अक्कलकोटचे श्रीमंत मालोजीराजे गुरुप्रतिपदेच्या उत्सवास दरसाल गाणगापूरास जात तेथे त्रिरात्र राहून ब्राह्यण भोजन घालून परत येत या वर्षी मात्र ब्राह्मण भोजन झाल्यावर त्या रात्री श्रीनृसिंह सरस्वती स्वप्नात येऊन बोलले की मी तुझे गावी आलो असून तू येथे का येतोस स्वप्न पाहून राजा जागा झाला व दुसरे दिवशी अक्कलकोटास परत आला श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार असल्याची राजाची खात्री झाली श्री स्वामींच्या पादुका घेऊन त्यास गंध लेपन करुन त्या देवघरात पूजेत ठेवल्या पुढे राजा गुरुप्रतिपदेचा उत्सव अक्कलकोटातच करु लागला.अर्थ भावार्थ मथितार्थ 

गाणगापूरचे श्रीनृसिंह सरस्वती अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ शेगावचे श्री गजानन महाराज शिर्डीचे श्री साईबाबा यांसारख्या अवतारी विभूतीत आणि संत महात्म्यात भिन्नत्व नसतेच मुळी ते एकमेकांना अभिन्नपणे पाहत असतात त्यांच्यात मी तूणा नसतो उच्च नीचता नसते जाती धर्म पंथ संप्रदाय नसतो जीवाच्या प्रकृतिनुसार आणि देशकालाच्या विचारानुसार ते एकमेकांकडे जीवाला धाडतात आपणच तेथे त्या त्या विशिष्ट स्वरुपात असल्याचा विश्वास देतात त्यांच्यात भिन्नपणा नसतोच भेदा भेद भ्रम अमंगळ अशीच त्याची धारणा असते या लीलेतसुद्धा गाणगापूरच्या श्रीनृसिंह सरस्वती मध्ये आणि अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांमध्ये अभिन्नत्वच दाखवले आहे पण मालोजीराजे हे जरी राजे होते तरी ते तुमच्या आमच्यासारखे सामान्य जीव होते त्यांना हे अभिन्नत्व अनुभवास आले नव्हते श्रीनृसिंह सरस्वती हे दत्त अवतार आहेत त्यांचे श्रेष्ठत्व मान्य करुनच ते प्रतिवर्षी गुरुप्रतिपदेस उत्सवास गाणगापूरास जात पण एकवर्षी त्यांना सुस्पष्ट दृष्टांत झाला की मी तुझे गावी आलो असून तू येथे का येतोस मी श्री स्वामी समर्थ रुपाने अक्कलकोटात आता सदेह स्वरुपात आहे आता गाणगापूरला येण्याची मुळीच आवश्यकता नाही असे सुस्पष्ट निर्देश मालोजी राजास मिळाल्यावर गुरुप्रतिपदेचा दरवर्षीचा उत्सव राजा अक्कलकोटातच करु लागला त्या उत्सवासाठी त्या काळी दरमहा एकशे पंचवीस रुपयांची सरकारी खजिन्यातून तरतूद करण्यात आली हे स्थान मोठे श्रेष्ठ पवित्र हे महाराज मोठे श्रेष्ठ आदि भेदभाव करीत मनाची संभ्रमित अवस्था करीत एकाही ठिकाणची धड उपासना न करणे चुकीचे आहे सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे त्यांच्या त्यांच्यातील समत्व ममत्व अभिन्नत्व लक्षात घेऊन आपला उपासना मार्ग कुणा एकाशीच समर्पित भावनेने करणे हा इथला अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या