मला पुत्र झाल्यास त्याचे उपनयन गाणगापुरात येऊन करीन असा नवस घाटावरील एका ब्राम्हणाने श्रीनृसिंह सरस्वतीस केला होता श्री दत्तकृपेने पुढे त्यास पुत्र झाला नवस फेडण्यास तो ब्राम्हण कुटुंबासह गाणगापुरास जाण्यास निघाला तो अक्कलकोटपर्यंत आल्यावर त्याची खर्ची संपली तेव्हा त्या ब्राम्हणाने श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना केली की मला गाणगापुरास जाऊन नवस फेडवत नाही तर आपण दत्त अवतार आहात तर येथेच नवस फेडून घ्यावा महाराजांनी (होकारार्थी) मान हलविली ते पाहून ब्राह्यणाला मोठा आनंद झाला नंतर त्याला समर्थ कृपेने नवसपूर्तीसाठी द्रव्याची मदत मिळून त्याच्या मुलाची मुंजही झाली.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

गाणगापूरच्या दत्तगुरुंच्या पुढील अवतार म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे सांगणारी ही लीला आहे गाणगापूरचे श्रीनृसिंह सरस्वतीस केलेला नवस पुष्कळ भक्तजन अक्कलकोटास श्री स्वामी सन्निध येऊन फेडीत असल्याच्या अन्य अनेक लीला आहेत घाटावरील ब्राम्हणाने पुत्र झाल्यास त्याचे उपनयन (मौंज) गाणगापूरात येऊन करीन असा श्री नृसिंह सरस्वतीस नवस केला होता त्यास दत्तकृपेने पुत्र झाला बोलल्याप्रमाणे नवस फेडण्याची जबाबदारी ब्राह्याणाची होती ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तो त्याच्या कुटुंबियांसमवेत गाणगापूरला जाण्यास निघाला पण अक्कलकोटपर्यंत आल्यावर त्याच्या जवळचे सर्व पैसे संपले त्यामुळे नवस फेडण्यासाठी तो गाणगापूरला जाऊ शकत नव्हता श्री स्वामी समर्थ हे दत्त अवतारी आहेत हे तो जाणून होता म्हणून त्याने स्वतःची अगतिकता पैशाअभावी पुढे जाण्याची असमर्थता श्री स्वामींपुढे निवेदन करुन नवस फेडून घेण्याबाबत त्यांना विनंती करताच श्री स्वामींनी होकारार्थी मान हलविली त्याच्या मुलाची मौंज अक्कलकोटातच यथासांग पार पडली श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात दत्त अवतार असल्याची प्रचिती त्या ब्राम्हणास आली असे अनेक भक्तांना गाणगापूर येथे जाण्याऐवजी अक्कलकोट येथे जाण्याचे दृष्टांत झाले आहेत त्यामुळे श्री स्वामी समर्थ दत्तप्रभू भिन्न आहेत असे द्वैत किंवा संभ्रम मनात निर्माण करण्याचे काहीच कारण नाही मनात या दोन्ही दैवताबाबत भेदा भेद भ्रम अमंगळ निर्माण करण्यात वेळ श्रम वाया घालविण्यापेक्षा तोच वेळ व श्रम उपासनेत खर्च करण्यातच शहाणपणा आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या