श्री स्वामी समर्थांची पूर्ण कृपादृष्टी व आशीर्वाद स्वामीसुतास होते त्यामुळे स्वामीसुतांनी नरसोजी या पारशी गृहस्थास त्याची गेलेली दृष्टी मिळवून दिली त्यामुळे पारशी लोक मुंबईच्या मठात येऊ लागले नास्तिक नाना सोहनीस त्यांनी शुद्धीवर आणून त्यास पादुका देऊन रत्नागिरीला पाठविले पंचविसाव्या वर्षी स्वामीसुतास वैराग्य आले कोकणात असलेल्या त्यांच्या मातोश्रींना वैराग्यविषयी कळताच त्या मुंबईस आल्या आप्त मंडळी त्यांना उपदेश करु लागली आतातरी शुद्धीवर येऊन संसाराचे मार्गास लाग वेडे चाळे केलेस इतके पुरे हे भिकेचे डोहाळे चांगले नाहीत स्वामी सुतास असे सर्वांनी सांगून पाहिले पण सर्व व्यर्थ त्यांच्या मातोश्री काकूबाईला वाटले यास (हरिभाऊस) कोणी तरी चेटूक करुन वेड लाविले आहे म्हणून त्या देवमामलेदारांकडे याबाबत विचारण्यास सटाण्यास गेल्या मुलगा शुद्धीवर येईल अशी कृपा करावी अशी प्रार्थना त्यांना करताच त्यांनी सांगितले की हरिभाऊस जबर भूत लागले आहे ते कोणा देवाच्याने अगर मंत्राने निघावयाचे नाही देवमामलेदारांचे हे उत्तर ऐकून निराश झालेल्या काकूबाई मुंबईस परत आल्या.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

श्री स्वामींनीच आपल्या काही सामर्थ्यांचा अंश हरिभाऊस संक्रामित करुन त्यास दर्याकिनारी पाठविले होते त्या सामर्थ्याची प्रचिती मुंबापुरीतील लोकांना कशी येत होती याचे वर्णन या अगोदरच्या लीला भागात आले आहेच नरसोजीस दृष्टी देणे नाना सोहनी सारख्यास आस्तिक बनवून भक्तीमार्गास लावणेच नव्हे तर त्याच्यामार्फत श्री स्वामी भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी रत्नागिरीजवळच्या नाखरे गावी पादुका स्थापन करावयास लावणे इ.श्री स्वामी स्वामीसुतांच्या माध्यमातून त्यांनाच अपेक्षित असलेले कार्य करुन घेत होते हे कार्य ऐन तारुण्यात पंचविसाव्या वर्षी संसार प्रपंच बहरात येण्याच्या काळात स्वामीसुतांनी सुरू केले होते ब्रह्यानंदी लागली टाळी कोण देहाते सांभाळी अशी स्वामीसुतांची स्थिती झाली होती नातेवाईक आप्तेष्ट सर्वांनीच त्यांना स्वामी भक्तीचे भूत खूळ डोक्यातून काढून टाकावयास सांगितले हे वेडे चाळे आणि भिकेचे डोहाळे सोडण्यास सांगितले परंतु स्वामीमय झालेल्या स्वामीसुतांपुढे सारे व्यर्थ निरर्थक होते येथे स्वामीसुत हे विरक्तीचे मूर्तिमंत प्रतीक आहेत तर त्यास सांगणारे उपदेश करणारे मोह माया संसार प्रपंच आदितील आसक्तीची प्रतिके आहेत स्वामीसुताची आई काकूबाई मोह माया ममता यात गुरफटलेली होती म्हणूनच आपल्या मुलास कोणी चेटूक केले की काय असे समजून त्यावर उपाय विचारण्यास साधू देवमामलेदाराकडे सटाण्यास गेली परंतु त्यांनी दिलेले उत्तर हरिभाऊस जबर भूत लागले आहे ते कोणा देवाच्याने अगर मंत्राने निघावयाचे नाही हे वर आले आहे श्री स्वामी समर्थांसारख्या दैवताने हरिभाऊ झपाटले आहेत देवमामलेदारासारख्या अवतारी साधू पुरुषानेसुद्धा आपली हतबलता वरील उदगारातून व्यक्त केली या कथाभागातून आपणास आजच्या २१व्या शतकाला अनुसरुन किमान काय घेता येईल स्वामीसुता इतकी प्रखर विरक्ती जरी शक्य नसली तरी आपल्या आचार विचारात व्यवहारात अल्प स्वल्प विरक्त भाव आणता येईल तसा तो आणण्याचा प्रयत्न करावा निर्लेप निर्मोही कसे राहता येईल हे प्रपंच करता करता पाहवे करते करविते श्री स्वामी समर्थ आपण निमित्त मात्र चांगल्या गोष्टीचे घटनांचे श्रेय त्यांना द्यावे अन्य बाबतीत आपणच जबाबदार आहोत असे समजून मार्गक्रमण करावे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या