सुंदराबाई काही दिवस निराहार करीत असे परंतु महाराजांस नित्य पक्वान्ने नैवेद्यास आलेले पाहिल्यावर जेणेकरुन बाईच्या तोंडास पाणी सुटून त्या जिनसांचा ती रात्री उपयोग करत असे या तिच्या कृत्यावर एकाने निराहार करते चोरून खाते अशी कविता केली होती ती कविता ऐकून श्री स्वामी समर्थ खदखदा हसत


अर्थ भावार्थ मथितार्थ 

श्री स्वामी समर्थ पुढे दररोज सकाळ सायंकाळ पक्वान्नाचे नैवेद्य पेढे फळे अन्य अनेक चविष्ट पदार्थ येत असत श्री स्वामींना या सर्व कशाची म्हणून यत्किंचितही आसक्ती नव्हती ते सदासर्वदा तृप्त निर्मोही निर्लेप असत परंतु त्यांच्या सेवेस आलेल्या सुंदराबाईस कधी कधी निराहार म्हणजे उपवास असे मात्र सर्वच बाबतीतील तिची आसक्ती पराकोटीची होती खाद्यपदार्थ हे त्यात अपवाद नव्हते जीभेची गणना कर्मेंद्रियात आणि ज्ञानेंद्रियात होत असते बोलण्यास आणि खाण्यास जीभ साहाय्यभूत होत असते त्यावर योग्य तो संयम सदैव ठेवावा लागतो पण या दोहोवरही तिचा संयम नव्हता तिचा निराहार हा दिवसा इतरांना दाखविण्यासाठी असायचा पण रात्री मात्र ती श्री स्वामींपुढे येणाऱ्या जिनसांवर यथेच्छ ताव मारीत असे म्हणजे रात्री इतरांच्या नजरा चुकवून चोरुन ती खात असे दिवसभर या ना त्या कारणावरुन तिची तोंडाची टकळी चालत असे त्यावर एका सेवेकर्यांने निराहार करते चोरुन खाते अशी कविता करुन तिचे बिंग फोडले सुंदराबाईवर केलेली कविता ऐकून श्री स्वामी व इतर सेवेकरी खदखदा हसत होते याचा मथितार्थ असा आहे की विवेक स्वरुप सदगुरुला सारे काही समजत होते पण ते त्या सर्वांना सुधारण्याची घाई करीत नव्हते विवेक स्वरुप सदगुरु श्री स्वामींना तिची विविध प्रकारची आसक्ती विरक्तीत बदलावयाची होती त्यासाठी कंटाळा येईपर्यंत तिने प्रपंचात राहणे योग्य हे ते जाणत होते म्हणून ते तिच्या अनेक बाबी खपवून घेत होते श्री स्वामी हे परमेश्वर स्वरुप असल्याने परमेश्वराचे प्रत्येकाच्या देहबुद्धीवर कर्म भोगावर आणि प्रत्येकाकडून घडणाऱ्या बर्या वाईट कृतीवर लक्ष असते कोण आसक्त कोण निरासक्त कोण खरा कोण खोटा कोण लोभी कोण निर्लोभी इ. सर्व मानवी जीवाचे आचार विचाराचे पदर ते जाणून होते हे आपण सर्वांनीच येथे लक्षात ठेवले पाहिजे यावरुन आपलाही आचार विचार आणि व्यवहार कसा असला पाहिजे याचा अर्थबोध करुन घेतला पाहिजे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या