एका सन्याशाने किमया साध्य केली होती तो संन्यास धर्माचा त्याग करुन यथेच्छ आचरण करीत असे याजपाशी पंचवीस मनुष्ये रोज घोडे एक बैलगाडी होती हा मोठ्या शहरात बागेत अशा हवेशीर जागेत नेहमी राहत असे हा देखणा असून मिजासी होता भोजनास त्यास मिष्टांन्न लागत असे तो भिक्षेला किंवा पुडीला जात नसे किमयेच्या पैशात तो त्याचा व त्याच्याबरोबर असलेल्या लव्याजम्याचा खर्च मोठ्या थाटाने चालवित असे किमयेसंबंधाने त्याचे बोलणे चित्तवेधक आणि सफाईचे होते परिणामी कित्येक श्रीमंत विद्वान ब्राम्हण साधू वाणी मराठे मुसलमान लोक त्यांच्या भाषणात गर्क होत असत कित्येक तर त्याच्या किमयेचा चमत्कार पाहण्यापुरते त्याचे शिष्य बनत असत त्याला हिंदुस्थानी मराठी व मुसलमानी अशा तीन भाषा चांगल्या बोलता येत होत्या आम्ही पंजाब देशाचे राहणारे असे तो सांगत असे त्याच्या किमयेसंबंधी कोणी विरुद्ध बोलल्यास त्यास तो अमर्याद शिव्या देत असे प्रसंगी एखाद्यास मारीतही असे त्याच्या या विलक्षण स्वभावामुळे एकदा एका हिंदुस्थानी जवानाने त्याला विलक्षण मार देऊन त्याचा पाय मोडला होता.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

यातील किमयागार श्री स्वामींनी केलेल्या लीलेशी संबंधित आहे या निमित्ताने संन्याशाचा आचार विचार धर्म कळावा येथील संन्याशाचे वर्तन यम नियमाच्या कक्षेविरुद्ध होते श्री स्वामींनी त्यास कसे ताळ्यावर आणून भक्तिमार्गास लावले इ.बाबत कल्पना यावी म्हणून या संन्याशाचे वर्णन येथे दिले आहे वास्तविक संन्यास धर्मात संन्याशास कडकडीत वैराग्याची गरज असते त्यासाठी चित्तशुद्धी व्हावी लागते त्यासाठी १)प्रसिद्धीची हाव २)धनसंपदेची लालसा ३)प्रपंच सुखाची वासना या तीनही गोष्टी पूर्णपणे मनापासून निःशेष सोडाव्या लागतात यासाठी दशेंद्रिये शांत व्हावी लागतात त्यावर पूर्ण संयम व विजय मिळवावा लागतो सदासर्वदा परमेश्वराशी अनुसंधान ठेवावे लागते मन कमालीचे स्थिर शांत करुन अंतर्मुख व्हावे लागते त्यासाठी ध्यानधारणा बळकट आणि व्रतस्थ असावी लागते यासारख्या गोष्टीत या लीलेतील संन्याशी किमयागार मोडत होता का नाही तो सिद्धीच्या जाळ्यात फसला होता धन आहार आणि वस्ती याबाबत संन्याशाने पाळावयाची बंधने त्याने झुगारुन दिली होती तो विलासी जीवनात रमला होता तो खूप अहंकारीही होता त्याला थोडा सुद्धा कुणाचाही विरोध सहन होत नव्हता विरोध करणाऱ्याचा तो पाणउतारा करीत असे प्रसंगी मारण्यास अंगावरही धावून जात असे त्याच्या या वागण्यामुळे एका हिंदुस्थानी जवानाने त्याला चांगलाच चोप देऊन त्याचा एक पाय मोडला होता प्रथमतः संन्याशाच्या यम नियमाविषयी जाणून घेऊ यमः१)अपरिग्रह कोणत्याही गोष्टीचा संग्रह न करणे २)अहिंसा कायिक वाचिक मानसिक हिंसा न करणे ३)दया सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करणे ४)सत्य कृती वृत्ती आणि वाचेने खरेपणाने वागणे ५)शांती क्षमाशीलवृत्ती इंद्रियांची शांती समाधानी अवस्था ६)आर्जव वागण्या बोलण्यातला सौम्यपणा ७)प्रीती आचार विचारातील प्रेम करुणा द्वेषविरहित भावना ८)प्रसाद प्रसन्नता सौदार्हपणा ९)मार्दव आचार विचार बोलण्यातील सौम्यपणा नियमः१)शौच शारीरिक मानसिक शुद्धी २)यज्ञ जपजाप्य तपादि उपासनेचे बाह्यांग ३)दान सदैव दातृत्वाची वृत्ती ४)स्वाध्याय आधी केले मग सांगितले चा अभ्यास ५)ब्रह्यचर्य वीर्यरक्षण करणे सतत ब्रह्यतत्त्वाशी समरस होणे ६)व्रत सातत्याने एखादी गोष्ट अंगिकारणे ७)मौनअंतरंगातील विचारतरंग थांबविणे न बोलणे ८)उपवास भगवंताचे चिंतन मनन निधीध्यास साध्य करणे ९)स्नान शरीर शुद्धीसाठी अंघोळ करणे (मन बुद्धी प्राणाने आत्मचिंतनात मग्न राहणे हे ही एक प्रकारचे स्नानच मानले जाते)वरील प्रकारच्या यम नियमाचा साधा लवलेशही या कथाभागातील किमया संन्याशामध्ये नव्हता श्री स्वामींच्या वेळी हे असे वरील प्रकारचे संन्याशी होते तसे सध्या २१ व्या शतकातही भरपूर आढळतात नव्हे आहेतच लोकांच्या अगतिकतेचा अज्ञानाचा ते फायदा घेतात श्री स्वामी समर्थांनी त्या किमयागार संन्याशाची चांगलीच खोड मोडली त्याचे अज्ञान त्याला समजावून सांगितले त्याला भक्तिमार्गाला लावले याबद्दल पुढे माहिती येणारच आहे सध्याच्या लफंग्या साधू संन्याशी किमयागाराबद्दल काय बोलावे त्यांची खोड कोण मोडणार तुम्हा आम्हा सुशिक्षितांना काही करता येते का पाहू या.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या