शके १७९४ (इ.स.१८७२) मध्ये सिंहस्थात वामनबुवा बडोदकर नाशिक त्र्यंबकेश्वर यात्रा करुन श्री सप्तशृंगी देवीचे दर्शनास गेले तेथे पूजाविधी आटोपल्यानंतर त्यांनी देवीचे मुखातील तांबूल प्रसाद मागितला तेव्हा तेथील पुजारी भोये उपहासात्मक बोलू लागले अक्कलकोटचे स्वामीमहाराज अवतारिक पूर्ण ब्रह्य असतील आणि त्यांचे चरणी तुमचे (वामनबुवांचे) खरे प्रेम असेल तर तुम्हास जगदंबा स्वमुखातील तांबूल देईल हे ऐकताच बुवांनी देवीची प्रार्थना करताच सप्तश्रृंग निवासिनी मातेच्या मुखातील तांबूल त्यांचे अंगावर पडला तो त्यांनी प्रसाद म्हणून भक्षण केला नंतर वामनबुवा आणि विद्वान ब्रह्यचारीबुवा यशवंतराव महादेव देव मामलेदार यांचे दर्शनास सटाण्यास जाऊन मग नाशकास गेले तेथे गंगा घागरीत भरुन घेऊन श्रीक्षेत्र पंढरपूरला गेले तेथे पांडुरंगावर गंगा घातली त्यावेळी त्यांना स्वामी महाराजांची मूर्ती दिसली पंढरपूराहून ते अक्कलकोटास गेले श्री स्वामी समर्थांपुढे श्री फलादि ठेवून त्यांना नमस्कार करताच श्री समर्थ म्हणाले सप्तश्रृंगीस जाऊन काय शंख केलात परंतु विडा आम्हासच द्यावा लागला आणि पंढरीनाथावरची गंगा आम्हास घ्यावी लागली हे अनुभव सिद्ध सर्वातर्यामित्वाचे आशीर्वाद युक्त भाषण ऐकून त्या दोघा बुवांस प्रेम आवरेना त्यांच्या नेत्रातून आनंदाश्र् वाहू लागले पुन्हा समर्थ रागाने बोलले मामलेदाराने श्री स्वामी चरणी त्यांनी क्षमा मागितली.



अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री गुरुलीलामृत रचियते वामनबुवांच्या संबंधात ही लीला आहे बुवांमध्ये साधुत्व मुळातच मुरलेले होते तीर्थक्षेत्रीच त्यांचे मन अधिक रमत असे श्री स्वामी समर्थांसारखा देव आणि सदगुरु त्यांच्या पाठीशी होते पण इतके सर्व असूनही श्री स्वामींचे आचार विचार धर्म आणि तत्त्वज्ञान जाणून घेण्यात वामनबुवा तोकडे पडत होते असे या लीलेतील त्यांच्या भटकंती वरुन दिसते ते श्री स्वामी समर्थांच्या सगुण अस्तित्वातून आणि स्वतःच्या कर्मकांडातून बाहेर पडलेले नव्हते सिंहस्थपर्वणी आटोपून नाशिक त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्री भेटी देऊन भ्रमंती करीत ते सप्तशृंगी देवीचे दर्शनास आले देवीचे मुखातील तांबुल मिळावा अशी त्यांची इच्छा होती पण देवीचे पुजारी भोपे यांचे उदगार अक्कलकोटचे स्वामीमहाराज अवतारिक पूर्ण ब्रह्य असतील आणि त्यांचे चरणी तुमचे (वामनबुवांचे) खरे प्रेम असेल तर तुम्हास जगदंबा स्वमुखातील तांबुल देईल काय दर्शवतात देवीच्या सदैव सहवासात असलेल्या आणि पूजा अर्चा करणाऱ्यांची बुद्धी आणि वृत्ती किती कोती होती याची कल्पना येते अक्कलकोटचे स्वामीमहाराज जर पूर्ण अवतारिक पूर्ण ब्रह्य असतील जर त्याचे चरणी तुमचे खरे प्रेम असेल तर जगदंबा तुम्हास स्वमुखातील तांबूल देईल अशी जर तर ची भाषा बोलण्याचा काय अर्थ व हेतू असू शकतो मुळातच त्या पूजारी आणि भोप्यांचे अध्यात्म भक्ती याबद्दलचे घोर अज्ञान सारेच वरवरचे यंत्रवत औपचारिक देवीच्या मुखातील तांबूल बुवांच्या अंगावर पडला हा त्या भोपी आणि पुजारी यांना सर्व सामान्यांसारखा चमत्कार वाटला त्या संपूर्ण घटनेच्या खोलात आणि कार्यकारण भावात ते गेले नाही देव देवतांच्या अष्टौप्रहर सहवासातल्यांची अशी स्थिती तर इतर सर्वसामान्यांबद्दल काय बोलावे सटाण्यास साधू देवमामलेदारांचे दर्शन घेऊन बुवा नाशिकला आले गोदावरी गंगेचे जल घेऊन पंढरपुरास आले पांडुरंगास गंगेचे स्नान घालताना बुवांना पांडुरंगाच्या जागी श्री स्वामी समर्थ असल्याचे दिसत होते जेथे जातो तेथे तू माझा सांगाती या संत तुकारामांच्या उक्तीचा अनुभव ते सर्वत्र घेत होते आणि अचंबित होत होते पण तरीही त्यांचे अतिरिक्त कर्मकांड अवास्तव पूजा अर्चा तीर्थयात्रांची भटकंती मात्र थांबत नव्हती तेव्हा श्री स्वामींनीच वामनबुवास स्पष्टपणे विचारले सप्तश्रृंग देवीच्या मुखातील विडा कोणी दिला आम्हीच ना पांडुरंगास नाशिकची घेतलेली गंगा कोणी घेतली आम्हीच ना यातून त्यांना बुवास असाच संकेत द्यावयाचा आहे की बुवा तुम्ही जेथे जेथे गेलात तेथे आम्ही तुमच्या बरोबरच आहोत हा देव तो देव हा गुरू तो गुरू हे तीर्थक्षेत्र ते तीर्थक्षेत्र करीत भटकत फिरणार्यांना वामनबुवांच्या संबंधित या लीलेमधून असा सुस्पष्ट अर्थबोध करुन दिला आहे की आपले कुलदैवत कुलदेवता इष्ट देवता आराध्य देवता वास्तू देवता आदि सर्व काही श्री स्वामी समर्थच निःशंक निर्भय होऊन त्यांचेच नामस्मरण करीत राहिल्यास यासारखी साधी सोपी सरळ वेळ श्रम व खर्च वाचवणारी दुसरी उपासना नाही.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या