महाराज सेवेकर्यांस मोठ्या प्रेमाने वागवीत एखादेवेळी सेवेकरी काही काम चुकला म्हणजे नमस्कार हो नमस्कार असे समर्थ म्हणत सेवेकर्यांना पत्ते खेळताना पाहिल्यास ते पत्ते फेकून देत आणि म्हणत अरे आयुष्य गेले रे गेले कोणी फुकटच्या गोष्टी बोलू लागला तर ते सेवेकर्यांस म्हणत काय रे तुला काय करायचे आहे जर सेवेकरी उंचावर बसला तर त्यास खाली बैस म्हणून सांगत कोणास ज्ञान पाहिजे असल्यास शिकून जा असे म्हणत.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थांचा सहवासही त्यावेळी उत्तम संस्कार करणारी जीवन घडविणारी आणि जीवनाचे दिग्दर्शन करणारी एक कार्यशाळाच होती श्री स्वामी महाराज हे त्या कार्यशाळेचे अधिपती होते श्री स्वामींचे चालणे बोलणे प्रसंगी कृतीतून काही निर्देश देणे वा सूचित करणे ही प्रत्यक्ष भगवदगीताच होती प्रपंच करताना परमार्थही करता येतो तसा तो करावा यावर त्यांचा कटाक्ष होता म्हणून त्यांनी कुणासही प्रपंच सोडून माझ्या भजनी लागा अथवा परमार्थ एके परमार्थ करा असे सांगितले नाही मात्र सेवेकर्यांना काही ना काही सांगण्यात सुचविण्यात अथवा थोडक्यात कृतीशील उपदेश करण्यात ते सदैव दक्ष असतात तसा तो करीत चांगले नीतिमान वागण्याचे आदर्श देत ते सेवेकर्यांस प्रेमाने वागवित एखादा सेवेकरी काम करताना चुकला तर त्यावर न रागावता अथवा त्यास न डाफरता नमस्कार हो नमस्कार असे काहीसे उपरोधाने म्हणत त्यामुळे सेवेकरी सुद्धा काय समजायचे ते समजून जात कामचुकार अथवा कामात टंगळ मंगळ करणारेही त्यामुळे लज्जित होत सेवेकर्यांने स्वतःच्या प्रपंचात आणि परमार्थात एक क्षणसुद्धा वावगा दवडू नये असे त्यांना वाटे म्हणून फावल्या वेळात जर कोणी पत्ते खेळताना दिसले तर ते पत्ते सेवेकर्यांकडून हिसकावून घेऊन फेकून देत आणि आयुष्य गेले रे गेले म्हणून हळहळ व्यक्त करीत आयुष्य अनमोल आहे म्हणून एक क्षणसुद्धा वाया न घालवत तो सत्कारणी लावावा असा त्यांचा त्या काळातही कटाक्ष असावयाचा जर कोणी बाष्कळ गप्पा टप्पा अथवा फुकटच्या पोकळ गोष्टी बोलू लागला तर त्याच्यावर ते रागे भरत आणि म्हणत काय रे तुला काय करायचे आहे म्हणजे असंबंधित गप्पागोष्टी करण्यात काय हशील आहे असेच त्यांना सुचवावयाचे असे जणू काय घटका गेली पळे गेली तास करतो ठण्णाणा आयुष्याचा काळ जातो राम कारे म्हणाना याचीच ते आठवण करुन देत असत उंच आसनावर बसलेल्या सेवेकर्यांस खाली बस म्हणून सांगत कारण ज्येष्ठांच्या उपस्थितीत उच्च आसनावर बसणे अप्रशस्त व गैर असते नम्रभाव वृत्तीत येण्यासाठी ते असे म्हणत त्याचप्रमाणे कोणी शिकण्याची उत्सुकता जिज्ञासा दाखविली तर त्यास शिकून जा असे म्हणून प्रोत्साहित करीत त्यांना मार्गदर्शन करीत प्रसंगी त्याच्याशी चर्चा करुन त्यांचे शंका निरसनही करीत येथे चमत्कार वा लीला नाही तुम्हासाठी निखळ उपदेश आहे त्यातून बरेच काही घेता येईल त्यासाठी आपण सदैव सज्ज मात्र असावयास हवे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या