एके दिवशी श्री स्वामी समर्थांची स्वारी नळदुर्ग या तालुक्याच्या गावी गेली बैरामजी हा पारशी या तालुक्याचा तालुकादार (मामलेदार) होता त्याच्या हाताखालच्या कारकुनांनी जेव्हा श्री स्वामी दर्शनाकरिता एक तासाची रजा त्यांच्याकडे मागितली तेव्हा तो कारकुनास रागावून म्हणाला तुम्ही जंगली मूर्ख लोक मनुष्याचे दर्शन घेऊन तुम्हास काय लाभ होणार अशा संन्याशाच्या साधूसंतांच्या नादी लागून त्यांना कधीही वंदन करु नये त्याच दिवशी हैद्राबादेहून दिवाण सर सालारजंग आले होते त्यांचे श्री स्वामी चरणी फार प्रेम होते ते श्री स्वामींच्या दर्शनास निघाल्यामुळे अनायसे सर्व कारकूनही त्यांच्या समवेत श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास निघाले बैरामजीस काही बोलता येईना त्या सर्वांनी श्री स्वामींचे दर्शन घेतले नंतर श्री स्वामींची आज्ञा घेऊन दिवाण हैद्राबादेस गेले दुसरे दिवशी बैरामजीने सर्व कारकुनास श्री स्वामींच्या दर्शनास गेल्याबद्दल दंड केला तेव्हा सर्व कारकुनांनी बैरामजीला श्री स्वामी समर्थांजवळ नेऊन त्याची खोड मोडण्याचे ठरविले तेव्हा ते बैरामजीस विनंती करु लागले की आज त्या संन्याशाजवळ पुष्कळ यात्रा जमली आहे तेव्हा गंमत पाहण्यास जाऊ कारकुनांच्या आग्रहाखातर बैरामजी फक्त गमंत पाहण्यासाठी श्री स्वामी समर्थांकडे आला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलेत बैरामजी नळदुर्ग तालुक्याचे मामलेदार त्यांच्या हाताखालचे कारकुन आणि या सर्वांचे वरिष्ठ हैद्राबादचे दिवाण सर सालारजंग यांचा उल्लेख आलेला आहे अधिकार पदामुळे हट्टी दुराग्रही आणि अहंभावी बनलेला बैरामजी असे बैरामजी सद्यःस्थितीतही अनेक कचेर्यात आढळतात स्वतःच्या पलीकडे पाहण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नसते काही प्रसंग घटनांच्या बाबत ते सारासर विवेक गमावून बसलेले असतात स्वतःच्या कठोर शिस्तीच्या अहंपणाला कुरवाळीत असतानाच मागचा पुढचा कोणताही विचार न करता ते श्री स्वामीं सारख्या परब्रम्हास कशी दूषणे देतात त्याचा उल्लेख या लीलेत आलेला आहे आपण कोणाबद्दल काय बोलतो याचेही भान अनेकदा ते गमावून बसतात या लीलेत बैरामजीच्या हाताखाली काम करणारे कारकून फार ज्ञानी जरी नसले तरी साधे भोळे सरळ आणि श्री स्वामीनिष्ठ आहेत त्या निष्ठेपोटीच श्री स्वामींच्या दर्शनासाठी ते एक तासाची सुटी बैरामजीकडे मागतात सालारजंग दिवाणामुळे त्यांना श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास जाण्यास मिळते याचा त्यांना आनंद होतो परमेश्वरास असे साधे भोळे निरागस भक्त फार प्रिय असतात आपण किती ज्ञानी किती श्रीमंत कोणत्या हुद्यावर याचा विचार करीत देव दर्शन घेण्यापेक्षा त्या साध्या भोळ्या कारकुनांसारखे होऊन नाही का दर्शन घेता येणार महत्त्वाचे अति महत्त्वाचे फार फार महत्त्वाचे असे पास घेऊन दर्शन घेऊन खरंच का काही पुण्य पदरात पडते तर आपण बैरामजीसारखे वर्तन न करता कारकुनांच्या वृत्तीने वर्तन करुन देवदर्शन घेणे हा इथला बोध आहे हैद्राबादचे दिवाण सर सालारजंग हे सर्वच बाबतीत मोठे होते त्यांनी किती विनम्रपणे श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले दर्शनास आलेल्या कारकुनांना ते चकार शब्दही बोलले नाहीत या सर्व घटना आपणास निश्चितच आत्म प्रबोधित करणाऱ्या आहेत.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या