एकदा नलदुर्ग गावी श्री स्वामी समर्थांची स्वारी सेवेकर्यांसह गेली असता निलेगावचे श्रीमंत भाऊसाहेब जहागीरदार नलदुर्गी आले श्री स्वामींना निलेगावी येण्याविषयी भाऊसाहेबांनी चोळाप्पा करवी प्रार्थना करविली तेव्हा श्री स्वामी म्हणाले शनिवारी येऊ जा नंतर महाराज अक्कलकोटी आले काही दिवसांनी श्री स्वामी सुमारे दोनशे सेवेकर्यांसह निलेगावी जाण्यास निघाले श्री स्वामींचे जंगी स्वागत करण्यात आले श्री स्वामींची षोडशोपचारे पूजा करण्यात आली तांदुळाच्या अक्षता श्री स्वामींच्या कपाळी लावण्यात आल्या त्यातील तांदळाचे तीन दाणे खाली पडले ते महाराजांनी घेऊन जहागीरदारांच्या पदरात घातले प्रसाद समजून तांदळाचा एक दाणा जहागीरदाराने खाल्ला व तांदळाचे दोन दाणे बायकोस खाण्यास दिले सर्वांचीच दान दक्षिणा देऊन यथेच्छ भोजने घालून उत्तम विडे देऊन चार दिवस मोठ्या थाटात श्री स्वामींचा स्वागतोत्सव साजरा करण्यात आला भाऊसाहेब जहागीरदारास संतती नव्हती भाऊसाहेबांनी चोळाप्पा करवी श्री समर्थांची प्रार्थना केली ती ऐकून महाराज म्हणाले तुला चांगला मुलगा होईल चार दिवस तेथे मुक्काम करुन पाचवे दिवशी श्री स्वामी अक्कलकोटी आले त्याच वर्षी भाऊसाहेबाच्या कुटुंबास गर्भ राहिला त्यांना एक मुलगा व दोन कन्या असे पाच वर्षाच्या अवधीत तीन अपत्ये झाली.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

निलेगावच्या भाऊसाहेब जहागीरदाराची श्री स्वामी समर्थांवर अनन्य निष्ठा व भक्ती होती श्री स्वामींचे व त्यांच्या समवेत असलेल्या सेवेकर्यांचे मनोभावे साग्रसंगीत आगत स्वागत करताना त्यांना मोठी धन्यता वाटत असे श्री स्वामींचे चार चार दिवस शाही आगत स्वागत ते करीत असत असेच एकदा नलदुर्गगावी श्री स्वामी समर्थ सुमारे दोनशे सेवेकर्यांसह आले तेव्हा भाऊसाहेबांनी चोळाप्पा करवी श्री स्वामी समर्थांची प्रार्थना केली की आमच्या निलेगावी येऊन ती भूमी महाराजांनी पुनीत करावी तेव्हा भाऊसाहेबांच्या मनातील भाव जाणून ते म्हणाले शनिवारी येऊ जा श्री स्वामींनी जेव्हा जेव्हा त्यांच्या एखाद्या वचनाला जोडून जा म्हटले आहे तेव्हा निश्चिंत राहा ती घटना घडणारच असा अर्थ होतो त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ नलदुर्ग गावी गेले असता भाऊसाहेबांनी त्यांचे जंगी स्वागत केले या लीला भागात आलेला उल्लेख तांदळाचे तीन दाणे खाली पडले ते प्रसाद समजून तांदळाचा एक दाणा जहागीरदाराने स्वतः व उरलेले दोन दाणे बायकोस खाण्यास दिले त्या जहागीरदारास संतान नव्हते श्री स्वामींना त्याने वा त्याच्या पत्नीने या अगोदर संतान नसल्याचे कधीच सांगितले नव्हते श्री स्वामींचे शाही आगत स्वागत आणि षोडशोपचार साग्रसंगीत पूजा करताना त्याचा तसा उद्देशही नव्हता तरीही श्री स्वामींच्या कपाळावर लावलेल्या तांदळाच्या अक्षतांतील तांदळाचे तीन दाणे खाली पडतात काय ते उचलून महाराज जहागीरदाराच्या पदरात टाकतात काय तो त्यातील एक व पत्नीस दोन दाणे देतो काय यातील घटना क्रमाचा मथितार्थ नीट समजावून घ्यावा हे सारेच अचंबित करणारे आहे चोळाप्पा करवी संतानप्राप्तीच्या संबंधी त्यांनी नंतर प्रार्थना केली पण तत्पूर्वीच श्री स्वामींचे त्यांच्या भक्तांच्या संतती बाबत केवढे हे नियोजन होते किती ही त्यांची भक्तवत्सलता पुढे यथावशकाश त्यातीन तांदळाच्या दाण्याचे फलित म्हणून भाऊसाहेबास एक मुलगा व दोन कन्या अशी तीन अपत्ये पाच वर्षांच्या कालावधीत झाली भाऊसाहेबाने खाल्लेल्या एका दाण्याचा मुलगा पत्नीने खाल्लेल्या दोन दाण्यांच्या दोन कन्या साधारण उपासकास अल्प स्वल्प कमी वेळेतील सेवेत खूप मोठी फलप्राप्ती हवी असते आपण सत्कर्माच्या रुपाने श्री स्वामीस इच्छित असलेलादानधर्म वा अन्य सेवा करतो का आपले देणे थोडे आणि घेणे मोठे असते हेच आपले चुकते मूळ बखरीतील भाऊसाहेब जहागीरदाराची लीला सविस्तर वाचली तर त्यांनी दानधर्म सेवेचा डोंगर उभारला होता नंतर स्वतः स्वामींकडे प्रत्यक्ष नव्हे तर चोळाप्पा करवी प्रार्थना केली होती आपण असे काही करतो का उपासनेत तितिक्षा प्रतिक्षा निरपेक्षता महत्त्वाची असते परमेश्वरास सर्व अगोदरच समजते योग्य वेळी तो आपल्या पदरात काहीना काही टाकतोच हे लक्षात ठेवावे हाच यातून बोध घ्यावा.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या