एकदा केशव देशपांडे पाणी आणण्याकरिता बैलगाडी जुंपून गाडीत मोठ मोठी भांडी घागरी घेऊन विहिरीवर गेले सर्व भांडी पाण्याने भरुन गाडी हाकण्याकरिता दोन ब्राम्हण गाडीवर बसले थोड्या अंतरावर गाडी जाताच बैलाचे जू एकाएकी सुटून गाडी उलटी झाली व भांड्यांखाली दोन्हीही ब्राम्हण सापडले परंतु चमत्कार असा की त्या दोनही ब्राम्हाणांचे अंगास यतकिंचितही धक्का लागला नाही.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलेमध्ये बैलगाडीत बसलेल्या दोन ब्राम्हणावर तेव्हा प्राण गमावण्याचा प्रसंग उदभवला होता ते दोघे श्री स्वामी समर्थांचे निःस्सीम भक्त असल्यामुळे पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यांखाली ते दोघे अकस्मात सापडूनही त्यांच्या अंगास यतकिंचितही धक्का लागला नाही श्री स्वामी समर्थांचे वैशिष्ट्य असे की त्यांच्यापुढे माझा तुझा असा भेद नव्हता त्यांचा कोणताही निश्चित असा धर्म पंथ संप्रदायही नव्हता त्याचे सर्वाभूती प्रेम होते मानवता हाच धर्म होता कुणाच्याही बाबतीत आपपर भाव नव्हता याउलट त्याच श्री स्वामी समर्थांचे मठ मंदिरे केंद्रे आश्रम पादुका इ.स्थापणार्यांचे उभारण्याच्या बाबतीत केला जाणारा भेदभावाबाबत विस्ताराने लिहिण्याचे कारण नाही नियम अटी वेषभूषा सोवळे ओवळे यांचा बडिवार माजवणार्यांना श्री स्वामी समर्थांचा आचार विचार धर्म आणि तत्त्वज्ञान केव्हा समजणार श्री स्वामी समर्थांच्या आचार विचार व्यवहार धर्माचे आकलन केव्हा होणार सम सकला पाहू भेदा भेद भ्रम अमंगळ हा व्यापक दृष्टिकोन केव्हा येणार २१ व्या या प्रगत शतकात ह्याही प्रश्नांची उत्तरे मिळावयास हवीत याबाबत ब्रम्हनिष्ठ वामनबुवांनी श्रीगुरुलीलामृतात अध्याय २० श्लो.४२,४३,मध्ये लिहून ठेवले आहे.

"त्या -त्या स्थळी नित्य लोकांची दाटी!
या अवतारिक पुरुषांच्याच गोष्टी!
कित्येक करविती चरणभेटी!
पोटासाठी उघडपणे व!!४२!!
श्री गुरु स्वामींच्या नावावर स्थापूनि मठ संस्थान मंदिर!
पुष्कळ लोक आपुला संसार!
निर्वेधपणे चालविती!!४३!!

एवढे मात्र निश्चित की श्री स्वामी समर्थांच्या निष्ठापूर्वक उपासनेतून निःशंक निर्भय राहता येते व सर्वांप्रती समत्वाचा आणि ममत्वाचा दृष्टिकोन निर्माण होऊन सुख समाधान आनंद लाभतो हा इथला बोध आहे.

श्री स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या