भगवंतआप्पा सुताराच्या मळ्यात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हुरडा भाजण्यासाठी मंडळींनी आगटी पेटविली ते पाहून महाराज आगटी जवळ आले जवळच पाण्याने भरलेल्या घागरीतील पाणी घेऊन चुळ भरुन महाराज आगटीतील पेटलेल्या विस्तवावर टाकीत पाणी विस्तवावर पडल्याबरोबर होमकुंडात तुपाची आहुती पडल्यावर ज्याप्रमाणे अग्नी भडकतो त्याप्रमाणेच श्री स्वामींच्या चुळीच्या पाण्याने अग्नीच्या ज्वाला जास्ती भडकू लागल्या ते तोंडाने इंद्राय स्वाहः वरुणाय स्वाहः असे म्हणत होते घागरीतील पाणी संपेपर्यंत त्यांचाहा खेळ चालला होता.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

चार माणसांच्या अन्न सामग्रीत पन्नास माणसे जेऊ घालून अन्नदानाचे पुण्य भगवंतआप्पा सुताराच्या झोळीत श्री स्वामींनी कसे टाकले ते या अगोदरच्या लीला भागात आले आहेच त्यानंतर हुरडा भाजण्याच्या निमित्ताने एक आगटी पेटविण्यात आली एखाद्या चांगल्या कार्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी यज्ञ केला जातो येथे भगवंतआप्पा सुताराच्या अन्नदानाच्या पुण्यशील कार्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी श्री स्वामींनी हा आगळा वेगळा यज्ञ आरंभिला होता हुरडा भाजण्यासाठी पेटविण्यात आलेल्या आगटीमध्ये घागरीतील पाण्याच्या चुळा भरुन ते टाकू लागले तेव्हा ते स्वमुखाने इंद्राय स्वाहः वरुणाय स्वाहः म्हणू लागले खरे तर चुळेतील पाण्याने आगटी विझावयास हवी पण झाले उलटेच पाणी विस्तवावर पडल्याबरोबर होमकुंडातील तुपाची आहुती पडल्यावर ज्याप्रमाणे अग्नी भडकतो त्याप्रमाणे त्या आगटीतील ज्वाला भडकू लागल्या घागरीतील पाणी संपेपर्यंत त्यांनी आगटीतील यज्ञ खेळ चालू ठेवला होता का केला असेल त्यांनी हा यज्ञ त्याचा अर्थ मथितार्थ भावार्थ काय यज्ञ कल्याणकारी होण्यासाठी अनेक देव देवतां बरोबर खास करुन इंद्राला आवाहन केले जाते म्हणून तर श्री स्वामी म्हणतात इंद्राय स्वाहः वरुणाय स्वाहः इंद्र हे ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते आवाहन केलेल्या त्या सर्व देव देवता आणि इंद्र त्यांच्या ऐश्वर्यासह प्रसन्न व्हाव्यात हा हेतू यज्ञात आहुती देताना असतो त्या गरीब भगवंतआप्पा सुताराजवळ यज्ञात आहुती टाकण्यासाठी कसले आले तूप कसले आले यज्ञकुंड श्री स्वामींनीच अशी काही योजना केली की हुरड्यासाठी पेटविलेली आगटी यज्ञकुंड घागरीतील पाणी तूप यज्ञात तुमची आहुती देणारे प्रत्यक्ष परब्रम्ह श्री स्वामी समर्थ स्वामी तेथे काय कमी सर्व देव देवतांनी प्रसन्न होऊन त्याच्यावर ऐश्वर्य यश धर्म आणि वैभव याची खैरात केली श्री गुरू परमेश्वर कृपादृष्टी करील जयावर त्यासि चारी पुरुषार्थ प्राप्त होती साचार काही न्यून नसेचि (श्री गुरुलीलामृत अ.३७-१७१) हाच इथला अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या