एक समंधी उपद्रवाचा ब्राम्हण व त्याची बायको असे उभयता अक्कलकोटला आले तो समंधी ब्राम्हण विविध प्रकारचे वेडेचाळे करीत असे लोकांना उपद्रव देत असे बाईच्या विनवणीमुळे लोक वेड्याला सोडून देत असत माधुकरी मागून ती त्याला खाऊ घालीत असे व स्वतःही खात असे दररोज सायंकाळी बाई त्या समंधी वेड्या पतीस हाताला धरून श्री स्वामींच्या दर्शनास आणीत असे परंतु समर्थांचे दिव्य दर्शन घेण्यास त्याला मोठे संकट पडे आरतीच्या वेळेस तर त्यास श्री स्वामींचे रुप पाहवत नसे म्हणून तो डोळे मिटून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असे दोघे चौघे सेवेकरी त्यास धरून ठेवित पण त्यांनाही तो पुरुन उरे त्याच्याच्याने आरती ऐकवत नसे म्हणून तो आरती चालू असताना कानात बोटे घाली नाचून व लोळून तो आपल्या अंगाचे पाणी करुन घेई असे बरेच दिवस चालले बाई नेहमी तिचा नवरा बरा होण्याबद्दल श्री स्वामी समर्थांजवळ प्रार्थना करीत असे असेच एकदा तो समंध बोलू लागला की दत्ताच्या दरबारात न्याय नाही मला उगीच स्वामी मारतात असे म्हणून मोठ मोठ्याने किंकाळ्या ठोकू लागला महाराज म्हणाले क्यों रोता है तेव्हा तो म्हणाला महाराज याने माझे दोन हजार रुपये बुडविले मी कृपण असल्या कारणाने आत्महत्या करुन घेतली त्या योगाने मी पिशाच्च झालो माझे रुपये बुडविले नसते अशी दशा मला का प्राप्त झाली असती म्हणून महाराजांनी माझा अव्हेर न करता यथार्थ न्याय करावा याने माझे रुपये देऊन माझी क्रिया करावी म्हणजे मी जाईन.


अर्थ भावार्थ मथितार्थ 

या लीला भागात समंधी अथवा पिशाच्च बाधित ब्राह्यणाचा उल्लेख आहे म्हणून प्रथम समंधाने बाधित अथवा पिशाच्च बाधित म्हणजे काय ते संक्षिप्त स्वरुपात पाहू कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या तीव्र वासना अतृप्त राहतात जगण्याच्या उत्कट इच्छेमुळे त्या व्यक्तीला मृत्यूनंतर अगतिकता येते असे जे जीव असतात ते पिशाच्च योनीत वावरतात जीवाने धारण केलेला जड देह मृत्यूनंतर जरी नष्ट होत असला तरी जड देहात अर्करुपाने मुरलेली वासना आंतरसालीप्रमाणे मनोमय देहाला चिकटलेली राहते तेच पिशाच्च ते अनेकदा स्वभाव भेदानुसार प्रेतात्मा भूत कुष्मांड हडख खवीस वीरसमंध चकवा देवचार लावसट वेताळ आदि प्रकारे असते ते सूक्ष्म स्वरुपात असल्याने डोळ्यांना दिसत नाही परंतु त्यांच्या टोकाच्या वेडसर अनियमित वर्तनातून त्याची पिशाच्चवृत्ती अथवा समंध बाधितपणा जाणवतो इतरांना त्रस्त करतो या कथेतील ब्राम्हण समंध पीडीत आहे त्याच्यातील पिशाच्च वा समंध नेहमी वेडेचाळे करी लोकांच्या अंगावर थुंकणे शिव्या देणे इ.