हरिभाऊंनी मुंबईत येताच श्री स्वामी आज्ञेनुसार सर्व चीज वस्तू लुटविल्या हरिभाऊंच्या पत्नी ताराबाई यांच्या अंगावरील दागिने मित्राकरवी विकून ते पैसे ब्राम्हणास वाटून दिले हरिभाऊंस सुवर्ण लोहासमान वाटू लागले त्यांनी ताराबाईच्या अंगावरचे सौभाग्य लेणे असलेले मणिमंगळसूत्रही राहू दिले नाही सोने नाणे दागिने सर्व लुटवून त्यांनी भगवी वस्त्रे धारण केली ताराबाईस एक पांढरे पातळ नेसण्यास देऊन हरिभाऊ निव्वळ बैरागी झाले आणि गळ्यात घातलेली वीणा त्यांनी तीन वर्षे काढली नाही श्री स्वामी समर्थांविषयी ते प्रेमळ भजन करीत भजन करताना ते देहभान हरपून जात ते रोज नवनवे अभंग करीत त्यांची पत्नी ताराबाई श्री स्वामी सुतांच्या या कडकडीत वैराग्यावर तंटा करीत असे पण त्याबद्दल काहीही खेद न करता जगदगुरु संत तुकारामाप्रमाणे जो जो बायको शिव्या देई तो तो हरिभाऊ जास्तच हसत.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

या लीला भागात श्री स्वामी समर्थांचा हरिभाऊंवर कसा परिणाम झाला त्यांना एवढे वैराग्य का आले त्या मागचा महाराजांचा हेतू काय होता आदि प्रश्नांचा शोध आणि बोध घेण्याचा प्रयत्न करु या श्री स्वामींनी हरिभाऊ तावड्यांमध्ये टप्या टप्याने बदल घडवून आणले त्यांची मनोभूमिका विरक्ती अनासक्तीकडे वळविली त्यासाठी त्यांनी वापरलेल्या क्लृप्त्या या अगोदरच्या हरिभाऊंशी संबंधित लीलांमध्ये आलेल्या आहेत श्री स्वामींनी अभिमंत्रित केलेल्या पादुका हरिभाऊंच्या मस्तकावर ठेवल्या चमत्कार घडावा त्याप्रमाणे हरिभाऊंमध्ये अवधूतत्व पूर्ण वैराग्य रोमारोमांत भिनले आता हरिभाऊ श्री स्वामींचे सूत झाले होते मुंबईस आल्याआल्या त्यांनी सदगुरु आदेशानुसार स्वतःचा संसार खरोखरच लुटविला त्यांच्या पत्नीच्या अंगावरील साठ तोळे सोन्याचे तोडे चोवीस तोळ्याच्या बांगड्या अठरा पुतळ्यांचे गाठले ठुशी आदि दागिने हरिभाऊंनी मित्राकरवी विकले आलेली सर्व रक्कम ब्राम्हणास वाटून दिली त्यांची पत्नी ताराबाईने संसार त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटविले जात असताना आकांत मांडला रडून रडून त्यांचे डोळे सुजले थोडे तरी दागिने राहू द्यावे ही पत्नी ताराबाईची विनवणीही मानली नाही पत्नीच्या गळ्यात मणिमंगळसूत्रही राहू दिले नाही पत्नीस नेसावयास एक पांढरे पातळ व स्वतःसाठी अंगावरील भगवी वस्त्रेच काय ती त्यांनी ठेवली बाकी सर्व संसार संसारातील किडूक मिडूक आदि वाटून ते पूर्ण विरक्त झाले त्यांच्या वैराग्याची ही परम सीमा होती नोकरीतला रस तर श्री स्वामींच्या प्रथम दर्शन भेटीतच निघून गेला होता आता त्यातूनही ते पूर्ण मुक्त झाले होते श्री स्वामींनी स्वामीतात एवढे वैराग्य निर्माण केले याचे कारण स्वामीसुतांनी दर्याकिनारी किल्ला बांधून जनसेवेचा ध्वज अधिकाधिक उंच न्यावा हा लोकाभिमुख उद्देश श्री स्वामींचा होता तेव्हा अनेकांना अक्कलकोटापेक्षा मुंबई जाण्या येण्याच्या दृष्टीने अधिक सोयीची जवळची आणि स्वस्त होती ते अनेकांना मार्गदर्शनासाठी स्वामीसुताकडे पाठवत श्री स्वामी समर्थांसारखा सदगुरु आपल्या शिष्यासाठी काय करु शकतो हे सर्व का करतो हे सहजच लक्षात येते यासाठी स्वामी सुतासारखी निरिच्छ निखळ ह्रदयाच्या तळापासून आणि बेंबीच्या देठापासून भक्ती करावी लागते हाच इथला महत्त्वाचा अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या