श्री स्वामींनी मल्लिकार्जुनास जे मुखवस्त्र दिले होते ते त्याने पूजेस लावून तो श्री समर्थ नावाचा अंगारा लोकांस देत असे त्याचा पुष्कळ लोकांना गुण येत असे त्यामुळे त्याची लोकात प्रसिद्धी होऊ लागली त्याला द्रव्यही पुष्कळ मिळू लागले परंतु त्या द्रव्याचा उपयोग तो जंगम भोजनाकडे करीत असे एके वर्षी श्रावण महिन्यात भगवंताचे बार्शीस सात दिवस जंगम भोजन घालण्याचा मल्लिकार्जुनाने संकल्प करुन सुरुवात केली त्यावेळी श्री स्वामी महाराज अक्कलकोटी राजवाड्यात होते त्यांनी सात दिवस भोजन केले नाही म्हणून सेवेकरी व राजेसाहेब श्री स्वामींस म्हणाले महाराज आज सात दिवस झाले आपले भोजन झाले नाही समर्थ म्हणाले आम्ही बार्शीस मल्लिकार्जुन जंगमाकडे भोजन करुन तृप्त होतो हे ऐकून सर्वांस मोठे आश्चर्य वाटले कारण महाराज तर आज सात दिवस येथेच राजवाड्यात आहेत आणि बार्शीस भोजनास जातो म्हणतात तर हे खरे की खोटे हे पाहवे म्हणून राजेसाहेबांनी बार्शीस स्वार पाठवून जंगामास विचारण्यास सांगितले स्वार तेथे जाऊन जंगमास विचारु लागला तेव्हा सर्व जंगम सांगू लागले की महाराज आज सात दिवस आमचे पंक्तीस भोजनास असतात हे वर्तमान स्वाराने राजास व सर्व सेवेकरी मंडळीस सांगितले सर्वांस आश्चर्य वाटून त्या सर्वांनी समर्थ नामाचा जयजयकार केला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थांनी मल्लिकार्जुनाची भक्ती निष्ठा जोखली होती श्री स्वामींनी त्यास आपणा सारिखे करिती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी या उक्तिनुसार मल्लिकार्जुनास मुखवस्त्र देऊन त्यांच्यात स्वतःमधील किंचित सामर्थ्य संक्रमित केले होते त्या सामर्थ्याच्या बळावर श्री स्वामींनी दिलेले मुखवस्त्र पूजेस लावून तो श्री स्वामी समर्थ नावाचा अंगारा लोकास देऊ लागला श्री स्वामीनामाने दिलेल्या भस्म अंगार्यांनी लोकांना गुण येऊ लागला मल्लिकार्जुनाकडे पैशाचा ओघ सुरू झाला परंतु हे यश पैसा श्री समर्थकृपेने प्राप्त झालेली सिद्धी त्याच्या डोक्यात गेली नाही याची आपण सर्वांनीच येथे नोंद घेण्यासारखी आहे स्वामीनाम मोठे बाकी सर्व खोटे या विनम्र सेवा भावी वृत्तीनेच तो सदैव वागत राहिला प्राप्त होत असलेल्या द्रव्याचा उपयोग तो गरजू भुकेलेल्यांच्या भोजनासाठी करीत असे त्याच्या या वृत्तीमुळेच श्री स्वामी अक्कलकोटातील राजवाड्यातील मिष्टान्ना पेक्षाही बार्शीत घातल्या जाणाऱ्या सामूहिक जेवणा वळीत जेवून तृप्त झाले श्री स्वामी समर्थास तेवीस सिद्धी प्राप्त असल्यामुळे एकाच वेळी ते बार्शीत आणि अक्कलकोटात होते (कामरुप अथवा बहुरुप सिद्धीने एकाच वेळी अनेक ठिकाणी वावरता येते) हा लीला कथाभाग आपणास काय प्रबोधित करतो मल्लिकार्जुना सारखी निरागस निर्मोही भक्ती काहीही कमी पडू देत नाही श्री स्वामींच्या कृपेने जे जे प्राप्त होईल उदा.द्रव्य नावलौकिक ते सर्व त्यांच्याच चरणाशी समर्पित करण्याची समर्पणाची शरणागत भावना मिळालेल्या द्रव्याचाही उपयोग बहुजन सुखाय बहुजन हिताय साठीच करणे स्वामीनाम मोठे बाकी सर्व खोटे हाच इथला मोठा बोध आहे बखर २५७/१/२/३ याचा एकत्रित अर्थबोध सद्यःस्थितीतही आपणास फार प्रबोधित करणारा आहे मल्लिकार्जुचा त्या वेळचा काळ श्री स्वामी समर्थांचा तेव्हा सदेह वावर आणि अस्तित्व होते हे तर खरेच पण सद्यःस्थितीतही श्री स्वामी समर्थ निर्गुण निराकार स्वरुपात त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती देतात पण त्यासाठी हवा असतो शुद्ध पवित्र निर्मोही विचार आणि व्यवहार प्रखर निष्ठा आणि सेवाभाव अशा स्वरुपाच्या श्री स्वामी समर्थांच्या उपासनेने आजही ते भिऊ नकोस मी पाठीशी आहे व मैं गया नही जिंदा हूँ याची प्रचिती देतात.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या