कळण्यास उशीर तो काय लागणार राजाचे बोलणे संपते न संपते तोच दिगंबर स्वामीराज दोन्ही कर कटेवर ठेवून पंढरपूरच्या भावमुद्रेत राजाच्या पुढे येऊन उभे राहिले राजा आश्चर्यचकित झाला दिव्यत्वाची त्यास प्रत्यक्ष प्रचिती आली आपोआपच त्याचे हात जोडले गेले श्री स्वामी समर्थांचे मंगल दर्शन त्याने घेतले थोड्याच वेळात स्वामी तेथून उठून गेले श्री स्वामींच्या सामर्थ्याची मालोजी राजांची शंका निरसन करणारी ही लीला आहे हे तेव्हा घडले आता सद्यःस्थितीत वरील लीलेसारखे जसेच्या तसेच घडण्याची अपेक्षा करणे गैर आहे पण पूर्वप्रारब्ध बलवत्तर असेल सेवाभावी वृत्ती असेल निर्मोही साधना असेल कोणत्या ना कोणत्या स्वरुपात श्री स्वामी समर्थ भेटणार दर्शन देणार कुणाच्याही माध्यमातून प्रसंग घटनांतून हा इथला अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या