- १) लीलाः श्री स्वामी महाराज अक्कलकोटास प्रकट झाल्यापासून अनेक सेवेकर्यांस अक्कलकोटास जाऊन सेवा करण्याविषयी गाणगापुरास दृष्टांत झालेले आहेत महाराज आनंदात असताना आपण कोण म्हणून त्यास प्रश्न केल्यास दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड म्हणून उदगार निघत शिवाय मूळ मूळ या प्रमाणे महाराज हमेशा उच्चार करीत असत (बखर १)
- २)लीलाः एकदा नरसोबाच्या वाडीची काही माणसे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आली त्यांनी श्री स्वामींस प्रश्न केला स्वामीन् आपण कोण आहात समर्थ म्हणाले मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे ऐकताच सोनारीण बोलली वटपत्रशाही मूळ पुरुष दत्तात्रेय रुपाने अवतरले आहेत.
अर्थ भावार्थ मथितार्थ
- १)दत्तनगर मूळपुरुष वडाचे झाड हे वंश सातत्याचे प्रतीक आहे ते प्रकृतीचे अक्षय रुप आहे मूळ पुरुष यात पुरु शब्दाचे अर्थ गाव अथवा वस्ती असा आहे नऊ दारे असलेले तुमचे आमचे मानवी शरीर हे ही एक गाव अथवा एक वस्तीस्थानच आहे आपल्या शरीराची ही नऊ दारे म्हणजे दोन डोळे दोन कान दोन नाकपुड्या एक तोंड एक गुद आणि एक लिंग योनी अशा या नऊ दारांच्या गावात म्हणजे पुरात शरीरात वस्तीला असलेला आत्मा हाच तो पुरुष होय हा आत्मा मूळ परमात्म्याचा अंशच असतो म्हणून आत्मा हा मूळ पुरुष होय ब्रह्या विष्णू महेश या त्रिवर्गाचे एकत्रित स्वरुप म्हणजेच मूळ पुरुष.
- २)दत्तनगर सरस्वती सोनारणीच्या उत्तरात दत्तात्रेय असा उल्लेख आहे दत्तात्रेय या मूळ पुरुषाचे म्हणजे परमात्म्याचे अंशात्मक स्वरुप सृष्टीवर आले पण त्याला राहण्यासाठी असंख्य योनी निर्माण झाल्या हे आत्मस्वरुप त्यात जीव म्हणून राहवयास गेले अशा या जीवाला राहावयाला वस्तीला दिलेले शरीर हेच नगर अथवा पूर होय ते दिलेले आहे म्हणून दत्त असे हे दत्तनगर आहे याच नगरात मूळ परमात्मा उत्पत्ती स्थिती लय (प्रलय) म्हणजेच ब्रह्या विष्णू महेश या दत्तात्रेय स्वरुपात अवतरल्या असा याचा अर्थ आहे
- ३)त्यानंतर मूळ मूळ अशी द्विरुक्ती महाराजांनी उच्चारली आहे एकदा सृष्टीची निर्मितीसाठी ते मूळ निर्गुण स्वरुप ब्रह्या विष्णू महेश अशा त्रिमूर्तीचे स्वरुप धारण करते तर दुसऱ्या वेळी ते जीव रुपाने शरीर धारण करुन सगुण सदेही होते असे जरी असले तरी ते मूळ परमात्म्याचेच विशुद्ध स्वरुप आहे हेच श्री स्वामींनी मूळ मूळ अशा द्विरुक्तीने सूचित केले आहे त्या सोनारणीचा खुलासा वटपत्रशाही अथवा शयनी मूळ पुरुष दत्तात्रेय रुपाने अवतरले आहेत श्री स्वामींच्या व सोनारणीच्या उदगारावरुन श्री स्वामी समर्थ प्रत्यक्ष परमेश्वराचे कसे कोणते व कोणाचे स्वरुप आहेत याची संक्षिप्त स्वरुपात का होईना कल्पना येते म्हणून श्री स्वामी समर्थांचे नित्य स्मरण म्हणजे परमेश्वराचे स्मरण हा इथला बोध आहे.
Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या