हरिभाऊंनी त्यातील दोनशे रुपये घेऊन त्याच्या श्री स्वामींसाठी पादुका करविल्या त्यावर वेलबुट्टी काढून घेतली त्यांना आता नोकरीत रस राहिला नव्हता पंधरा दिवसातच ते त्यांच्या मित्रासह अक्कलकोटला आले श्री स्वामी समर्थांच्या अनुग्रहाचा त्यांना रात्रंदिवस ध्यास लागला श्री स्वामींचे दर्शन घेऊन उभे राहताच श्री स्वामींनी हरिभाऊस "गुरुर्ब्रह्या,गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः! गुरुसाक्षात परब्रह्य तस्मै श्री गुरुवे नमः!!"गजाननास "आकाशात पतितं तोयं यथा गच्छती सागरम!सर्व देव नमस्कारःकेशव प्रतिगच्छती!!"हा श्लोक सांगितला आणि पंडितास "इदमेव शिवं इदमेव शिवं इदंमेव शिवं इदमेव शिवः!"हे वचन सांगितले.
अर्थ भावार्थ मथितार्थ
अक्कलकोटहून श्री स्वामी समर्थांचे दर्शन आशीर्वाद घेऊन मुंबईस परतलेले हरिभाऊ अतिशय अस्वस्थ होते त्यांच्या दोन मित्रांसह अक्कलकोटास जाण्यासाठी ते तळमळू लागले त्यांना श्री स्वामी समर्थ भेटीचा ध्यासच लागला होता त्यांना आता प्रपंचात अजिबात रस उरला नव्हता नफ्यातील दोनशे रुपये खर्चून त्यांनी श्री स्वामींसाठी चांदीच्या पादुका करवून घेतल्या त्यावर छानपैकी वेलबुट्टी काढून घेतली आता हरिभाऊंना जळी स्थळी काष्ठी पिषाणी श्री स्वामी महाराज व्यापून राहिल्याचे जाणवत होते ते तिघेही अक्कलकोटला आले त्यांनी श्री स्वामी समर्थांस साष्टांग नमस्कार घातला श्री स्वामींनी हरिभाऊंची भाव विभोर अवस्था जाणून त्यांना गुरुर्ब्रह्या गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः!गुरु साक्षात परब्रह्य तस्मै श्री गुरुवे नमः!!(गुरुगीता ३२)या मंत्राचा हरिभाऊवर एखाद्या जादूसारखा परिणाम झाला हरिभाऊ स्वतःच गुरुतत्त्वात मिळून मिसळून विरघळून गेले होते त्यांची अवस्था देहभानरहित झाली होती नंतर श्री स्वामी महाराज गजाननाकडे वळले गजानन बिचारा अगदी साधा साधा भोळा सरळ होता हरिभाऊ आणि लक्ष्मण पंडिताच्या संगतीत राहून त्याच्या मागोमाग निमूटपणे चालणारा एक साधा सरळ जीव होता श्री स्वामींनी त्यास आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम्!सर्वदेवः नमस्कारःकेशवं प्रति गच्छती!!हा मंत्र दिला यातून श्री स्वामींना हेच सांगावयाचे होते की अरे गजानना सगळे देव सारखेच आहेत तू कुणालाही नमस्कार कर तो नमस्कार माझ्यापर्यंत येऊन पोहचणारच आता विचलित होऊ नकोस निश्चिंत राहा हे बघ आकाशातून पाऊस पडतो त्याचेच नद्या नाले ओढे ओहोळ होतात पण ते पाणी शेवटी समुद्रालाच येऊन मिळते ना अक्षरशः कानाचे द्रोण करुन श्री स्वामी सांगत असलेला मंत्र त्याने मनात साठवला देव देवता धर्म संप्रदाय पंथ आदी बाबत अमंगळ भ्रम बाळगणार्यांना यातून मोठा अर्थबोध होईल नंतर श्री स्वामींनी लक्ष्मण पंडितास इदंमेव शिवं इदंमेव शिवं इदमेव शिवं इदंमेव शिवः!असा मंत्र दिला याचा मथितार्थ असा की अरे लक्ष्मणा हेच केवळ कल्याणकारक आहे रे केवळ हेच पवित्र आहे मंगल आहे असे पाहा की हेच शिव आहे हेच पावन आहे लक्ष्मण पंडितास संसार प्रपंच अधिक प्रिय होता संसाराबाबत तो जास्तच आसक्त होता त्याची ती संसार प्रपंचाची प्रीती आसक्ती श्री स्वामींना जाणवत असे गृहप्रपंच विहिरीसारखा खोल आणि मर्यादित असतो त्यातून बाहेर पडणे तसे कठीणच त्यात बुडून मरण्याचाच धोका अधिक पंडितांच्या बाबतीत असे घडू नये म्हणून कुवेके आड होके तुम खा जाव म्हणजे पंडिताने विहिरीच्या बाजूस सुरक्षितपणे प्रपंचात मर्यादेने राहून आनंदाने जगावे यासाठी तुम खा जाव तू आनंदाने केळे खा असा संकेत श्री स्वामींनी दिला असा मथितार्थ आहे श्री स्वामी समर्थांनी वरीलप्रमाणे तिघांनाही त्यांच्या आध्यात्मिक पात्रतेनुसार संकेत दिले ते मुद्दाम कुणासही प्रपंचातून उठवत नसत प्रपंच सोडून माझ्याच भजनी लागा असेही कधी सांगत नसत कुणावर ते परमार्थाची सक्तीही करीत नसत ज्याच्या त्याच्या भक्तीनुसार त्यास ते शक्ती वा बळ देत असत पात्रतेनुसार मार्गदर्शन हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते मोक्ष मुक्तीची वेळ आलेल्यांना मात्र ते सावध करीत प्रसंगी मार्गदर्शन करीत किंवा अनुकूल प्रतिकूल संकेतही देत.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?
लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १
सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या