बंबगार्डन साहेबाजवळ एक सुंदरी नावाची वानरी होती पुढे काही दिवसांनी ही वानरी मनुष्यांच्या अंगावर धावून जाई व त्यांना चावे एक दोनदा ती साहेबाच्या अंगावरही चावण्याकरिता धावून गेली तेव्हा साहेबास राग येऊन त्यांनी वानरीला गोळी घालून ठार मारण्याचा हुकूम सोडला दोनचार लोक व शिपाई तिच्या पाठीस लागले ती पळत पळत येऊन खंडोबाच्या भिताडाच्या आड लपून राहिली हे भुजंगाने पाहिले त्याने स्वामीरायांची प्रार्थना करुन त्यांना सांगितले महाराज वानरीला शिपाई ठार मारीत आहेत तर तिला इकडे आणू काय महाराज म्हणाले घेऊन ये जा त्यानुसार भुजंगाने तिकडे जाऊन वानरीस सांगितले तुला स्वामी समर्थ बोलवित आहेत चल ये असे म्हणताच सुंदरी भुजंगाच्या पाठीमागून श्री स्वामींकडे निमूटपणे जाऊन त्यांच्या पायावर गडबडा लोळू लागली शिपाई व अन्य सर्व लोक हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले त्या वानरीला महाराज म्हणाले काय ग चावटे लोकांना चावतेस काय तुला मस्ती आली काय आजपासून कोणास चावू नकोस चावलीस तर लाख लाख कोरडे मारु यावर ती शांत झाली त्या दिवसापासून ती कुणासही चावली नाही जेथे जेथे श्री स्वामी महाराज जात तेथे तेथे ती जात असे कधी कधी माणसातही अथवा झाडावरही बसत असे महाराज कधी कधी आपल्या डोक्यातली टोपी तिच्या डोक्यात घालीत तर कधी कधी आपल्या गळ्यातील फुलांच्या माळा तिच्या गळ्यात घालीत असत तर कधी कधी त्यांना अर्पण केलेले पेढे तिला खाऊ घालीत असे त्यांचे खेळ तिच्या बरोबर चालत पुढे श्री स्वामी चरणाजवळच तिने देह विसर्जित केला मोठ्या थाटाने गुलाल बुक्का लाह्या उडवित नेऊन लोकांनी तिला समाधी दिली.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

या लीलेतील सुंदरी वानरी हा एक मुका पशू जीव श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादामुळे कसा उद्धारुन गेला तिच्या जीवनाचे कसे सोने झाले हे दर्शविणारी ही लीला आहे बंबगार्डन साहेबाच्या हुकूमानंतर तिचा मृत्यू निश्चित होता तिची पूर्व पुण्याई थोर म्हणून महाराजांचा सेवेकरी भुजंग तिला ठार मारले जाणार असल्याचे श्री स्वामींच्या कानावर घालतो योगा योगास फार महत्त्व असते हे अनेकदा घाई गडबडीत आपल्या लक्षात येत नाही पण योगा योगाने अनेकदा काही चांगल्या गोष्टी घडत असतात अशुभ घटनांचे निर्देश मिळतात त्यासाठी सदैव सत्कर्म सतकार्य सदविचार करावा लागतो आणि सतर्क राहावे लागते ती सुंदरी वानरीन खंडोबाच्या भिंती आड लपली श्री स्वामींनीच तिला तेथे लपण्याची बुद्धी देऊन त्या क्षणी मारेकरी शिपायापासून वाचवले तिला जीवदान दिले भुजंगाच्या माध्यमातून तिला महाराजांनी स्वतःकडे बोलविले तुला श्री स्वामी समर्थ बोलवित आहेत चला ये तिला हा श्री स्वामींचा निरोप समजणे तिने निमूटपणे भुजंगामागे श्री स्वामी चरणाशी येणे तेथे तिने त्यांच्या पायाशी लोळण घालणे सर्व घटनांचा मथितार्थ लक्षात घेता केवळ पूर्व सुकृतामुळेच श्री स्वामी महाराजांची कृपा तिच्यावर झाली एखाद्या चालत्या बोलत्या व्रात्य खोडकरास दरडावून बोलावे त्याप्रमाणे महाराज तिला म्हणाले काय ग चावटे लोकांना चावतेस काय तुला मस्ती आली काय आजपासून कोणास चावू नकोस चावलीस तर लाख लाख कोरडे मारु हे ऐकून ती शांत झाली पुढे तर ती एखाद्या व्रतस्थ संन्यासिणीसारखी महाराजां समवेत राहू लागली एका मुक्या व्रात्य चावणार्या वानरीमध्ये श्री स्वामींच्या शब्दाने नेत्र कटाक्षाने स्पर्शाने एवढा बदल होऊ शकतो मग आपण तर चालती बोलती माणसे आहोत यातून आपल्याला काहीच अर्थबोध घेता येणार नाही श्री स्वामी समर्थांच्या ह्या लीलेकडे केवळ चमत्कार म्हणून न पाहता श्री स्वामींचा कृपाशीर्वाद त्यांचा करस्पर्श नेत्रकटाक्ष अथवा त्यांच्या मुखातला एखाद दुसरा शब्द त्यांचे स्मरण दर्शन चिंतन मनन हे सर्व आपणास निश्चित आजही उद्धारक आहे असे निश्चित समजावे सद्यःस्थितीत ते सगुण स्थितीत आपल्या समोर नसतीलही परंतु निराकार स्वरुपात आजही ते आहेत मैं गया नहीं जिंदा हूँ ! ची प्रचिती अनेकांना देत आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या मनोबल वाढविणार्या श्री स्वामींच्या वचनाची प्रचिती घेत आहे पण यासाठी हवे शुद्ध पवित्र आचार विचार आणि व्यवहार.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या