एके दिवशी भर दोन प्रहरी चैत्र महिन्यात श्री स्वामी समर्थ शे पन्नास सेवेकरी मंडळींसह गावाबाहेर असलेल्या यवनाच्या स्मशान भूमीत आले त्यांनी एक मोठा दगड लोकांकडून आणून विहिरीत टाकविला जवळच असलेल्या एक कबरीवर ते लघवी करुन शौचास बसले श्री स्वामींच्या या कृतीने पाच पन्नास मुसलमान हातात दांडके घेऊन मारण्यास येऊ लागले त्यांना पाहून सेवेकर्यांनी महाराजांना सांगितले महाराज मुसलमान लोक आपणास मारण्यास येत आहेत श्री स्वामींजवळ तेव्हा बोकड व मोत्या या नावाचे दोन मोठे कुत्रे होते महाराजांनी गुढघे जमिनीवर टेकून हाताने जमिनीवर दाबल्यासारखे करुन बोकडकू दाबो बोकडकू दाबो म्हणून एका सेवेकर्यांस आज्ञा केली त्याप्रमाणे सेवेकर्यांने कुत्र्यास दाबले ही कृती होताच मारायला येणाऱ्या लोकांच्या घरी लहान मुलांच्या पोटात एकाएकी दुखू लागले ती पोरे कुत्र्याप्रमाणे ओरडू लागली गावातील सर्व बायका त्यांच्या नवऱ्यास धावत जाऊन सांगू लागल्या तुम्ही आधी घरी चला घरात आकांत उडाला आहे हे पाहून मारण्यास आलेल्यांना आश्चर्य वाटले व पुढे काय करावे हे सुचेना त्यातील एका म्हातारा मुसलमान म्हणू लागला की हे सर्व श्री स्वामी महाराजांचे कृत्य असावे तर तुम्ही त्यांस शरण जा म्हणजे विघ्न निवारेल हे ऐकून त्या सर्वांनी हातातील काठ्या टाकून ते सर्व श्री स्वामींस अनन्यभावे शरण गेले कान धरून श्री स्वामींसमोर गुढघे टेकून प्रार्थना केली की आम्हाला या संकटापासून सोडवावे श्री दत्तात्रय स्वामींनी स्वतः येऊन सेवेकर्यांस दाबून ठेवलेल्या त्या कुत्र्यास सोडून देण्यास सांगितले तेवढ्यात त्या मुसलमानाच्या घरी शांतता झाल्याची वर्दी आली.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

या लीलेवरुन सर्वांस आश्चर्य तर वाटलेच पण श्री स्वामी महाराज बडा अवलिया आहे असे सर्व मुस्लीम बांधव म्हणू लागले गावाबाहेरील यवनांच्या स्मशानभूमीत आल्या आल्या श्री स्वामींनी सेवेकर्यांकडून एक मोठा दगड तेथील विहिरीत टाकला यवन स्मशान भूमीतील त्या मृतात्म्यांना पुन्हा संसारकूपात बुडून राहावयाचे आहे काय असा परखड सवाल त्यांनी दगड विहिरीत टाकण्याच्या संकेताद्वारे केला त्यानंतर त्यांनी जवळच्याच कबरीवर लघवी केली या कृतीने त्यांनी सृष्टीच्या निर्मिती स्थिती मुक्तीचा क्रम आपल्याच हाती असल्याचे सूचित केले या कबरीमध्ये जसा देह होता तसा नवा कर्मेद्रिय ज्ञानेंद्रिय प्राण अंतःकरणे असलेला विषयासहित देह आम्ही देऊ हे लघुशंका करुन त्यांनी दर्शविले कबरीजवळच शौचास बसून त्यांनी असाही संकेत दिला की पुनर्जन्म मिळाल्यावर पुन्हा वासना भोगात गुंतणार आणि त्या दगडाप्रमाणे संसारकुपात बुडणार की आमच्या सेवेत येऊन संचित कर्माचा भोग विष्ठेसारखा समजून त्याज्य करणार प्राप्त जीवनातील विविध प्रकारचा अतिरिक्त हानिकारक आणि अपायकारक सोस आस कधी संपणार जीवनाची निर्लोभी तृप्ती कशी साधणार पण श्री स्वामी समर्थांच्या कृतीचा भावार्थ मथितार्थ सर्वसामान्य उपासकास कसा समजणार त्यासाठीच तर प्रत्येक लीलेचे दररोजच्या व्यस्त दिनचर्येत १५-२० मिनिटे मनन चिंतन कटाक्षाने करावे मुसलमान लोक मारावयास येतात असे कळताच त्यांनी सेवेकर्यांकरवी वर लीलेत वर्णन केल्याप्रमाणे कृती करावयास सांगितले आणि त्यातून त्यांनी पुढील संकेत दिले १) बोकडाप्रमाणे दाढी असणाऱ्या आणि कुत्र्यासारखे भुंकत (ओरडत) येणाऱ्यांना निर्देश २) कुत्र्यास दाबल्यामुळे ते लोकही जखडले गेले ३) दाबल्यामुळे कुत्र्यांच्या पोटावर दाब पडून ते वेदनेने विव्हळू लागले मारण्यास येणाऱ्यांच्या घरी मुलांच्या पोटात दुखावयास लागून असाध्य वेदनेने ती कुत्र्याप्रमाणे विळ्हळू लागली त्यामुळे मारेकर्यांना दंडुके टाकून माघारी घरी यावे लागले पण या सर्वच घटनांची संगती कुणास लागेना त्याची कारणमीमांसा कुणासही करता येईना तेव्हा मुस्लीम समाजातीलच एक बुजूर्ग गृहस्थाच्या लक्षात येऊन त्याने त्या सर्वांना श्री स्वामींस शरण जाण्याचे सुचविले त्यांनी श्री स्वामी समर्थांना अनन्यभावे शरण येऊन आम्हाला या संकटापासून सोडवावे अशी गुढघे टेकून प्रार्थना करताच दयाघन करुणासागर श्री स्वामींनी कुत्र्यास सोडून देण्यास सांगितले कुत्र्यांना मुक्त करताच त्या सर्व मुस्लीम बांधवांच्या घरी शांतता पसरली.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या