शके १७९२ (इ.स.१८७०) साली वामनबुवा बडोदकर नाशकातील महतपुरुष संन्याशी घोलप स्वामींना भेटले त्यांनी बुवास सांगितले की किमया करणारा एक संन्याशी पलीकडे उतरला आहे भगवा वेष आहे पण विवेक वैराग्याचा गंधही नाही तुमची मर्जी असल्यास त्याजकडे जा आमची त्याची भेट झाली आहे घोलप स्वामींचे हे भाषण ऐकून वामनबुवा काही मंडळी समवेत त्या किमयागार संन्याशाकडे गेले त्याचे भाषण ऐकण्याकरिता त्याचेजवळ बसले अगोदरच त्याच्याजवळ नारायणशास्त्री आचार्यांसारखी पाच सहा विद्वान मंडळी बसलेली होती संन्याशांचे आणि त्याचे अद्वातद्वा भाषण चालले होते नंतर तो संन्याशी वामनबुवांकडे वळून म्हणाला आम्ही नित्य प्रातःकाळी वनस्पतीचेच तीन चार तोळे सोने तयार करतो हे पाहा असे म्हणून त्याने बुवास सोने दाखविले पुन्हा तो संन्यासी म्हणाला चिलमीतही आम्ही तोळा अर्धा तोळा सोने करतो मी तर काय पण गोरक्ष मच्छिंद्रादिकांनी किमया करुन योग्यता मिळविली श्री गुरुदत्तात्रयांनी किमयेकरिता अवतार धारण केला किमयेने राम कृष्ण अवतार पूज्य मानले गेले सारांश किमया करील तोच साधू तोच अवतारी योगी महात्मा म्हणावा द्रव्य नसले म्हणजे नाना प्रकारचे वेष धारण करुन पोटार्थी दारोदार भीक मागतात ते भीक मागणे तोंड विचकणे ही साधुंची लक्षणे आहेत काय भिक्षा मागणार्याचा धिक्कार असो ज्याच्यावर ईश्वराची पूर्ण कृपा आहे ते कधीच भीक मागणार नाहीत.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

वामनबुवा हे स्वामीनिष्ठ सेवेकरी होते श्री स्वामींच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता तसेच नाशिकला पंचवटीत कपालेश्वराचे देवळात बाबा घोलप म्हणून एक थोर वेदांत पंडित होते ते तपाने महतपुरुष आणि थोर संन्यासी होते वामनबुवांनी गंगास्नानानंतर मनोभावे घोलपस्वामींचे दर्शन घेतले यातच घोलप स्वामींची आध्यात्मिक योग्यता अधोरेखित होते घोलपस्वामींनी वामनबुवास या अगोदर वर्णन केलेल्या किमयागार संन्याशाबद्दल स्पष्ट शब्दात सांगितले की त्याने फक्त भगवा वेष परिधान केला आहे पण त्याला विवेक वैराग्याचा गंधही नाही वामनबुवांची मर्जी असल्यास त्यांनी त्याचेकडे जावे अथवा न जावे घोलप स्वामींनी त्या संन्याशाकडे जाण्यास वामनबुवास शिफारस अथवा सक्ती केली नाही हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे कारण त्यांची एकदा त्याच्याशी भेट झाल्याचे व तो कसा असल्याचे त्यांनी बुवास स्पष्ट केले होते पण वामनबुवा उत्सुकतेपोटी काही माणसांसमवेत त्या किमयागार संन्याशाकडे गेलेच मुळात बुवांचा स्वभाव हा चंचल चौकस अनावश्यक चिकित्सक होता संन्याशाची लक्षणे बुवास ठाऊक असतीलच तरीही त्या लक्षणाविरुद्ध तो संन्याशी वर्तन करीत होता बोलत होता अशा संन्याशाजवळ तेत्याचे भाषण ऐकण्यासाठी नम्रतेने जाऊन बसले बघूया काय म्हणतोय तो किमयागार संन्यासी अशी वामनबुवांची डळमळीत मनोभावना होती श्री स्वामी समर्थ सान्निध्यास पात्र होण्याची त्यांची परिपूर्ण तयारी अजून व्हायची होती हे यावरुन दिसते किमयागार संन्याशाचे उन्मत्त बोलणे चालणे वरील लीला भागात आले आहेच त्याने गोरक्ष मच्छिंद्रनाथ श्री गुरुदत्त प्रभूंचा रामकृष्ण यांचाही उल्लेख केला आहे त्यांच्या अवताराचा हेतू ही स्पष्ट केला आहे तो सर्वथा अयोग्य व चुकीचा आहे साधू अवतारी महात्मा कोणास म्हणावे हे ही शहाजोगासारखे तो बेधडक सांगतो असे लोक सद्यःस्थितीतही पाहवयास मिळतात असलेल्या सोन्याचे दुप्पट तिप्पट करुन देतो अमूक एखाद्या धातूचे सोने करुन देतो अशा विविध प्रकारच्या भूलथापा देऊन गरीब साध्या भोळ्या लोकांची लुबाडणूक करणारे त्यांना फसविणारे असे किमयागार साधू संन्याशी बरेच आढळतात त्यापासून आपण कसे सावध व्हायचे हाच खरा प्रश्न आहे हा प्रश्न ज्या त्या व्यक्तीने सदसदविवेकाने सोडवायचा आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या