श्रीपाद भटाचा स्वामीचरणी पूर्ण विश्वास असल्या कारणाने पाच सहा आसामी व कंदील घेऊन तो पलीकडच्या मळ्यात गेला तेथे एक पोक्त वयाची बाई एका झाडाखाली उभी होती तिच्याजवळ जाऊन तिला नमस्कार करुन श्रीपाद भटाने तिला विचारले येथून गाव किती लांब आहे आणि काही अन्नाची सोय होईल काय त्यावर ती बाई सांगू लागली आज आमच्या गावातील काही मंडळी येथे भोजनास यावयाची होती त्यांच्याकरिता स्वयंपाक तयार करुन ठेवला आहे अद्याप कोणीही आले नाही या अन्नाचे काय करावे म्हणून मी मोठ्या काळजीत आहे तुम्ही आलात फार चांगली गोष्ट झाली आता कृपा करुन हे तयार अन्न घेऊन जा येथे पाणीही आहे तेव्हा श्रीपाद भट आणि त्यांच्या बरोबरचे अन्न घेऊन निघाले तेवढ्यात श्रीपाद भटाने बाईस विचारले तुम्ही येथे एकट्या कशा राहाल आमच्या बरोबर स्वामी महाराजांच्या दर्शनास चला यावर त्या बाई हात जोडून म्हणाल्या श्री स्वामी महाराजांना माझा नमस्कार सांगा माझे नाव अन्नपूर्णा मी मागाहून दर्शनास येते तुम्ही पुढे चला श्रीपाद भट व बरोबरची मंडळी अन्न घेऊन निघाली श्रीपाद भटाने मागे पाहिले तो ती बाई दिसेनाशी झाली या चमत्काराचे सर्वांनाच आश्चर्य वाटले जेथे स्वामी महाराज होते तेथे ती मंडळी अन्न घेऊन आली श्री स्वामी समर्थांना नैवेद्य समर्पित करुन सर्वांची येथेच्छ भोजने झाली आनंदाने इकडच्या तिकडच्या गोष्टी सुरू होत्या इतक्यात बाबा जाधवाने श्री स्वामींस विचारले महाराज ती बाई कोठील कोण त्यावर महाराज उत्तरले ती आमच्याच कुटुंबातील होती तेव्हा सर्वांची खात्री झाली की महाराज म्हणत होते अन्नपूर्णाकडे भोजनाला चला तर हीच मातोश्री संपूर्ण जगाला अन्न पुरविणारी.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

या लीलेच्या उत्तरार्धात श्री स्वामी समर्थांच्या या लीलेचा कळस आहे नितांत श्रद्धा आणि सदगुरुवर पूर्ण विश्वास असल्याचे श्रीपाद भट हे एक उदाहरण आहे या श्रद्धा आणि विश्वासालाच अन्नपूर्णेच्या रुपाने रसाळ फळे आली त्याचेही वृत्त या लीलेत वर वर्णन केल्याप्रमाणे आले आहे श्रीपाद भट आणि अन्नपूर्णा यांच्यातील संवाद आशयपूर्ण माणुसकीने आत्मियतेने ओतप्रोत भरलेला आहे एखादी आई आपल्या मुलाबाळांची जशी काळजी घेते तेवढ्याच ममतेने ती पोक्तबाई (अन्नपूर्णा) बोलत असल्याचे या लीलेत दिसते अन्न पाणी ह्या दोहोंचीही गरज प्रत्येक जीवाच्या उदरभरणासाठी असते अन्न घेऊन जा येथे पाणीही आहे हे सांगण्यास ती विसरली नाही श्रीपाद भट जेव्हा अन्नपूर्णेस श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास चला म्हणून सांगतो तेव्हा अन्नपूर्णा देवीचे वक्तव्य अतिशय विनम्रतेचे आहे आपण या लोकांना अन्न पाणी देऊन खूप काही उपकार करीत आहोत असा अहंपणाचा थोडासुद्धा लवलेश तिचे ठायी नाही अन्नपाणी देणारी ती अन्नपूर्णा तर आहेच पण सर्वांचीच मातोश्री वाटावी असे तिचे वर्तन आहे शिवाय महाराजही ती आमच्याच कुटुंबातील होती असे जे म्हणाले त्यात श्री स्वामींच्या कूळाचा जात पात धर्म पंथ गरीब श्रीमंत काहीही न पाहता सदा सर्वदा सर्वांना मदत करणे हेच ते सर्वश्रेष्ठ कुळ हा जो मथितार्थ आहे तो सर्वांनीच लक्षात घ्यायला हवा.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या