श्री स्वामी समर्थ मंगळवेढ्याहून सोलापूरला येत असताना रस्त्यावर करमरकरांच्या शेतात इ.स.१९५५-५६ त्यांची वेदमूर्ती पंढरीनाथ व एकनाथ भटजी यांच्याशी दुपारी एक दोन वाजता गाठ पडली दुपारची वेळ सूर्याची प्रखरता पायाखालची तप्त जमीन पायाला चटके बसू लागल्यामुळे स्वामी महाराजांनी पंढरीनाथा जवळ त्याच्या पायातील जोडा आपल्या पायात घालण्याकरिता मागितला पंढरीनाथाने तो ताबडतोब दिला श्री स्वामी महाराज तो पायात घालून बरेच दूर गेले पंढरीनाथ व एकनाथ आपापसात बोलत असता त्या दोघांना महाराज दिसेनात तेव्हा एकनाथ पंढरीनाथास म्हणतो अरे तू आपला जोडा त्या वेड्यास देऊन टाकलास आणि तो तर आता दिसेनासा झाला जोडा दिला असे जर काकास कळले तर ते रागावतील हे ऐकून पंढरीनाथ चिंतेत पडला तेवढ्यात पाच मिनिटात श्री स्वामी महाराज लगबगीने येऊन पंढरीनाथास म्हणाले हा घे तुझा जोडा आता काका कशास रागे भरेल इतके बोलून ते पुन्हा झपाट्याने चालते झाले अर्ध्या कोसावर गेलेल्या व आपले बोलणे ऐकून परत आलेल्या त्या वेड्याच्या या विलक्षण कृतीचे त्या दोघांनाही आश्चर्य वाटले.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

श्री स्वामी समर्थांचे वरपांगी वर्तन पाहणाऱ्यांना ते वेडे लहरी एक सर्वसामान्य साधू बैरागी वाटत अर्थात कुणास काय वाटते याची त्यांना पर्वा नव्हती एकदा ऐन दुपारी एक दोनच्या दरम्यान पायाला चटके बसतात असे सांगून पायात घालण्यासाठी पंढरीनाथाकडे त्याच्या पायातील जोडे त्यांनी मुद्दामच मागितले परमेश्वर कोणाची केव्हा कशी परीक्षा घेत असतो हे अनेकदा कळत नाही जे अंतःकरणाने पूर्णतः विशुद्ध निर्लेप निर्मोही असतात त्यांना परमेश्वराच्या स्वरुपाच्या आगमनाचे संकेत कृती बोलणे कळत असते पण अशा व्यक्ती थोड्या असतात ते ओळखण्याची क्षमता येण्यासाठीच तर प्रभू चिंतन नामस्मरण करायचे असते देवाचा साक्षीभाव सदैव मनात ठेवून तसा आचार विचार करावयाचा असतो हे सरावाने सततच्या साधनेने संसार प्रपंच करीत असतानाही साधते दुर्दैवाने पंढरीनाथाला अद्याप ते साधले नव्हते त्याने साध्या सरळ मनाने स्वतःच्या पायातला जोडा श्री स्वामींनीमागताच लगेचच त्यांना त्या भर दुपारी पायात घालण्यास दिला त्याची ही कृती निश्चितच योग्य होती पण त्याचा भाऊ एकनाथ याने त्यास अरे तू जोडा दिला असे जर काकास कळले तर ते तुझ्यावर रागावतील असे टोकल्यावर पंढरीनाथ डगमगला विचलीत अस्वस्थ झाला भाऊ एकनाथ म्हणतो ते त्याला खरे वाटले याचाच अर्थ असा अजून पंढरीनाथ आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्व झाला नव्हता शंका कुशंका रागवण्याचे भय चिंतेची कोळीष्टके अजूनही त्याच्या मनात होती अजून त्याची आध्यात्मिक तयारी अपूर्ण होती पण श्री स्वामी महाराजांनी तेथे येऊन हा घे तुझा जोडा आता काका कशास रागे भरेल असे बोलून त्यास जोडा देऊन ते क्षणार्धात खूप दूर गेले अर्धाकोस अंतरावरुन श्री स्वामी (त्या दोघांच्या दृष्टीने वेडा) परत येऊन ते दोघे बोलले तेच त्यांना ऐकवून व जोडा परत करुन लगेचच निघूनही गेले आता त्या दोघांवरच वेडे होण्याची जणू काय वेळ आली होती वास्तविक जोडा श्री स्वामींस देऊन भाग्याचा क्षण पंढरीनाथाच्या जीवनात आला होता पण त्याच्या प्रारब्धात ते नव्हते अजून त्याची उपासना पक्व व्हायची होती म्हणून असे क्षण प्रसंग संकेत फार आध्यात्मिक संवेदनशीलतेने पकाडायचे असतात देव कोणत्या स्वरुपात केव्हा कोठे कसा भेटेल काय मागेल अथवा काय देईल हे सरळ नितळ भक्तियुक्त अंतःकरण असल्यासच कळते हा इथला अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या