किमयागार संन्याशाने वामनबुवास कबुल केल्याप्रमाणे पत्र पाठवले त्यातील मजकूर (संक्षिप्त स्वरुपात) आम्ही अक्कलकोटास पोहचल्यावर तत्काळ महतपुरुषाच्या दर्शनास गेलो तेव्हा ते पलंगावर विराजमान झाले होते ते स्वलीलेत खेळत होते त्यांना साष्टांग दंडवत घालताच झाडाकडे पाहून मोठ्याने म्हणाले घाल दगड डोक्यात काय रे माजलास काय बोडकीच्या येथे काय हुडकतोस कोळसे झाले तर जीव दे संन्याशाची काय लंडाची परीक्षा करतोस किमया देख इकडे काय पाहतोस रे ते झाड पाहा बोडक्यात फत्तर घे मारुन आख खोल डाव्या हाताकडे पाहा ती किमया असे बोलून ते पोट धरून हसू लागले अंतर्यामी अंतःसाक्षित्वाच्या खुणा पटल्यावर मेलो असतो तर बरे अथवा पृथ्वीने पोटात घेतले असते तर बरे असे मला वाटले परंतु ईश्वर गुरुदर्शनाने माझा भाग्योदय झाला मी पुनित झालो धन्य व कृतकृत्य झालो डाव्या हाताच्या लिंबाच्या झाडाकडे पाहू लागलो तर सोन्याप्रमाणे पिवळेपाणी दिसू लागले वाहवा काय माहात्म्य दर्शनाचे!


अर्थ भावार्थ मथितार्थ 

रामचरण या शिष्यासह किमयागार संन्यासी अक्कलकोटला आला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा आलेल्या प्रचितीचा त्याच्यावर झालेल्या सकारात्मक परिणामांचा इथंभूत वृत्तांत त्याने वामनबुवांस बडोद्यास पत्राने कळवला तो वृत्तांत वाचाल्यानंतर आपणास श्री स्वामी समर्थांच्या लीलेचे मर्म समजू लागते श्री स्वामींचे दर्शन घेतल्याबरोबर श्री स्वामींनी त्याच्याच कृतीची त्याला आठवण करुन दिली घाल दगड डोक्यात काय रे माजलास काय बोडकीच्या येथे काय हुडकतोस कोळसे झाले तर जीव दे संन्याशाची काय लंडाची परीक्षा करतोस किमया देख इकडे काय पाहतोस रे ते झाड पाहा बोडक्यात फत्तर घे मारुन आख खोल डाव्या हाताकडे पाहा ती किमया त्या किमयागार संन्याशास त्याच्याच कृत्याची अशी आठवण करुन दिल्यामुळे श्री स्वामी समर्थांचे देवत्व अंतःसाक्षित्व त्यास मनोमन पटले या रोखठोक प्रचितीने तो कमालीचा शरमिंदा झाला त्याला मेल्याहून मेल्यासारखे झाले नंतर त्याने श्री स्वामी समर्थ हे ईश्वर आहेत त्यांच्या दर्शनाने पुनित धन्य कृतकृत्य झाल्याचे प्राजळपणे कबुल केले अतिशय उर्मट उन्मत्त असलेल्यांमध्ये बदल करण्याची श्री स्वामी महाराजांची केवढी ही किमया नंतर श्री स्वामींनी डाव्या हातास असलेल्या लिंबाच्या झाडाकडे निर्देश करुनत्यातून सुवर्णाचे पाणी पाझरत असल्याचे त्यास दाखवून दिले ते पाणी ज्या जमिनीवर पडत होते ती जमिनही सोन्याप्रमाणे पिवळी दिसत होती ही अदभुत लीला पाहून तो अक्षरशः थिजला ढेकळासारखा विरघळला श्री स्वामींनी ही लीला करुन त्याला अंतरबाह्य बदलून टाकले श्री स्वामी समर्थांचे गुणवर्णन करण्यास आता त्याचेकडे शब्द नव्हते त्याच्याच शब्दात धन्य है जिस पुरुष के तत्काल दर्शन परसन और दयासे अंदरका आत्मा गुरु पहचान जाता है ! ओ ही सदगुरु सच्चा है ! ओ ही परमात्मा सच्चा है ! ओ ही सबके अंतर्यामी साक्षी अविनाशी है ! धन धन मेरा भाग क्या अजब लीला है ! किमया इंद्रजाल गारुड माया अविद्या असत् जड् दुःखपर है ! ह्रदय में परमात्मा पूर्ण परब्रह्य द्वैत रहित है ! नित्यानंद रुप है ! नित्यमुक्त शुद्ध अद्वितीय है ! वाहवा महाराज स्वामी दत्तगुरु आपही प्रभू समर्थ सर्वसम है और दर्शन भी न भया ऐसे होके दीनानाथकू केवल निरपेक्ष सद्यःसाधुसमागमःइस वाक् सत्य करके दर्शनात् तारते हो ! कृतकृत्य करते हो ! हे दत्तगुरुस्वामी सेवककू क्या हुकूम है ! सुरुवातीपासून म्हणजे बखर १७३/१ पासून १७३/६ पर्यंत बखरीतील तपशील आणि त्यावर अर्थ भावार्थ मथितार्थ मध्ये केलेले संक्षिप्त विवेचन काळजीपूर्वक वाचले त्यावर चिंतन मनन केले तर भगवान परब्रह्य श्री स्वामी समर्थांच्या देवत्वाची त्यांच्या साक्षी भावाची दुसऱ्याचे सुक्ष्मातले सुक्ष्म मन वा मनातील विचार ओळखण्याचे त्यांचे सामर्थ्य कळते पण हे सर्व असूनही त्यांच्यातली दया करुणा प्रेम क्षमाशील वृत्तीचाही प्रत्यय येतो यासाठी त्यांच्या समग्र अवतार कार्याचे लीलेचे आणि त्यामागील दृष्टिकोनाचे आकलन करुन घेणे व स्वतःमध्ये सकारात्मक बदल करुन घेणे आपल्या हिताचे आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या