सुंदराबाई उठत नाही असे पाहून फौजदार शिपायास म्हणाला पाहता काय बाईस ओढून बाहेर घालवून द्यावी असे म्हणताच शिपाई बाईचे जवळ आलेले पाहून तिने मोठा आक्रोश मांडला व ती मोठ मोठ्याने रडून म्हणे की आता मी दगडावर डोकं आपटून फोडून घेईन आणि प्राण देईन शिपाई धमकी देऊ लागले तेव्हा तिने महाराजांजवळ जाऊन त्यांचे पाय धरले आणि म्हणाली की महाराज आजपर्यंत माझे मुलीप्रमाणे पालन केलेत आणि आता माझ्यावर हा प्रसंग आला तर त्यांना आपण काही तरी सांगा महाराज फौजदाराकडे पाहून म्हणाले काय रे पाहतोस श्री स्वामींच्या या उदगाराने फौजदारासही धीर येऊन त्याने शिपायास सांगितले की अरे पाहता काय ओढा बाईला असे म्हणताच शिपायांनी तिला फराफरा ओढून बाहेर काढले आणि तिला सांगितले की खबरदार पुन्हा आत येशील तर नंतर फौजदाराने तिला सज्जड दमच दिला तुम्ही असा आक्रोश करुन डोके फोडाल तर तुम्हाला उचलून एकदम पिंजऱ्यात ठेविन हे ऐकताच तिचा निरुपाय झाला नंतर तिच्या सर्व जिनसा हरभरे तेल लुगडी छाट्या जोडे भांडी गुडगुड्या वगैरे आणखी काही सामान होते ते सर्व जप्त झाले त्यातील बर्फी पेढे खारका वगैरे जिन्नस कुजून गेले होते असा बराच माल निघाला.
अर्थ भावार्थ मथितार्थ
श्री स्वामी हे विवेक रुपी सदगुरुचे मूर्तिमंत स्वरुप आहे तर सुंदराबाई हे मोह ममता आसक्ती असलेल्या देहबुद्धीचे स्वरुप आहे श्री स्वामींनी तिला अनेकदा वेगवेगळ्या माध्यमातून सावध केले पण पालथ्या घड्यावर पाणी या म्हणीप्रमाणे तिच्या बाबतीत घडले बखरीमध्ये तिच्या संदर्भात केळकर बुवा म्हणतात (चिपळूण मठाचे संस्थापक) काही व्यक्तींची पूर्वपुण्याई जोपर्यंत असते तोपर्यंत कितीही अपराध झाले तरी त्या पुण्याईच्या जोरावर ते अविच्छिन्न चालतात आणि ते पूर्व पुण्याईचे गाठोडे संपले म्हणजे नाशास एक क्षणही लागत नाही श्री स्वामींनी ती त्यांच्या सेवेत चोळाप्पामार्फत येण्याअगोदरच चोळाप्पास सुस्पष्ट शब्दात सांगितले होते १) चोळ्या हिला ठेवू नकोस ही तुझ्या डोक्यावर मिरे वाटील बरे २) चोळ्या रांडेला मस्ती फार आली ३) काय गं रांडे तुझ्या बापाचे ते (सेवेकरी) नोकर आहेत काय ४) अग भिंतीला कोनाडे खुंट्या काय थोड्या असतात हे मला सांग ५) आजपर्यंत सुंदराबाईस आम्ही सांभाळले आता तुम्ही सांभाळा बरे आदि अनेक उदगारांवरुन श्री स्वामींची सुंदराबाईवर मर्जी खप्पा झाली होती तिला हुसकावून लावण्यासाठी नानासाहेब बर्वे कारभारी फौजदार यांनाही सांगितले काय रे असा हुकूम बजावतोस का काय रे पाहतोस या शब्दात त्यांनी कारभारी फौजदारास सांगितले होते येथे सदगुरु रुपी विवेक समतोलतेने आसक्त देहबुद्धीशी वर्तन करण्याचा प्रयत्न करतो सुधारण्यास सजग होण्यास संधीही देतो पण आसक्त देहबुद्धीची पुण्याई (सुंदराबाईची) जेव्हा संपते तेव्हा मग सदगुरुस्वरुप विवेक आपले चौदावे रत्न दाखवतो यावरुन श्री स्वामी हे अंशतः तिच्या कह्यात होते पण पूर्णतः मात्र कधीच तिच्या कह्यात नव्हते सुंदराबाईबाबत हे जे घडले यास तिच पूर्णतः जबाबदार आहे श्री स्वामी सहवासात राहून सतकर्म करीत सेवाभावी वृत्तीने ती वागली असती तर तिच्यावर ही नामुष्की आली नसती आपणसुद्धा यातून योग्य तो अर्थबोध घेतला पाहिजे अन्यथा सद्यःस्थितीत तिच्यासारखे आपणास कोणी पकडून नेणारही नाही तिच्यासारखी अवहेलनाही करणार नाही पण दुःख यातना जीवनाची फरफट मात्र अटळ आहे त्यावेळचे स्वरुप वेगळे आता वेगळ्या स्वरुपात शासन होण्याची शक्यता आहे हाच आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा अर्थबोध आहे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या