अक्कलकोटापासून सहा कोसांवर असलेल्या बसल गावी श्री समर्थ गेले ते गावाबाहेर माळावर जाऊन बसले मागाहून काशिनाथपंत गणपतराव वगैरे मंडळी आली श्री स्वामींचे दर्शन घेऊन खाली बसली तो महाराजांची आज्ञा झाली की गावात जाऊन मी आलो म्हणून नथणीस सांग पंतांनी आज्ञेप्रमाणे देवीस जाऊन सांगितले मागाहून भवानीचे देवळात श्री स्वामीही गेले तितक्यात सोलापूरहून एक शिंपी सहकुटुंब श्री स्वामींचे दर्शनास आला तो दर्शन घेऊन जवळ बसताच श्री स्वामी त्यास म्हणाले काय रे आम्हास जेवण घालीत नाहीस काय शिंप्याच्या मनातून श्री स्वामींना नैवेद्य करावयाचा होताच त्याने भवानराव देशपांडे व बसलगावचे कुलकर्णी यांना ही गोष्ट सांगितली शिंप्याने पन्नास पानांचा स्वयंपाक करविला त्या दिवशी अमावस्या असल्यामुळे बरीच यात्रा सोलापूरहून आली स्वयंपाक करुन सर्वत्रास जेवण घालावे अशी महाराजांनी आज्ञा केली गणपतराव जोशीचे घरी दर्श असल्याने महाराज सांगतील तर घरी जाऊ असे त्याच्या मनात आले इतक्यात अरे लठ्ठ्या लवकर घरास जा म्हणून महाराजांनी जोशास आज्ञा केली स्वयंपाक तयार झाल्यावर श्री स्वामींस स्नान घालून त्यांची पूजा करुन आरती केली व भोजनास पात्रे वाढली सर्वत्रास भोजन घालावे म्हणून महाराजांची आज्ञा होती त्याप्रमाणे पंक्तीवर पंक्ती बसू लागल्या पन्नास पानाचे स्वयंपाकात पाचशे मंडळी यथेच्छ जेवली.
अर्थ - भावार्थ - मथितार्थ
गावात जाऊन मी आलो म्हणून नथनीस सांगा हे श्री स्वामी समर्थांनी काशिनाथपंतास आज्ञा देऊन सांगितले त्याप्रमाणे पंतांनी आज्ञापालन केले यातील अर्थ - भावार्थ - मथितार्थ समजून घेणे उचित ठरेल त्यासाठी श्री गुरुलीलामृतातील बाराव्या अध्यायातील श्री स्वामींचा व अंबिकेचा संवाद यातील मर्म उलगडणारा आहे तो असा समर्थांसि जगदंबिका!हास्य वदने बोलतसे!!११२!!सोडूनि निजस्थान आपुले!स्वामी आपण कोठे होता गेले!बहुत दिवसा सगुणब्रह्य देखिले!श्रीमत्परम हंसरुपी!!११३!!समर्थ वदती आहो माते!आम्ही संचरतो तीर्थ क्षेत्राते!आलो श्रींच्या दर्शनाते!देवस्थाने अवलोकित!!११४!! यावरुन श्री स्वामींचा व अंबिकामातेचा प्रेमाचा आपुलकीचा संवाद होत होता त्यातूनच श्री स्वामींनी काशिनाथपंताजवळ वरील निरोप दिला हे स्पष्टच दिसते यातून त्या दोघांमधला आदरभाव आणि मान मर्यादा कशी होती हेही स्पष्ट होते सोलापूरहून आलेल्या शिंप्याच्या मनात श्री स्वामीस नैवेद्य करावयाचा होता परंतु तो बोलण्याच्या आतच अंतःसाक्षी श्री स्वामींनी त्यास विचारले काय रे आम्हास जेवण घालीत नाहीस काय शिंपी बिचारा साधा भोळा सरळ होता पण प्रापंचिक होता सहकुटुंब सहपरिवार तो महाराजांच्या दर्शनास आला होता यातून भक्ती अथवा उपासनेत साध्या सरळ भाबडेपणास किती महत्त्व असते याचा बोध होतो श्री स्वामीच अशांचा भार उचलतात शिंप्याने पन्नास माणसांची भोजनाची व्यवस्था केली होती परंतु त्याच्यावर श्री स्वामीकृपा झाली होती त्यामुळेच श्री स्वामीही म्हणाले सर्वत्रास जेवण घालावे निःशंक मनाने शिंप्याने कृती केली होती म्हणून ५० लोकांच्या स्वयंपाकात ५०० माणसे जेवली नको डगमगू स्वामी देतील साथ श्री स्वामी तारक मंत्राची त्यास प्रचिती आली सद्यःस्थितीत आपण ह्या लीलेकथेतून हाच बोध घेऊ शकतो की श्री स्वामी समर्थांची मनोभावे निष्ठापूर्वक शुद्ध आचार विचार व्यवहाराने उपासना केली तर आपल्या संसार प्रपंचात ते कशाची उणीव भासू देणार नाहीत फार नाही तरी खाऊन पिऊन सुखी ठेवतील निर्गुण निराकार स्वरुपात आजही त्यांचे अस्तित्व आहे मैं गया नही जिंदा हूँ! भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन भक्तवत्सल असलेल्यांना श्री स्वामी समर्थ सतत देत असतात.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या