तर इकडे समर्थांकडे बरीच यात्रा जमली होती सर्व हिंदू मुसलमान श्री स्वामी नामाचा जयजयकार करीत आहेत नारळांचा ढीग श्री स्वामींपुढे पडला आहे त्यांची कर्पूर आरती चालली आहे सर्व श्री स्वामीमय झालेले आहेत हे सर्व दृष्य पाहून बैरामजीचा शक्तिपात झाला त्याची बोबडी वळून तो खाली पडला तेव्हा समर्थ त्यास म्हणाले गाढवा निंद्य कर्मे करुन जीव हिंसा करतोस तुमच्या देवधर्मीय शास्त्रात व्यर्थ प्राणघात निंद्य अन्यायी कर्मे करावीत अशी आज्ञा आहे काय श्री स्वामींचे हे बोल ऐकताच त्याला त्याच्या कर्माचा पश्चात्ताप झाला तो श्री स्वामीस म्हणाला मायबाप कृपार्णवा अपराधाची क्षमा करावी त्यावर समर्थ म्हणाले अरे अनेक धर्माचे सार हेच की परोपकारार्थ अनिवार्य श्रम करावे प्राणांतीही जीवहिंसा करु नये विनाकारण दुसऱ्यास पीडा देऊ नये मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल भरवसा करु नये पक्षा पक्ष भेद टाकून सत्य न्याय धर्म या मार्गाने असावे परमेश्वर भजनी रत असावे कोणतेही दुर्व्यसन नसावे योग्य अयोग्याचा विचार असावा अतिथी अभ्यागतास अन्नोदक द्यावे न्यायार्जित धनाने स्वहित करावे साधल्यास परहितही करावे परोपकारार्थ वापी कूप तडाग बांधावे पथिकास उपयोगी पडतील अशा धर्मशाळा बांधाव्यात सर्व धर्माचे रहस्य उपदेश हाच आहे दया शांती क्षमायुक्त चित्त असावे या योगाने प्रपंची परमार्थ साधून जन्माचे सार्थक होते असे श्री स्वामी मुखातील बोधामृत बैरामजीने श्रवण करुन श्री स्वामी चरणावर लोटांगण घातले पुढे त्याने समर्थ आज्ञेप्रमाणे वागून श्रींच्या भजनात आयुष्य घालविले.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

बैरामजीबाबत या अगोदर आपण जाणून घेतले श्री स्वामींनी त्याची कानउघाडणी केल्यावर पश्चात्ताप दग्ध झालेल्या बैरामजीने मायबाप कृपार्णवा अपराधाची क्षमा करावी अशा हीन दीन लीन शब्दांत श्री स्वामींची क्षमा याचना करुन त्यांच्याकडून उपदेशाची व कृपेची अपेक्षा केली त्यासाठी त्याने त्यांच्याकडे आग्रह धरला श्री स्वामींनी विचार बैरामजीस ऐकविले अरे अनेक धर्माचे सार हेच की परोपकारार्थ अनिवार्य श्रम करावे प्राणांतीही जीवहिंसा करु नये विनाकारण दुसऱ्यास पीडा देऊ नये मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल भरवसा करु नये पक्षा पक्ष भेद टाकून सत्य न्याय धर्म या मार्गाने असावे परमेश्वर भजनी रत असावे कोणतेही दुर्व्यसन नसावे योग्य अयोग्याचा विचार असावा अतिथी अभ्यागतास अन्नोदक द्यावे न्यायार्जित धनाने स्वहित करावे साधल्यास परहितही करावे परोपकारार्थ वापी कूप तडाग बांधावे पथिकास उपयोगी पडतील अशा धर्मशाळा बांधाव्यात सर्व धर्माचे रहस्य उपदेश हाच आहे दया शांती क्षमायुक्त चित्त असावे या योगाने प्रपंची परमार्थ साधून जन्माचे सार्थक होते हे विचार बैरामजींसाठीच नव्हे तर आपण सर्वांनी ते मुळात वाचून स्वतःमध्ये रुजविले पाहिजेत तसे आचरण केले पाहिजे त्यासाठीच श्री स्वामींचे हे उदगार आहेत त्यात श्री स्वामींनी काय नाही सांगितले त्यांनी सर्व धर्माचे सार सांगितले कशावरच चिरकाल भरवसा ठेवू नये आपला मार्ग सदैव कोणता असावा स्वतः ते प्रत्यक्ष परब्रम्ह परमेश्वर असूनही माझीच पूजा पाठ करा माझेच भजन कीर्तन करा असा आग्रह त्यांनी न धरता परमेश्वराप्रती मग तो कोणताही का असेना त्याच्या प्रती रत राहावे त्याच्याशी बांधून घ्यावे वाईट व्यसनांचाही त्यांना मनापासून तिटकाराच होता म्हणून दुर्व्यसन नसावे असा ते आग्रह धरतात स्वहित परहित साधण्याबाबतही ते सांगतात याबाबत स्पष्ट मार्गदर्शन ते करतात प्रपंचात परमार्थ साधून जन्माचे सार्थक कसे करावे याबाबत श्री स्वामींचे मार्गदर्शन निश्चितच बैरामजीस नव्हे तर आपल्या सारख्यासही दिशा दाखविणारे आहे पण होतं काय की एक तरी ओवी अनुभवण्या ऐवजी संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचूनही आपण अनेक बाबतीत अज्ञानी राहतो तसेच या उपदेशाबाबत न व्हावे परंतु या लीलेत बैरामजी सारख्या आत्मकेंद्रित अहंभावी आणि नास्तिकालाही आस्तिक करण्याची विलक्षण किमया पाहावयास मिळते तुमच्या देव धर्मीय शास्त्रात व्यर्थ प्राणघात निंद्य अन्यायी कर्मे करावी अशी आज्ञा आहे काय असा रोकडा सवाल करुन त्याला त्याची चूक श्री स्वामी लक्षात आणून देतात नास्तिकाच्या कश्यपूला आस्तिकाची देण्यागती असा आणि या याकरिताच श्री स्वामींचा अवतार झाला ते या लीलेवरुन स्पष्ट होते.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या