सोलापूरच्या सुंदराबाईच्या पायाला काही व्याधी झाली होती ती बरी व्हावी या हेतूने ती अक्कलकोटास आली पुढे ती श्री स्वामींची सेवा करण्यास तेथेच राहिली पुढे काही दिवसांनी चोळाप्पाची सेवा तिने पत्करली उदा.श्री स्वामीस स्नान घालणे भरविणे शौचास नेणे वगैरे परंतु महाराजांनी चोळाप्पास सांगितले हिला ठेवू नको बरे ही तुझ्या डोक्यावर मिरे वाटील पुढे काही दिवसांतच महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे सुंदराबाईचा पगडा चोळाप्पावर झाला तिला अतिशय धनलोभ झाला ती पैसे घेतल्याशिवाय यात्रेकरुस दर्शन घेऊ देत नसे बहुतकरुन महाराज तिच्या वचनात असत तिने महाराजास निजा म्हणून सांगितले की त्यांनी निजावे उठा म्हणून सांगितले की उठावे जेवा म्हणून सांगितले की जेवावे नको म्हणून सांगितले तर जेवू नये.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थांच्या इतर लीलांमध्येही सुंदराबाईचा या ना त्या कारणाने उल्लेख आलेला आहेच या लीलाभागात सोलापूरची असलेली ही सुंदराबाई पायाच्या व्याधीने पीडीत होती ती व्याधी अक्कलकोटचे स्वामी बरी करतील या हेतूने ती अक्कलकोटी आली पण तिचे प्राक्तन प्रारब्ध अथवा पुण्याई काहीही समजा पीडीत म्हणून आलेल्या या सुंदराबाईस श्री स्वामी समर्थांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले सुरुवातीस श्री स्वामींची ती जुजबी अल्पशी सेवा करायची चोळाप्पा हा साध्या भोळ्या सरळ स्वभावाचा होता त्याने त्याच्याकडे असलेल्या श्री स्वामींना शौचास नेणे स्नान घालणे भरविणे आदि सेवा तिच्याकडे दिल्या त्याला तिचा कावेबाजपणा तेव्हा लक्षात आला नाही पण महाराजांनी मात्र चोळाप्पास अगोदरच सांगितले होते चोळ्या हिला ठेवू नकोस बरे ही तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल सुंदराबाईच्या रुपाने दाराशी येऊन ठेपलेल्या व्याधीची आणि उपाधीची जाणीव चोळाप्पाला श्री स्वामींनी सुरुवातीसच करुन दिली होती करतेच ना सुंदराबाई काम तेवढाच आपलाही कामाचा भार हलका आणि आपणास कामातून थोडी मोकळीक उसंत असाही विचार चोळाप्पाने केला असावा आणि त्याने तिला सेवा करण्यास अनुमती दिली असावी आणि स्वतःस श्री स्वामी समर्थांची सेवा करण्याची संधी काही प्रमाणात गमावली श्री स्वामींनी सुरुवातीसच चोळाप्पास सुंदराबाईस ठेवू नकोस डोक्यावर मिरे वाटील असा स्पष्ट इशारा दिला होता त्यांच्या बोलण्याचा मथितार्थ त्याने गांभिर्याने घेतला नाही इथेच त्याची फसगत झाली होणारे न टळे कधी जरीही ये ब्रह्या तया आडवा असे जे वचन आहे तेच खरे जे घडायचे ते विधिलिखीत अटळ असते दिवसेंदिवस सुंदराबाईचे प्रस्थ श्री स्वामी दरबारी वाढत गेले सुंदराबाई ही मुळातच कमालीची लोभी कजाग दुष्ट मत्सरी प्रसंगी आपली पात्रता स्थान लक्षात न घेताही अधिकार गाजविणारी होती थोड्याच दिवसांत श्री स्वामी सेवेचा उन्माद ज्वर तिच्यात चांगलाच भिनला त्यामुळे ती महाराजांनी म्हटल्याप्रमाणे चोळाप्पाच्या डोक्यावर मिर्याच वाटू लागली महाराज अलिप्ततेच्या भावनेने मनोमन तिच्या अज्ञानाची व त्याच्या भोळसट वृत्तीची कीव करत तटस्थतेने सारे काही पाहत होते अनुभवित होते लीलेत उल्लेख आलेला आहे की श्री स्वामी तिच्या वचनात होते ती जसे सांगेल त्याप्रमाणेच ते वागत याचा अर्थ सर्वच बाबतीत ते तिच्या कह्यात होते असे मुळीच नाही जेवण झोपणे इत्यादी क्रियेबाबतच श्री स्वामींना तिच्या मर्यादा प्राक्तता आणि तिचे प्राक्तन सारे काही ज्ञात होते योग्य काळ वेळ येताच याच सुंदराबाईची त्यांनी हकालपट्टीही केली सुंदराबाई आणि चोळाप्पासारखी माणसे धार्मिक क्षेत्रावर बुवा बाबा बापू महाराज माउली यांच्या अवती भवती आजही आहेत फारतर त्याचे स्वरुप थोडे फार वेगळे असेल इतकेच.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या