मुंबईचे दामोदरजी यांनी एक दिवस समर्थांस विचारले महाराज आपण एक वेळ मुंबईस येऊन सर्वांस दर्शन द्यावे हे त्यांचे भाषण ऐकून समर्थ म्हणाले मुंबई काय आता आम्हास नवीन पाहयची आहे आम्ही पंचवीस वर्षे मुंबईस होतो ते म्हणाले महाराज आपण कोठे होता महाराज म्हणाले वाळकेश्वराचे देवळाचे मागले बाजूच्या कोठडीत होतो हे ऐकून सर्वांची खात्री झाली.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

श्री स्वामी समर्थांचा अवतार अगम्य आणि अतर्क्य आहे या ग्रंथाच्या सुरुवातीसच श्री स्वामींचे प्रकटिकरण भ्रमण आणि स्वरुपाबाबत सविस्तर वर्णन आले आहे अनेकदा अनेक लोक त्यांना विविध प्रश्न विचारत श्री स्वामी जो कोणी जसा प्रश्न विचारेल त्याला तसे उत्तर देत प्रसंगी संकेताने एखादी गूढ अनाकलनीय कृती करुन उत्तरे देत या लीला कथेत मुंबईच्या दामोदरजीस दिलेल्या उत्तरात श्री स्वामी महाराज मुंबईस पंचवीस वर्षे राहिले असतीलही या ग्रंथाच्या सुरुवातीस दिलेल्या त्यांच्या भ्रमणावरुन याची कल्पना येते महाराज आपण एक वेळ मुंबईस येऊन सर्वांस दर्शन द्यावे या श्री दामोदरजीच्या विनंती मागचा मथितार्थ समजून घेणे उचित ठरेल वास्तविक श्री स्वामींनी मुंबईस येऊन दर्शन द्यावे या मागे श्री दामोदरजीचा साधा भोळा भाबडा भाव व हेतू दिसून येतो श्री स्वामींनी आपण मुंबईस पंचवीस वर्षे वाळकेश्वराच्या देवळाच्या मागील कोठडीत होतो श्री स्वामींच्या या उदगाराचा गूढ अर्थ समजून घेऊ या श्री स्वामी हे तुमच्या आमच्यासारखे देहस्थितीत देह जाणिवात कमी आणि बहुतेक वेळा ब्रह्यतत्वाशी एकरुप झालेले असत म्हणून त्यांचे हे उदगार ब्रह्यभावाच्या दृष्टीने समजून घ्यावयास हवेत श्री स्वामींच्या दृष्टीने मानवी नरदेह ही मुंबई ती मुळची मूलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध आज्ञा आणि सहस्त्रार यासारख्या सात बेटावर वसली आहे देहातील महालक्ष्मी जगदंबास्वरुप कुंडलिनी ही या देह स्वरुप मुंबईची देवी देहाचा शिरो भाग म्हणजे वाळकेश्वराचे मंदिर लहान व मोठा मेंदू ह्या शिरा भागाच्या मागील बाजूच्या कोठड्या या कोठड्यातच शिवात्मा राहतो हे झाले देहरुपी मुंबईबाबत प्रत्येकाला प्राप्त झालेला देह अनमोल असतो पण तो फुकट अगदी सहज मळालेला असतो म्हणून त्याचे मोल कुणास वाटत नाही खरं तर त्याचं पावित्र्य आणि महत्त्व एखाद्या मंदिरासारखं आहे पण हे आपण जपतो का तसे आपल्या देहास मानतो का आता त्यांच्या उत्तरातील पंचवीस वर्षाच्या कालावधीचा देहाच्या अनुषंगाने विचार करु या १) अन्नमयप्राणमय मनोमय विज्ञानमय व आनंदमय असे पाच कोष २) हात पाय वाचा लिंग व गुद ही पाच कर्मेंद्रिये ३) डोळे कान त्वचा नाक व जीभ ही पाच ज्ञानेंद्रिय याच्याशी निगडित असलेले काम क्रोध राग लोभ मोह मत्सर हे षडरिपू आणि वासना विकार अलिप्तता लिप्तता यासारखे दहा विषय याच्याशी गुंठीत होऊन देहाचा होणारा हा पंचवीस वर्षाचा कालवधी (५+५+५+१०=२५) पण आपणच आपल्या देहाचा असा शोध व बोध घेत नाही तो गांभिर्याने घ्यायला हवा श्री स्वामी समर्थ हे चैतन्य स्वरुप शिवात्मा आहेत त्यास या मुंबईत म्हणजे या देहाबाबत आता नव्याने काय पाहवयाचे अथवा जाणून घ्यावयाचे शिल्लक राहिले आहे हा त्यांच्या उत्तराचा मथितार्थ आहे या शिवात्म्याने म्हणजे श्री स्वामींनी मुंबई सोडली व ते आता अक्कलकोट म्हणजे सहस्त्रात म्हणजे खर्या अर्थाने बुद्धीत आकलनात समजून जाणून घेण्यात स्थिरावले आहेत हेच तर बुद्धीचं आशय सूत्र सर्वांनी स्मरणात ठेवावयाचे आहे दामोदरजीसारखा सामान्य जीव जरी शिवात्म्याला म्हणजे श्री स्वामींना मुंबईस (या अगोदर स्पष्ट केलेला मथितार्थ) येण्याबाबत पाचारण करीत असला तरी त्यांना अलिप्त विरक्त आणि निरिच्छेमुळे मुंबईचे आकर्षन वा ओढ राहिली नाही देह देहाचे लाड कोड कौतुक मनाचा अनिर्बध पणा अज्ञान आदीबाबत बरेच काही सूचित करणारी ही लीला आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या