नागूआण्णा कुलकर्णी पंढरपूरात तुका विप्राच्या घरी उतरले तीन चार दिवस येथील देवदर्शनात गेले एक दिवस पांडुरंगाच्या देवळात दोन गृहस्थ भेटले त्यांना नागूआण्णांनी त्यांच्या अंधत्वाबद्दल सांगताच त्यांनी सांगितले उद्धवाचे मठानजीक एक डोळ्यांचा वैद्य आला आहे त्याजकडे तुम्ही जा त्याप्रमाणे नागूआण्णा त्या वैद्याकडे गेले वैद्याने सांगितले मी पन्नास रुपये घेईन तर डोळे नीट करीन नागूआण्णा त्यात कबुल झाले वैद्याने शस्त्राने त्यांच्या डोळ्यावरचे पडदे काढले आणि पट्टी बांधली पट्टी तीन दिवसांनी सोडल्यावर नागूआण्णांना दिसू लागले पण चांगले दिसत नव्हते व डोळ्यास फार कळ लागत होती हे सांगण्यास ते जेथे वैद्य होता त्या मठात गेले पण वैद्य तेथे नव्हता त्यांनी लोकांना वैद्याबाबत विचारताच लोकांनी डोळ्याचा वैद्य येथे आलेला आम्हास माहीत नाही हे ऐकून नागूआण्णास मोठा चमत्कार वाटला त्यांनी डोळ्याला होणाऱ्या त्रासाबद्दल दुसऱ्या वैद्यास विचारले त्याने थोडा औषधोपचार केला त्यामुळे उलट डोळ्याचा ठणका वाढला नंतर नागूआण्णांनी अक्कलकोटात चालते बोलते देव आहे त्यांनाच याबद्दल विचारावे असे मनात आणून ते अक्कलकोटास श्री स्वामी समर्थांकडे परत आले.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
नागूआण्णांच्या डोळ्यावर उपचार श्री स्वामी समर्थ कृपेने अथवा त्यांच्या किमयेने अन्यत्र कोठेही होऊ शकला आसता ते स्वतः एखादे औषध सांगून उपचार करु शकले असते पण तो उपचार पंढरपूरला का तर पंढरपूर हे सदगुरुतत्त्वाचे निवासस्थान प्रत्यक्ष सत्यलोकच आहे पण पंढरपूरचे हे महत्त्व तेथे पाठविण्याचा श्री स्वामींचा उद्देश त्या बिचाऱ्या नागूआण्णा कुलकर्ण्यासच काय पण तुम्हा आम्हालाही कळणारा नाही येथे पंढरपुरातही नागूआण्णा देवदर्शन घेण्याची उपासना चालूच ठेवतात श्री स्वामींच्या नियोजनानुसार त्यास दोन गृहस्थ भेटतात त्यांची डोळ्याची समस्या ऐकून त्यास उद्धवाच्या मठात आलेल्या एका वैद्यास भेटावयास सांगतात पण हा उद्धव कोण त्याचा मठकुठे आहे कोण वैद्य आदि सर्वांबाबत नागूआण्णा अनभिज्ञ आहेत येथे उद्धव म्हणजे सर्वोच्च स्वामी परमेश्वर उद्धवाच्या मठातला वैद्य डोळ्यावर शस्त्रक्रिया करणार असतो पणतेही पन्नास रुपये घेऊन विविध प्रकारच्या त्यागाच्या सेवेच्या सत्कर्म रुपी कृतीच्या जीवाकडून वरील स्वरुपाचा मोबदला घेतल्यावरच परमात्मा जीवाचा उद्धार करतो हा या मागचा भावार्थ आहे सर्वस्व हा जीव चरणी ठेवू दुजी दक्षिणा मी तुम्हा काय देऊ वास्तविक नागूआण्णासारख्या अथवा तुमच्या आमच्यासारख्या भक्ताने परमेश्वरास सर्वस्व अर्पण करावे असे अपेक्षित असते परंतु आपण प्रापंचिक देवभक्ती स्थूल देहानेच करतो कारण मुळात आपली देहबुद्धी गेलेली नसते म्हणजे आपला स्वार्थ सुटलेला नसतो आपण आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी देवभक्ती अथवा उपासना करीत असतो म्हणून ती उथळ अथवा वरकरणी असते त्यामुळे तिच्यात दांभिकता वरवरची थातूर मातूर कृती असते आपल्या उपासनेने अंतर्बाह्य देहाची शुद्धी होणे महत्त्वाचे आणि गरजेचे असते तेच नागूआण्णांकडून विविध स्तरांतून श्री स्वामींना करुन घ्यायचे होते म्हणून तर तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर पुन्हा अक्कलकोट असे वर्तुळ पूर्ण करुन घेतले डोळ्याच्या उपचारात कसर राहिली म्हणून नागूआण्णा पुन्हा उद्धवाच्या मठात त्या वैद्याकडे गेला तर ना तेथे कधी डोळ्यांचा वैद्य आला होता अन्य दुसऱ्या वैद्याकडे जाऊनही उपयोग झाला नाही तेव्हा नागूआण्णा कुलकर्ण्यास आत्मबोध झाला की अक्कलकोटातच चालते बोलते देव आहे तेच सर्वकाही उपचार करतील नागूआण्णा सारखेच तुम्हा आम्हा सारख्या सर्वसामान्य जीवांना आत्मबोधासाठी आपल्या उपासनेच्या शुद्धतेसाठी हा खटाटोप करावा लागतो त्याला दुसरा पर्याय नाही उपासनेस अथवा भक्तीस शॉर्टकट नसतो हेच खरे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या