गोविंदरावांनी मुंबईस आल्यावर तीर्थयात्रेबद्दल मावंदे केले त्यात लक्ष्मण विनायक पंडित नावाच्या ब्राम्हणास अक्कलकोटची गोष्ट ऐकून आश्चर्य वाटले लक्ष्मणरावाला गवताच्या व्यापारात तोटा होऊन सर्व कर्ज झाल्यामुळे तो चिंतेत होता माझे कर्ज जर आठ दिवसात फिटले तर आपण अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी समर्थांचे दास होऊ गोविंदरावांनी पंडितास सांगितले की तुमच्या निश्चयाप्रमाणे तुमचे कार्य खचित होईल हरिभाऊ तावडे आणि गजानन श्रीधर खत्री आठव्या दिवशी लक्ष्मण पंडिताकडे गेले आणि त्यांस सांगितले की आम्हा दोघांस तोटा होऊन आमचे दिवाळे निघणार आणि आमची नोकरीही जाणार तुम्ही आमचे मित्र म्हणून तुमच्याकडे आलो तरी आमच्याबरोबर दुकानावर येऊन आमच्याबद्दलची सही द्या त्यात जो तोटा होईल तो आणि तुमची कर्जाची रक्कम मिळून तुम्ही लहा घ्या (जामीन राहा) म्हणजे झाले लहा घेण्यास आम्ही मदत करु पंडितास त्या दोघांचे म्हणणे मान्य होऊन त्याने पेढीवर जाऊन तीन दिवसात त्या दोघांकडची जी रक्कम असेल ती भरुन देऊ असे हमीपत्र लक्ष्मण पंडितांनी सही करुन लिहून दिले.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

गोविंदराव तीर्थयात्रा करुन मुंबईस आले नंतर त्याबद्दल त्यांनी मावंदे घातले श्री स्वामींबद्दल आलेल्या प्रचितीची कहाणी गोविंदरावांच्या तोंडून ऐकल्यावर लक्ष्मण पंडितास आश्चर्य वाटले अक्कलकोटचे महाराज आपल्याही अडीअडचणीचे निराकरण करतील असा त्यास विश्वास वाटू लागला म्हणूनच तो म्हणाला माझे कर्ज जर आठ दिवसात फिटले तर आपण अक्कलकोटास जाऊन श्री समर्थांचे दास होऊ गोविंदरावास श्री स्वामींचा अनुभव आलेला होता त्यांनी लक्ष्मण पंडितास खात्री दिली की तुमचे कार्य खचित होईल लक्ष्मण पंडिताला कर्ज झाले होते ते लवकरात लवकर फिटावे या चिंतेत ते होते साधारणतः आनंदात परमेश्वराची आठवण क्वचितचयेते दुःख अडचणी पीडा संकटे परमेश्वराची आठवण करुन देतात पंडित गळ्यापर्यंत कर्जात बुडाल्याने त्यास देवाची आठवण येणे साहजिकच होते गोविंदरावांनी लक्ष्मण पंडितास मावंदे घालण्याचे कारण सांगितले त्यातूनच त्यांस श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेण्याची व भेटण्याची उर्मी निर्माण झाली त्यामुळे तर लक्ष्मण पंडितानेही श्री स्वामींस नवस केला पंडिताचा बुडत्याचा पाय खोलात म्हणून की काय ते हरिभाऊ तावडे व गजानन खत्री यांच्या बुडीत व्यवहारास जामीन राहिल्याने त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली येथे लक्ष्मण पंडित हे साधे सुधे सरळ प्रापंचिक गृहस्थ वाटतात कारण ते स्वतः कर्जात गळ्यापर्यंत बुडालेले असतानाही हरिभाऊस आणि खत्रीस जामीन राहिले व्यवहारात इतका चांगुलपणा आणि भलेपणा चालत नाही तेव्हा एकवेळ ठीक होते पण सद्यःस्थितीत तर तो पूर्णतः अव्यवहारी पणा अथवा मूर्खपणाच ठरेल यातील पूर्व सुकृताचा भाग म्हणा वा त्यांचे पूर्वप्रारब्ध म्हणा पंडितांना गोविंदरावांसारख्याच्या घरी मावंद्याच्या निमित्ताने जाता आले आणि अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या त्यातूनच ते नवस बोलले अक्कलकोटला श्री स्वामींकडे मार्गस्थ होण्याचा त्यांना शुभ संकेत मिळाला हा सुसंकेतच त्यांना लाभदायी ठरला.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या