श्री स्वामी समर्थ सुमारे शंभर सेवेकर्यांसह कोनळी गावाच्या रानातून जात होते त्या दिवशी त्यांनी स्वतःही काही खाल्ले नाही व सेवेकर्यांनाही काही खाऊ दिले नाही सेवेकरी महाराजांस प्रार्थना करीत की कोठे तरी राहून खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याची आज्ञा व्हावी तेव्हा महाराज म्हणाले चला तुम्हाला अन्नपूर्णा जेऊ घालणार आहे असे म्हणत ते काट्याकुट्यातून सर्वांसह चालले होते दिवस मावळल्यावर श्रीपाद भट महाराजांच्या मार्गात आडवा पडत म्हणू लागला महाराज आम्ही सर्व भुकेने तडफडत आहोत करीता आमचे सर्वांचे प्राण घ्यावे मग पाहिजे तिकडे जावे हे ऐकताच महाराज एका आंब्याच्या झाडाखाली उभे राहिले सेवेकर्यांनी आसपासची जागा साफ केली पाणी आणले गेले थोडे काही खाण्याबाबत महाराजास प्रार्थना करु लागले तेव्हा समर्थ म्हणाले तुम्ही सर्व भोजन करा म्हणजे आम्ही खाऊ तेव्हा श्रीपाद भट म्हणाला महाराज इतक्या मंडळीस या रात्री भोजन कोठून मिळणार तेव्हा महाराज सांगू लागले त्या पलीकडच्या मळ्यात जा अन्नपूर्णा वाट पाहात आहे त्यावर काही सेवेकरी म्हणाले तेथे कोणी वाढून ठेवले आहे काय ?


अर्थ भावार्थ मथितार्थ 

श्री स्वामी समर्थांना केव्हा काय लहर येईल त्या मागचा उद्देश काय असेल हे कुणासही सहसा सांगता येत नसे त्यातील अनेकांना श्री स्वामी समर्थ हे चालते बोलते परब्रम्ह प्रत्यक्ष परमेश्वर आपल्यामध्ये सदेह वावरत आहेत याचीही कल्पना नव्हती मेंढराच्या गळ्यात कोहिनूर हिरा असावा पण त्यास काहीच कल्पना नसावी अशी अनेकांची त्यावेळी स्थिती होती त्या वेळच्या समाज व्यवस्थेनुसार सदगुरुंपासून आपल्याला आत्मज्ञान व्हावे आत्मबोध व्हावा अशी इच्छा बाळगणारेही फारच कमी होते श्री स्वामी हे सर्व जाणत होते परंतु त्याची त्यांना फारशी फिकीर नव्हती समुद्र भरला आहे ज्याला घेता येईल तेवढे त्याने घ्यावे अशा स्थितप्रज्ञ वृत्तीने ते सदासर्वदा वावरत होते त्यासाठी संयम सदगुरुंच्या वागण्या बोलण्याकडे आत्मिक लक्ष असावे लागते पण त्यांच्या समवेत असलेल्या सेवेकर्यांना त्यांनी खायला काही मिळू दिले नाही स्वतः श्री स्वामींनीही काही खाल्ले नाही त्यामुळे त्यांच्या समवेतचे सेवेकरी भूकेने तडफडत होते सदगुरु श्री स्वामी समर्थ समवेत असताना कसली तहान आणि भूक त्यांची संगत हीच पाच पक्वांन्नाची पंगत पण हे उमजण्या इतके आध्यात्मिक शहाणपण येणे हा उपासनेचा हेतू ते साधे भोळे सेवेकरी विसरले होते खरं तर श्री स्वामींसारख्या भगवंता समवेत त्यांना खाण्या पिण्याची आठवणही यावयास नको होती सद्यःस्थितीतही श्री स्वामी समर्थांच्या चिंतन स्मरण जप जाप्य आदी उपासना करताना तहान भूकेचा विसर पडावयास हवा हा अर्थबोध यातून घ्यावा या सर्व घडामोडीत स्वतः श्री स्वामी समर्थ इतर त्यांच्या सेवेकर्यांना उपाशी ठेवून स्वतः मात्र ढेकर देईपर्यंत जेवले नव्हते हे येथे लक्षात घेतले पाहिजे थोडे काहीतरी खाण्याबाबत त्यांना विनंती करताच महाराज म्हणाले तुम्ही सर्व भोजन करा म्हणजे आम्ही खाऊ या श्री स्वामी वचनावरुन बोध होतो की तोच खरा खुरा सदगुरु की जो आपल्या शिष्यांचे अनुयायांचे क्षेम कुशल प्रथम बघतो त्यांचा विचार अगोदर करतो इतक्या मंडळीस एवढ्या रात्री भोजन कोठून मिळणार असा प्रश्न श्रीपाद भटाने करताच अशक्यही शक्य करणारे श्री स्वामी महाराज म्हणाले त्या पलीकडच्या मळ्यात जा अन्नपूर्णा वाट पाहत आहे श्री स्वामींचे वचन सत्य असणारच पण काही लोकांचा स्वतःवर आणि इतरांवरही विश्वास नसतो अनावश्यक शंका कुशंका अविश्वास असा काहींचा स्वभावच बनलेला असतो त्यामुळेच काही सेवेकरी म्हणाले तेथे कोणी आपल्यासाठी वाढून ठेवले आहे काय प्रत्यक्ष परब्रह्य श्री स्वामी समर्थांबाबत ज्यांचा असा अविश्वास आणि दृष्टिकोन असेल तर त्यांना कोण काय सांगणार या लीला भागात आलेल्या व्यक्ती घडलेले प्रसंग याचा मथितार्थ जाणून सद्यःपरिस्थितीत काळ सुसंगत बोध घ्यावा तसा आचार विचार आणि व्यवहार ठेवावा.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या