श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार दुसरे दिवशी लोकांनी एकत्र जमून त्या पुराणिकाचे पुराण करविले तो पुराणात पुत्र विषय प्रतिपादन करु लागला अपुत्रस्य गतिर्नास्ति पुत्रानेच जय आणि पुण्यलोक प्राप्ती होते निपुत्रिकास गती नाही असा विद्याभिमाने विषय काढून पाहिजे ते बोलू लागला तेव्हा समर्थ म्हणाले अरे शिष्टपरंपरा पुराण पद्धती सोडून पोकळ पंडितपणा करुन लोकांचे मनोरंजन करतोस काय पुत्रावाचून गती नाही अशा थाटाची बोलणी बोलून सिद्धांत ठोकतोस पोपटास पुत्र आहे काय वीणा वाजविणार्यास पुत्र आहे काय वामदेव व्यासाचार्यादिकास पुत्र होते काय तू देखिल निपुत्रिक आहेस म्हणून नरकाला जाशील काय परमेश्वराचे गुणवर्णन सोडून भलभलते बडबडतोस काय ज्या पुरुषास पुत्र नाही त्यास स्वर्गप्राप्ती नाही या विषयी लोकांपुढे शास्त्रार्थ सांगतोस काय अरे मोक्षप्राप्ती पुत्रापासून नाही यदाकदाचित पुत्रापासून बापास मोक्ष होईल तर श्वान सुकरांचा सुद्धा पुत्राकडून मोक्ष झाला पाहिजे यास्तव पुत्राच्या योगाने पित्यास मोक्ष किंवा स्वर्ग प्राप्ती नाही उलट बाप मुलाचे पोषण करण्यासाठी जी पापे करतो त्या योगे नरकास जातो नंतर चोळाप्पाने श्री स्वामींनी उच्चारलेल्या पोपट म्हणजे शुक्राचार्य वीणा वाजविणारा म्हणजे नारद वेदव्यास वामदेव भीष्माचार्य हे पुत्र नसतानाही तरले या कलियुगात शंकराचार्य श्रीपादवल्लभ नृसिंहसरस्वती विद्यारण्यस्वामी हे जगदमान्य झाले महात्मा सतपुरुष साधू संत योगी विरागी भागवदभक्त महाजन विद्वतजन पंडित भोळेभाविक हे पुत्र संताना वाचून सहज ब्रम्हासाक्षात्कारी जगतास तारुन आपणही तरले म्हणून अपुत्रस्य गतिर्नास्ति हा सिद्धांत करता येत नाही पुढे समर्थकृपेने पुराणिकास पुत्रसंतानही झाले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

पुराणिक बुवा श्री स्वामीकृपेने पुराण सांगू लागला स्वतः महाराजही पुराण ऐकण्यास बसले परंतु मुळातच विद्याभिमानी असलेल्या पुराणिकाचे तारतम्य सुटले आणि तो त्याच्या प्रवचनात सांगू लागला अपुत्रस्य गतिर्नास्ति निपुत्रिकास गती नसते तेव्हा मात्र श्री स्वामींनी त्यास सर्वांसमक्ष अडविले आणि त्यास अरे शिष्टपरंपरा पुराणपद्धती सोडून पोकळ पंडितपणा करुन लोकांचे मनोरंजन करतोस काय पुत्रावाचून गती नाही अशा थाटाची बोलणी बोलून सिद्धांत ठोकतोस पोपटास पुत्र आहे काय वीणा वाजविणार्यास पुत्र आहे काय वामदेव व्यासाचार्यादिकास पुत्र होते काय तू देखिल निपुत्रिक आहेस म्हणून नरकाला जाशील काय परमेश्वराचे गुणवर्णन सोडून भलभलते बडबडतोस काय ज्या पुरुषास पुत्र नाही त्यास स्वर्गप्राप्ती नाही या विषयी लोकांपुढे शास्त्रार्थ सांगतोस काय अरे मोक्षप्राप्ती पुत्रापासून नाही यदाकदाचित पुत्रापासून बापास मोक्ष होईल तर श्वान सुकरांचा सुद्धा पुत्राकडून मोक्ष झाला पाहिजे यास्तव पुत्राच्या योगाने पित्यास मोक्ष किंवा स्वर्ग प्राप्ती नाही उलट बाप मुलाचे पोषण करण्यासाठी जी पापे करतो त्या योगे नरकास जातो अशा शब्दात खडसावले लीलेमध्ये आलेला हा भाग वाचल्यानंतर निव्वळ मुलांचाच सोस असणाऱ्या लोकांनीही यातून आत्मबोध करुन घेण्यासारखे आहे पुत्र प्राप्तीसाठी सद्याच्या २१व्या शतकातही झुरणार्या गैर अवैध मार्गाचा अवलंब करणाऱ्यास श्री स्वामी महाराजांनी त्या काळातही कोणत्या विचार सरणीची पेरणी केली याची कल्पना यावी मुलगाच पाहिजे या अपेक्षेतून स्त्रीभ्रण हत्येबद्दल येथे विस्ताराने लिहिण्याची गरज नाही परंतु १५० वर्षांपूर्वीही श्री स्वामींचे विचार किती रोखठोक प्रगत प्रगल्भ आणि सुस्पष्ट होते याची कल्पना येते श्री स्वामींनी लोकांसमोर पुराणिकाच्या पांडित्याची उभी आडवी चांगलीच चिरफाड केली त्यासाठी अनेक दाखले दिले आणि त्या पुराणिकासही विचारले तू देखील निपुत्रिक नाहीस काय यावर त्याची बोलतीच बंद झाली लोकास ब्रम्हज्ञान सांगणारे पुराणिकासारखे कोरडै पाषण आपल्या अवती भवतीही आहेत हे ओळखावे मोक्षाच्या कल्पना त्यांनी अतिशय सुस्पष्ट मांडल्या मोक्षगतीचा आणि पुत्र असण्या नसण्याचा काही एक संबंध नसतो मोक्षप्राप्तीसाठी सत्कर्माची गरज असते पुत्राची नव्हे नारद शुक्र आदि ऋषिमुनी निपुत्रिकच होते म्हणून ते दुर्गतीस तर गेले नाहीच उलट त्यांनी स्वतःचा उद्धार केला या लीलेत असलेला प्रवचनकार पुराणिक त्याचे पुत्र असण्याचे व मोक्षाबद्दलचे वि त्यावर श्री स्वामी समर्थांचे परखड भाष्य आपणा सर्वांनाच प्रबोधित करणारे आहेत.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या