अक्कलकोट संस्थान जप्त झाल्यावर श्रीमंत मालोजीराजे सोलापूरास जाऊन राहिले त्यांना श्री स्वामींच्या दर्शनाची उत्कंठा लागली पुढे फिरत फिरत श्री स्वामी सोलापूरच्या अलीकडे अर्ध्या कोसावर असलेल्या धर्मराव थोबडे यांच्या बागेत सेवेकर्यांसह आले सेवेकर्यांसह त्यांचा तेथे मुक्काम पडला श्री स्वामी आल्याची बातमी मालोजीराजास समजताच ते स्वतः पायी श्री स्वामींच्या दर्शनास त्या बागेत आले त्यांनी श्री स्वामींस साष्टांग नमस्कार घालून श्री स्वामी समर्थांच्या गळ्यात रत्नजडित मोत्याचा हार भरजरी टोपी हातात कमंडलू पायात पादुका अंगास केशर कस्तुरीची उटी लावली मंडपात जिकडे तिकडे पुष्पांचा वास पसरलेला आहे सर्वत्र मोठ मोठे दिवे लावलेले आहेत अशा थाटात राजाने श्री स्वामी समर्थांना सिंहासनावर बसविले लोक हळू हळू दर्शनास जमू लागले रात्री १० वाजेपर्यंत लक्षावधी लोक जमले भक्त पुजारी सेवेकरी श्री स्वामींवर छत्र चामरे ढाळत आहेत श्री स्वामी समर्थ नामाचा सर्वत्र जयजयकार चालला आहे तेथे जमलेल्या लक्षावधी लोकांचे रक्षण व्हावे म्हणून इंग्रज सरकारची पलटण सोलापूराहून तेथे आलेली आहे त्यातील सैनिक नाना प्रकारची मधूर वाद्ये वाजवित आहेत श्री स्वामींच्या दर्शनास प्रचंड गर्दी उसळली आहे त्यांच्यापुढे नारळ केळ्यांचा लहानसा डोंगरच झाला होता जो तो श्री स्वामींच्या दर्शनास घाईने येत होता राजाने त्यांची सेवा श्री स्वामी चरणी विनम्रपणे पण मोठ्या दिमाखात राजवैभवाला शोभेल अशा थाटात बजावली होती पुढे श्री स्वामींच्या कृपेने अक्कलकोट संस्थान इंग्रज सरकारने जप्तीतून सोडले नंतर मालोजीराजे अक्कलकोटला आले.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
संस्थान जप्त होईल हे श्री स्वामी समर्थांनी राजास अगोदरच सूचित केले होते त्याप्रमाणे घडले संस्थान जप्त झाल्यावर मालोजीराजे सोलापूरला येऊन राहिले परंतु त्यांना श्री स्वामी दर्शनाची फार उत्कंठा लागली होती हे सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी श्री स्वामींना कळल्याशिवाय कसे राहील सोलापूरपासून अलीकडे अर्ध्या कोसावर धर्मराव थोबडे यांच्या बागेत ते सेवेकर्यांसह आले राजा स्वतःची मोठेपणाची झूल उतरुन अतिशय नम्रपणे पायी चालत त्यांच्या भेटीस व स्वागतास गेला अतिशय उत्स्फूर्तपणे त्याने त्यांचे स्वागत केले राजाने मोठ्या सन्मानाने श्री स्वामींना सिंहासनावर बसविले यातच सारे काही आले मी तुमचा दास आहे हेच राजाने सूचित केले देवा पुढे आणि देवतातुल्य सदगुरुपुढे आपण कुणीही कितीही मोठे असलो मातब्बर असलो तरी आपले वर्तन कसे असावे याचा बोध श्रीमंत मालोजीराजांच्या कृत्तीतून मिळतो समर्थांच्या दर्शनास इतकी गर्दी उसळली की त्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्रज सरकारची पलटण तैनात करावी लागली या लीला भागात आलेल्या वर्णनावरुन श्री स्वामी सर्वमान्य असल्याचेही सूचित होते त्यांच्या दर्शनार्थीमध्ये सर्व जाती जमातीचे धर्म पंथाचे लोक होते श्री स्वामींची किमया इतकी अगाध की यथावकाश जप्त झालेले अक्कलकोटचे संस्थान इंग्रज सरकारच्या जोखडातून मुक्त झाले सेवापरायण मालोजीराजे पुन्हा अक्कलकोटला येऊन संस्थानिक म्हणून कारभार पाहू लागले ही संपूर्ण लीला काळजीपूर्वक वाचल्यावर श्री स्वामी समर्थांचे माहात्म्य लक्षात येते राजाचा सेवाभावी नम्र स्वभावही कळतो इंग्रज सरकारनेही त्यांच्या महत्तेची आणि जनमानसावरील सत्तेची दखल घेतली होती हेही कळले.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या