महाराज मोगलाईत (सध्याचा मराठवाडा) राजूर गावच्या एका जुन्या मठात राहिले आठ गावची जहागिरी त्या मठास मिळवून दिली शिष्यांकडे मठ सोपवून महाराजांनी तेथून पुढे प्रस्थान केले तेथे ते चंचल भारती या नावाने प्रसिद्ध झाले त्यानंतर महाराज अक्कलकोटास आल्यावर मोगलाईतील संस्थानांपैकी काही बैरागी महाराजांकडे आले होते त्या मठासंबंधी काही लडथड पडल्यामुळे मूळ संपादक (संस्थापक) जे स्वामी महाराज अथवा चंचलभारती त्यांची सही आणावी म्हणजे संस्थानाचे कामाचा निकाल करु असे सरकारचे म्हणणे होते परंतु महाराजांनी त्यास सही दिली नाही.
अर्थ भावार्थ मथितार्थ
श्री स्वामी समर्थांनी मठ महंतीचे देव्हारे स्वतः कधीच माजवले नाहीत इतरांनीही ते माजवू नयेत असे त्यांना वाटे त्यातून मिळणाऱ्या मान मरतबात त्यांना कधीच स्वारस्य नव्हते परंतु राजूरच्या एका जुन्या मठात येऊन ते राहिले त्यामागे त्यांचा उद्देश तो मठ जागता व्हावा लोकांना भक्तिमार्गाकडे वळवावे या निमित्ताने त्यांच्यात ऐक्यभाव निर्माण व्हावा हा होता पण स्वतःचे महत्त्व माहात्म्य आणि प्रस्थ वाढवावे असे त्यांना वाटत नव्हते येथे ते चंचलभारती नावाने वावरले या अल्पकाळातसुद्धा ते मठ महंत मठाधिपती यात गुंतून पडले नाहीत त्यांनी त्या मठाला ऊर्जितावस्था आणली तेथे येणाऱ्यांची योग्य व्यवस्था व्हावी म्हणून त्या मठास चंदूलाल दिवाणामार्फत आठ गावांची जहागिरी मिळवून दिली या मठास सुस्थिती प्राप्त होताच एका शिष्याकडे तो ऊर्जित अवस्थेतील मठ सोपवून त्यांनी जोगाईचे अंबेकडे प्रस्थान केले मीच मठाधिपती माझेच नाव आणि गाव चालले पाहिजे असा त्यांनी अट्टाहास केला नाही श्री स्वामींच्याच नावाने मठ मंदिरे केंद्रे संस्थाने स्थापून कोट्यवधी रुपयाची उलाढाल करणारे मालक महंत विश्वस्त म्हणून मिरविणारे अधिकार गाजविणारे यातून काही बोध घेतील काय तो घेतला काय किंवा न घेतला काय श्री स्वामींना काही फरक पडत नाही पण तुम्ही आम्ही सर्व सामान्य उपासकांनी याबाबत डोळस असावे एवढाच इथला अर्थबोध आहे महाराज मठातून गेले पुढे या राजूर मठाचे उत्पन्न निजाम सरकारने बंद केले मठाचा महंत लालभारती श्री स्वामी समर्थांचा शोध घेत घेत अक्कलकोटास आला व बंद केले गेलेले मठाचे उत्पन्न पुन्हा सुरु व्हावे म्हणून श्री स्वामींची हमी पत्रावर सही मागू लागला श्री स्वामींनी मालोजी राजास सांगून मठाचे उत्पन्न पूर्ववत कसे सुरु होईल याबद्दल व्यवस्था केली परंतु लालभारती व त्याच्या बरोबर आलेल्या महंतांना महाराजांनी केलेला बहुमोल उपदेश श्री गुरुलीलामृतांच्या १६ व्या अध्यायात आला इहे त्यात त्यांनी लालभारतीस स्पष्टच सुनावले ही मठ महंती हवीच कशाला इथे कोणी गुरु नाही की कोणी लघु नाही सगळे सारखेच आहेत जगाचा पसारा मांडणारा तो जगन्नाथ सर्वश्रेष्ठ आहे त्याला पाहावयास शिक हा मठ महंतीचा बाजार टाकून दे नसत्या उपाधी मागे लावून घेऊ नकोस सदाचाराने वागावे व्यसन छंद फंद करु नये मालक म्हणून राहू नये पाहुण्या सारखे अलिप्त राहवे अतिथी अभ्यागतास अन्न द्यावे मठ संस्थान अधिकार आदीचा गर्व करु नये असे वागण्यासाठी उत्पन्न हवे असेल तर घे पण वेद परंपरा सांभाळून वागावे लालभारतीकडून अशा वर्तणुकीची हमी घेऊन श्री स्वामींनी मालोजी राजाकडून मठाचे उत्पन्न पूर्ववत सुरू करण्याची व्यवस्था केली हा लालभारती पुढे विरक्त झाला श्री स्वामी समर्थांचे राजूर मठात येणे मठास ऊर्जितावस्था आणण्यासाठी निजामाकडून मदत मिळविणे मठाचा नावलौकिक लोकांची वर्दळ वाढताच ते सर्व निरिच्छ वृत्ती सोडून मठ दुसऱ्याच्या ताब्यात देणे पुन्हा मठाचे उत्पन्न सुरू करुन देणे त्या मागचा उद्देश लालभारतीस सांगणे या सर्व कृती घटनांचा मथितार्थ आणि बोधार्थ समजावून घेऊन त्या दिशेने आपल्या आचार विचारांची वाटचाल नाही का करता येणार यावरच खरेतर चिंतन मनन करावयास हवे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या