श्री स्वामी समर्थांपुढे वाढलेल्या भोजनाच्या ताटास अहमदशहा रिसालदारास हात लावावयास सांगितला हा चोळाप्पाच्या घरातील बायका माणसास मोठा चमत्कार वाटून चोळाप्पाने हा कोणी वेडा व बाट्या (बाटगा) माणूस घरात आणला म्हणून घरातील सर्वच त्यास नावे ठेवू लागले दुसरे दिवशी समर्थ चोळाप्पाचेच घरी राहिले श्री स्वामींनी घरातील सिद्ध झालेला सर्व स्वयंपाक विटाळून टाकल्यामुळे बायका फार रागावल्या व चोळाप्पास वेड लागले म्हणून त्रास देऊ लागल्या तेव्हा श्री स्वामींनी विविध प्रकारे चोळाप्पास त्रास दिला एकदा चोळाप्पाच्या बायकोने हरभरे भरडूनशात्याची उत्तम डाळ करुन रांजणात भरुन ठेवली होती श्री स्वामींनी ती डाळ चोळाप्पाच्या गाईस नित्यनेमाने खाऊ घालून संपवून टाकली सणासाठी पुरणपोळी करण्याच्या हेतूने चोळाप्पाची बायको डाळ काढावयास गेली पाहते तो रांजण रिकामा श्री स्वामींचेच हे काम असावे असा तिला संशय येऊन तिने ही गोष्ट चोळाप्पास सांगितले चोळाप्पाने डाळीबाबत श्री स्वामींस विचारता त्यांनी जबाब दिला हमकू क्या मालूम तुम्हारी गौ डाळ खा गई उनको पूछ.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

चोळाप्पाच्या घरच्या मंडळीच्या सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना पारंपरिक आणि कर्मठपणाच्या होत्या त्यांना शिवाशिव अजिबात मान्य नव्हती श्री स्वामींना तर हे सर्व मोडून काढावयाचे होते म्हणून त्यांनी जाणून बुजून अहमदशहास त्यांच्या पुढे भोजनासाठी वाढलेल्या ताटास हात लावण्यास सांगितले नंतरच त्यांनी भोजन केले चोळाप्पाच्या घरातील सर्वांनाच श्री स्वामी हे कुणी तरी वेडे व बाटगे वाटले पण त्याची श्री स्वामींना पर्वा नव्हती घरात सिद्ध झालेला स्वयंपाकही ते अनेकदा विटाळून टाकीत वास्तविक श्री स्वामी समर्थांच्या रुपाने त्यांच्या हाती खूप मोठे निधान लागले होते पण ते श्री स्वामींस सर्वसाधारण माणसासारखा वेडा समजत होते अज्ञानाचे हे असेच होत असते हे अज्ञान सदसदविवेकाने व्यापक विचाराने घालवता येते चोळाप्पाच्या घरातील कुटुंबियांची स्थिती डोळे असून आंधळे आणि कान असून बहिरे अशी झाली होती पण श्री स्वामींना अथवा त्यांच्या सारख्या दैवी विभूतींना त्याची फिकीरही नसते श्री स्वामींना चोळाप्पाच्या घरातील कुटुंबियांना आणि त्याच्या बायकोस संकेत द्यायचा आहे की घरातील गाडगी मडकी हा जन्मजन्मांन्तरीचा प्रपंचच असतो त्यातील साठविलेली हरभर्याची भरडून ठेवलेली उत्तम डाळ हेच संचित हे किती साठवायचे याचा लाभ काय तो तरी चिरंतन आहे का संचित भोगून संपवा गाईला देऊन दशेंद्रियांना शांत करा मी तुमच्या घरी तुमच्याजवळ असता भविष्याची व्यर्थ चिंता का करता हे सूचित करण्यासाठीच त्यांनी रांजणातील डाळ गाईस खाऊ घातली डाळीबाबत विचारताच तुम्हारी गौ डाळ खा गई असे श्री स्वामी सूचकपणे म्हणाले सध्या साठविण्यासाठी रांजणाऐवजी कोठ्या वा अन्य साधने आली आहेत पण साठविण्याची प्रवृत्ती तर तिच आहे ना मर्यादित साठवण आणि देवाची सतत आठवण हेच श्री स्वामी समर्थांना या लीलेतून बोधित करायचे आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या