शके १७७६ चे दुष्काळातील गावाबाहेरील एका मोठ्या बावडीजवळ (विहिरीजवळ) महाराज बसले असता एका मारवाड्याने हातपाय धुऊन लोटा पाण्याने भरुन घेतला आणि तो महाराजांच्या दर्शनास आला श्री स्वामींचे दर्शन घेऊन तो परत जात असता महाराजांनी त्यास परत बोलविले त्याच्या हातातील लोटा घेऊन त्यातील पाणी ओतून टाकले तो लोटा पंचवीस तीस कदमांवर असलेल्या बावडीकडे फेकला दुष्काळामुळे त्या बावडीवर पन्नास साठ माणसे पाणी भरत होती पण तो जड लोटा कुणासही न लागता तीस चाळीस हात खोल असलेल्या विहिरीत जाऊन पडला.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

वर वर वाचणार्यास श्री स्वामींची ही एक साधी सरळ लीला वाटेल तर काहींना श्री स्वामींनी मारवाड्याची सहज केलेली थट्टा मस्करी वाटेल पण श्रीगुरुलीलामृतात वर्णन केल्याप्रमाणे बोलावे की न बोलावे ! स्वस्थ किंवा चंचल व्हावे ! हेही वृत्तीस नसे ठावे ! ब्रह्यभावे स्वतंत्र !! (अ.४ श्लो.७१) अशी श्री स्वामींची उन्मनी अवस्था सदैव राहत असे कुणाची थट्टामस्करी करण्या इत्तप्पर त्यांचे देहभानही नसायचे या लीलेतील मारवाडी हा इतर मारवाड्यांसारखाच राजस्थानसारख्या दुष्काळी मरुभूमीतून आलेला तो श्री स्वामींचे दर्शन घेऊन परत जात असताना त्याने तो लोटा पाण्याने भरुन घेतला होता त्याकाळात तरी लोटा हे मारवाड्याचे जगण्याच्या साधनेचे प्रतीक होते हे लोक परिस्थितीमुळे कंजूष व दक्ष असतात श्री स्वामींनी त्यास हाक मारुन परत बोलवले त्याच्या हातातील पाण्याने भरलेला लोटा म्हणजे त्याच्या जगण्याच्या साधनेचे प्रतीकच काढून घेतले त्यातील पाणी जमिनीवर ओतून दिले आणि तो लोटा बसल्या जागेवरुन विहिरीच्या दिशेने फेकला जगण्याचे साधन नाहीसे करण्याचा हा प्रकार म्हणजे श्री गुरुचरित्रातील पावट्याचा वेल उपटून टाकणार्या श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या लीले सारखाच आहे श्री स्वामींनी लोट्यातील पाणी जमिनीवर ओतणे आणि लोटा फेकून देणे यातून त्यांना असा संकेत द्यायचा आहे की इथले जीवन इथेच मारवाड्यानेही इथेच राहवे विहिरीच्या दिशेने फेकला गेलेला लोटा ५०-६० माणसांपैकी कुणासही न लागता विहिरीत जाऊन पडला त्या मारवाड्यानेच नव्हे तर अन्य कुणीही आपली उपजीविका कुणासही न त्रासवता अथवा सतावता करावी असेच त्यांना सूचित करावयाचे आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या