स्वामीसुताच्या निर्वाणाच्या दिवशी महाराजांची वृत्ती चंचल झाली होती काकूबाईस स्वामीसुताच्या निर्वाणाची बातमी समजताच त्या खूप शोक करु लागल्या श्री स्वामींनी काकूचे बहुत प्रकारे समाधान सांत्वन केले काकूबाई विचारीत महाराज तुमच्या पदरात स्वामीसुतास घातले असता असे का झाले त्यावर महाराज उत्तर देत नाही गं त्याला मोठ्या जागेवर पाठविला आहे रडू नकोस परंतु तिची समजूत होईना.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

या विश्वातल्या सूक्ष्मातील अतिसूक्ष्म हाल चालींचाही वेध घेणाऱ्या श्री स्वामी समर्थांना स्वामी सुतांच्या मृत्यूबद्दल काहीच माहित नसेल अथवा या संबंधी काहीच कल्पना नसेल असे म्हणता येणार नाही मृत्यू हा अटळ ठरलेल्या वेळी ठरलेल्या जागी येणारच असतो कुणाच्याही मृत्यूबद्दलच्या नियोजनात ईश्वरी सत्ता सहजा सहजी ढवळाढवळ करीत नाही प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा अभिमन्यूच्या मृत्यूबाबत ढवळा ढवळ केली नाही जीवन मृत्यूच्या या चक्रात परमेश्वरी शक्तीचा या ना त्या कारणाने हस्तक्षेप वाढला तर या जीवसृष्टीत गोंधळ निर्माण होईल गुंतागुंत वाढेल जन्म मृत्यूचे चक्र ढळेल म्हणून ईश्वरी शक्तीचा वा सत्तेचा त्यात हस्तक्षेप नसतो श्री स्वामीच्या आज्ञेनुसार स्वामीसुत अक्कलकोटला आले असते तर कदाचित वेगळे काही घडू शकले असते पण ते का आले नाहीत याचा उल्लेख या अगोदर आला आहेच शेवटी श्री स्वामींनी स्वामी सुतास निर्वाणीचा निरोप पाठविला होता तोफ लावून तयार करुन ठेविली आहे आला तर बरे नाही तर झोपडी उडवून लावतो या उदगारातून स्वामीसुताच्या निर्वाणाचा सुस्पष्टसंकेत मिळतो स्वामीसुत अक्कलकोटला आले नाही तोफ लावून स्वामीसुताची झोपडी उडवणे श्री स्वामींना भाग पडले श्री स्वामी लोकसमुहात वावरत होते जरी ते देव होते तरी त्यांना तुमच्या आमच्यासारखेच मानवी वर्तन करावे लागत होते स्वामीसुताच्या निर्वाणाच्या दिवशी महाराज विपरीत लीला दाखवित होते त्यादिवशी त्यांनी पलंगावरुन धाडकन अंग जमिनीवर टाकून कपाळास हात लावून ते जमिनीवर उदासिन बसले तेथून ते ओसरीवर गेले तेथून ओंडकरांच्या वाड्यात गेले ओंडकरांनी श्री स्वामींस स्नान करता का म्हणून विचारताच ते होय म्हणाले त्यांनी स्नान केले पण अंग पुसू दिले नाही की स्वतःही पुसले नाही सेवेकरी स्नानानंतर त्यांना भस्म लावीत पण त्या दिवशी त्यांनी कुणासही त्यांच्या अंगास भस्म लावू दिले नाही स्वतःच्या हातानेच अंगास भस्म लावले गंध लावू दिले नाही त्यांच्या ह्या सर्व कृतीचा मथितार्थ इतकाच की माझा प्राणप्रिय सूत आता मला सोडून गेला आहे तर मी गंध भस्म आदि कसे लावून घेऊ आरती कशी ओवाळून घेऊ पुराणात प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण आदि देवसुद्धा दुःखी झाले होते देव दुःखी होतो पण शोक करीत बसत नाही श्री स्वामी समर्थ त्यास अपवाद कसे असतील हे आपण शांतपणे जाणून घेतले पाहिजे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या