शके १७९५ (इ.स.१८७३) चैत्र वद्य ११ रोजी प्रातःकाळी श्री स्वामींच्या अंगावर वामनबुवा गंगा घालण्यास गेले व श्री समर्थ स्नानास बसले तेव्हा चोळाप्पा व सुदंराबाई बुवास गंगा घालू देईनात इतक्यात जैनास व बोडकीस काय भितोस गंगा आणून घाल अशी आज्ञा होताच बुवांनी लागलीच घागरभर गंगा महाराजांच्या अंगावर ओतली रेशमी भगवे वस्त्र महाराजांच्या अंगावर घालून त्यांच्या पाया पडून बुवा त्यांच्या बिर्हाडी गेले सायंकाळी वामनबुवा किर्तनास उभे राहिले तोच महाराज म्हणाले फुकट कीर्तन कशास नैवेद्याचा तर ठिकाणाच नाही दुसरे दिवशी त्यांनी नैवेद्य केला.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलाकथेत चोळाप्पा (जैन) सुंदराबाई (बोडकी) आणि वामनबुवा ही प्रमुख पात्रे आहेत श्री स्वामींच्या अक्कलकोटच्या वास्तव्यात या तिघांनाही महत्त्वाचे स्थान होते यातील ब्रह्यनिष्ठ वामनबुवा वाम्बोरीकर हे श्री स्वामी समर्थांवरील श्री गुरुलीलामृत या सुप्रसिद्ध पोथीचे कर्ते आहेत या अगोदरच्या लीलेत श्री स्वामी हे बुवांचे सदा सर्वदा कसे सांगाती होते ते आपण वाचले म्हणून ते ही महत्त्वाचे वामनबुवा अतिशय विद्वान आणि श्री स्वामींचे एकनिष्ठ उपासक व भक्त होते त्यांच्या चिंतन मननात सदैव श्री स्वामीच असत श्री स्वामींचेही वामन बुवांवर अकृत्रिम प्रेम होते अशा या वामनरावांनी नाशिकची गंगा घागर भरुन श्री स्वामींच्या अंगावर घालण्यासाठी मोठ्या भक्तीने आणली होती आपल्या इष्ट उपास्य देवदेवतास गंगेचे स्नान घालणे शास्त्रात फार पवित्र मानले जाते त्या काळी कोणत्याही वाहतुकीच्या सोयी सुविधा नसताना सुमारे १४० १५० वर्षोपूर्वी अनेक बाबतीत प्रतिकुलता असताना सर्व शास्त्रोक्त नियम पाळून बुवांनी घागर भरुन गंगा आणली होती यावरुनच त्यांची श्री स्वामी भक्ती स्वामी निष्ठा सदगुरु सेवेबद्दलचा कमालीचा आदरच व्यक्त होतो यातून आपण काय बोध घेतो परंतु अक्कलकोटला भरुन गंगा आणलेल्या वामन बुवास विपरीत अनुभव आला चोळाप्पा आणि सुंदराबाई बुवास श्री स्वामींवर गंगा घालू देईनात श्री स्वामींना वामनबुवांचा मनोभाव ताबडतोब कळला चोळाप्पा आणि सुंदराबाईचा दुष्टावा आणि संकुचित पणाही त्यांच्या लगेच लक्षात आला तत्क्षणी ते वामनबुवांकडे पाहून कडाडले जैनास व बोडकीस काय भितोस गंगा आणून घाल ही लीलाकथा अनेक बाबींचे पदर उलगडून दाखविणारी आहे चोळाप्पा आणि सुंदराबाई हे श्री स्वामी समर्थांना आपली स्वतःची खाजगी मिळकत इहे अशा मालकी हक्काच्या तोर्यात आणि थाटात वागत आजही अशाच काही लोकांनी अनेक देव देवता सत्पुरुषास संत महात्म्यास घेरलेले आहे विविध सबबी सांगून त्यांना सर्वसामान्यांपासून दूर ठेवले जाते पण सर्वज्ञानी श्री स्वामींना हे कसे रुचेल त्यांनी निष्ठावान वामनबुवांचा मनोभाव भक्ती ओळखून गंगास्नान घालण्यास सांगितले बोडकीस आणि जैनास अजिबात भिऊ नकोस हेही ठणकावून सांगितले वामनबुवांच्या या गंगास्नानात नैवेद्याची उणीव राहिल्याचे या कथाभागातून दिसते श्री स्वामींना तर दररोज अनेक ठिकाणाहून नैवेद्य येतच होते ते काही त्यासाठी उपाशीही नव्हते परंतु वामनबुवांसारख्या लाडक्या जाणत्या भक्तांकडून त्यांना नैवेद्याची अपेक्षा होती राहून गेलेल्या या नैवेद्याची आठवण श्री स्वामींनी किर्तनाच्या वेळी करुन कोणत्याही कार्यात कोणतीही उणीव राहू नये याबद्दल श्री स्वामी किती दक्ष होते हे ही येथे स्पष्ट होते.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या