मल्लिकार्जुन नावाचा जंगम भक्त बार्शीस राहत असे तो कीर्तन करीत असे त्यास ज्ञानेश्वरी गीता भागवत आदि ग्रंथ अवगत होते एकदा तो अक्कलकोटी येऊन कीर्तन करु लागला त्याची चार मुले त्याला साथ करीत एके दिवशी मालोजी राजांच्या राजवाड्यातील कीर्तन आटोपल्यावर मल्लिकार्जुन जंगमाच्या मठात जाऊ लागला फाटकाच्या वेशीत श्री स्वामी समर्थास पाहून तो विचारु लागला येथे अवतारी यती आहेत ते हेच काय लोकांनी होय म्हणून सांगितले तेव्हा या किर्तनकाराच्या मनात पायातील पायताण काढून श्री स्वामीस नमस्कार करावा की न करावा असा गर्विष्ठ विचार आला त्यावर समर्थ म्हणाले अरे आमची पंचाईत करु नकोस पाया पडलास अथवा न पडलास तरी आम्हास (त्याची) गरज नाही श्री स्वामींचे हे अंतःसाक्षित्वाचे भाषण ऐकून मल्लिकार्जुन लज्जित होऊन त्यांना साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना करु लागला महाराज आपण प्रत्यक्ष सदाशिव आहात अपराधाची क्षमा करा आपणास न ओळखता संशय घेतला त्याची क्षमा असावी नंतर त्यानेच श्री स्वामींची प्रार्थना केली की महाराज आमचे बरोबर जंगमाचे मठात चलावे.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

मल्लिकार्जुन नावाच्या किर्तकार जंगमास ज्ञानेश्वरी गीता भागवत आदि ग्रंथ अवगत होते मालोजी राजाच्या राजवाड्यातही त्याचे कीर्तन झाले होते त्यामुळे नाही म्हटले तरी त्याच्यात अहम किंवा गर्व असा शत्रू आहे की तो स्वतःला स्वतःचे स्वरुप विसरायला लावतो वास्तव सोडून अहंभावी व्यक्ती एका वेगळ्याच जगात वावरु लागते तसेच येथे मल्लिकार्जुनाचे झाले होते राजवाड्यातील कीर्तन आटोपून जंगमांच्या मठाकडे जात असताना वाटेत त्यास श्री स्वामी समर्थ दिसल्यावर काहीशा दुर्लक्ष करण्याच्या स्वरातच तो म्हणाला अवतारी यती आहेत ते हेच काय लोकांजवळ अशी विचारणा करताच लोक आदरयुक्त भावनेने म्हणाले होय हेच ते नमस्कार करण्यासाठी पायातील पायताण काढून श्री स्वामीस नमस्कार करावा की तसाच नमस्कार करुन इथून जावे याचा संभ्रम त्याच्या मनात निर्माण झाला श्री स्वामींनी अशा संभ्रमितास दिलेले उत्तर अरे आमची पंचाईत करु नकोस पाया पडलास अथवा न पडलास तरी आम्हास (त्याची) गरज नाही लीलेत आलेले उदगार निश्चितच मनोज्ञ आहेत देव अनादि अनंत आहे मुख्य म्हणजे मानव ही त्याची निर्मिती आहे त्यामुळेच देवाचे असणे आणि नसणे हे मानवावर अवलंबून नाही हा पाया पडतो तो पाया पडत नाही हा नमस्कार करतो तो नमस्कार करीत नाही याचा राग लोभ बाळगण्या इतका देव शूद्र नाही हाच श्री स्वामी समर्थांच्या बोलण्याचा मथितार्थ आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या