श्री स्वामी समर्थ शेखनूर साहेबांच्या दर्ग्यात आले मुसलमानांच्या स्मशानभूमीत खाच केलेल्या थडग्यात ते छाटी टाकून निजले थोडा वेळ तेथे पडून ते उठले त्यांनी शंकररावास फकिरांना भोजन व शेखनूरच्या कबरस्थानावर कफनी चढविण्यास सांगितले शंकरराव आठ दहा दिवस अक्कलकोटातच राहिले त्यास महाराजांनी लिंबाचा पाला वाटून त्यात नऊ मिरे घालून ते औषध प्यावे म्हणून आज्ञा केली त्याप्रमाणे करताच त्यांना चांगला गुण आला दहा हजार रुपयाचे काय करावयाचे म्हणून त्यांनी श्री स्वामींस विचारले सुंदराबाई व चोळाप्पाच्या मनात हे दहा हजार रुपये आपणास मिळतील मिळावेत या आशेने ते दोघेही पुढे पुढे लुडबूड करु लागले महाराज म्हणाले बोडकीस व जैनास काही देऊ नकोस मठ बांध मंडळींनी विचारले मठ कोठे बांधावयाचा गावाबाहेर रामाचे देऊळ आहे तेथे बांधावा अशी आज्ञा झाली मंडळींनी मठ गावात बांधावा अशी विनंती केली सांगितलेले जागीच बांधावा पुन्हा महाराजांनी सांगितले तीस हजार रुपये खर्च करुन त्यांनी महाराजांनी सांगितलेल्या जागी मठ बांधला पादुकांची स्थापना मोठ्या थाटाने केली हजार ब्राम्हण व प्रत्येकी एक रुपया दक्षिणा व इतर जातीलाही पक्वान्ने करुन वाढली पूजेची वगैरे सर्व नेमणूक करुन मग ते हैद्राबादेस गेले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थ हे शेखनूर साहेबांच्या दर्ग्याच्या जवळच कबरीसाठी खणलेल्या खड्ड्यात छाटी टाकून थोडा वेळ निजले त्यांनी ही कृती कबरस्थान जवळ येऊनच का केली यातून त्यांना शंकरराव रायराजे यांचा ब्रह्यसमंध बाधेने आणि क्षयरोगाच्या पीडेने येणारा अपमृत्यू परतवावयाचा होता त्यांनी सांगितलेले लिंबाचा पाला आणि नऊ मिरे हे औषध दिल्याची तुमच्या आमच्या सारख्यांची समजूत पण स्वतः छाटी टाकून निजण्याची केलेली कृती विचार करावयास लावणारी आहे श्री स्वामीच ती करु जाणे कृतज्ञता म्हणून शंकररावांना शेखनूराच्या कबरस्थानावर कफनी चढवून तेथील फकिराला खाना देण्यास सांगितले स्वतःसाठी काही घेतले? पाद्यपूजा भरजरी वस्त्रे अलंकार भेट वस्तू आदि आपणच विचार करावयाचा आहे श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन मठ मंदिरे आश्रम केंद्र उभारणारे महागड्या गाड्यात फिरणारे अंगावर सोने घालणारे आणि कार्पोरेट पद्धतीने जीवन जगणारे (काही सन्माननीय अपवाद वगळून) हे सारे आपण अनुभवित आहोत पाहत आहोत प्रसंगी अशांच्याच चरणी अथवा भजनी लागतो शंकरराव रायराजे यांना गुण आला त्यांची श्री स्वामींवरील भक्ती दृढ झाली संकल्पाप्रमाणे रक्कम श्री स्वामी चरणी अर्पावयाची त्यांची तयारी होती ती त्यावेळची फार मोठी रक्कम म्हणजे दहा हजार रुपये मिळविण्यासाठी सुंदराबाई आणि चोळाप्पा लुडबूड करावयास लागले तेव्हा श्री स्वामींनी स्पष्टच सांगितले बोडकीस (सुंदराबाईस) व जैनास (चोळाप्पास) काही देऊ नकोस मठ बांध प्रत्यक्ष स्वरुपात श्री स्वामी समर्थांसारख्या परमेश्वराच्या नित्याच्या सहवासातही सुंदराबाई आणि चोळाप्पाची पैशाची लालसा कमी झाली नव्हती येथे ही दोघे लालची लोभी वृत्तीची उजळ प्रतीके आहेत आजही अनेक मठ मंदिरे देवस्थाने तीर्थस्थाने आदि ठिकाणी पावलो पावली अशी माणसे आढळतात शंकरराव रायराजे श्रीमंत होतेच परंतु वृत्तीने ते कर्ण होते श्री स्वामींची रोकडी अनुभूती त्यांना आल्यामुळे श्री स्वामी समर्थ हे त्यांच्या लेखी चालते बोलते सदेह स्वरुपात वावरणारे भगवंतच होते त्यामुळे कुणाकडेही लक्ष न देता श्री स्वामी महाराजांनी सांगितलेल्या जागीच तीस हजार रुपये खर्च करुन त्यांनी मठ बांधला (त्यावेळी तीस हजार रुपये ही मोठी रक्कम होती) निजामाचे दप्तरदार म्हणून मिळणारा मान सन्मान सेवा निवृत्तीनंतर त्यांना मिळणार नव्हता त्यांचे नाव कीर्ती फार तर वीस पंचवीस वर्षे राहिली असती नंतर ते विस्मृतीतच गेले असते परंतु सदगुरु श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेने बांधलेल्या मठामुळे शंकरराव रायराजे यांची कीर्ती अक्कलकोटात आजही चिरंतन स्वरुपात आहे श्री स्वामी समर्थांचे वैशिष्टय येथे लक्षात घेण्यासारखे आहे जेथे तेथे त्यांनी मठ बांधून घेतले तेथे तेथे त्यांनी त्यांच्या भक्तांची नावे त्या मठाशी जोडून भक्तांना अजरामर केले ते स्वतः मात्र नामानिराळे राहिले उदा बाळाप्पा मठ चोळाप्पा मठ जोशी मठ राजेरायन मठ केवढा हा निर्मोही पणा अन् भक्ताबद्दलचे निखळ प्रेम साधेल आजच्या तथाकथित बुवा बापू माउली आदींना देवांचे फोटो प्रतिमा लहान आणि यांच्या मात्र महान मोठ्या यातून अर्थ भावार्थ मथितार्थ कसा काढावयाचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या