त्या समंधाने त्या ब्राम्हणाच्या शरीराचा मनाचा ताबा घेतला होता समंध त्या ब्राम्हणास त्रासावित होता श्री स्वामी समंधाचे चाललेले चाळे पाहत होते पण त्या समंधाला श्री स्वामींचे दर्शन नको होते त्यास श्री स्वामींचे ते अति तेजस्वी रुप पाहवत नसे त्यांना पाहताच तो डोळे मिटून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असे पळून जाताना दोघा चौघांनाही तो आवरत नसे त्याला श्री स्वामींची आरतीही ऐकवत नसे म्हणून तो कानात बोटे घालीत असे नाचत व लोळत असे किंचाळत असे भेसूरपणे ओरडत असे अभद्र रडत असे त्या समंधबाधित ब्राम्हणाच्या या कृतीने लोक घाबरून जात श्री स्वामी त्याची ही थेंर पाहत असत पण श्री स्वामींपुढे त्याची थेंर कशी चालतील हा कथा भाग बारकाईने वाचल्यास एक गोष्ट स्पष्ट लक्षात येते की श्री स्वामींनी त्या समंधपीडित ब्राह्यणाकडून त्याच्या पत्नींसह प्रदक्षिणा आरती दर्शन आदि सेवा करुन घेण्याच्या निमित्ताने त्याला सतत आपल्या सहवासात ठेवले होते त्याला नेमके हेच नको होते म्हणून तो श्री स्वामींसमोर आला की वर उल्लेखिलेले वेडेचाळे करायचा हा समंध त्या बाईच्या पतीमध्ये का ठाण मांडून बसला हा समंध जिवंतपणी मनुष्यरुपात असताना त्याच्याकडून त्या बाईच्या पतीने दोन हजार रुपये घेतले होते त्याने ते पैसे खाऊन संपवले त्यामुळे तो पैसे परत करु शकला नाही त्याची ऐपतच नव्हती त्या काळातले दोन हजार रुपये बुडीत झाल्याचे पाहून त्या मनुष्याचा संताप अनावर झाला त्या क्रोधाच्या भरात त्या ब्राम्हणास शिव्या शाप तळतळाट करीत त्याने आत्महत्या केली अतृप्त इच्छेमुळे तो समंध होऊन त्या ब्राम्हणास छळू लागला विज्ञानाच्या आहारी गेलेल्या अनेकांना भूत पिशाच्च समंधबाधा आदि थोताड कल्पितकथा वाटतात पण ते खरे नाही क्षणभर खरे समजले तरी व्यवहार म्हणून इतरांचे घेतलेले पैसे अथवा मौल्यवान गोष्टी अथवा हडप केलेली मालमत्ता जमीन जुमला ही कृत्ये योग्य असतात का ज्याचे हिरावले गेले आहे तो हिरावणार्यास शिव्या शाप तळतळाट देणारच हिरावल्या गेलेल्याच्या ह्या भावनाच हिरावणार्याच्या आयुष्यात कधीना कधी वरीलप्रमाणे समंधाच्या रुपाने थैमान घालतात म्हणून लुबाडणूक करणाऱ्यांना लुबाडणूक झालेल्यांच्या शिव्या शाप तळतळाट भोगावे लागतात केव्हा केव्हा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष त्यांच्याशी सामना करावाच लागतो म्हणून जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी हेच अंतिमतःसर्व सुखाचे मूळ आहे हा यातला बोध आहे श्री स्वामींनी मोठमोठ्याने किंकाळ्या फोडणार्या समंधबाधित ब्राम्हणास विचारले क्यों रोता है त्यावर समंध म्हणाला महाराज याने माझे दोन हजार रुपये बुडविले मी कृपण असल्याकारणाने आत्महत्या करुन घेतली त्या योगाने मी पिशाच्च झालो माझे रुपये बुडविले नसते अशी दशा मला का प्राप्त झाली असती म्हणून महाराजांनी माझा अव्हेर न करता यथार्थ न्याय करावा याने माझे रुपये देऊन माझी क्रिया करावी म्हणजे मी जाईन हे लीलेत आलेले समंधाचे मनोगत विचार करावयास लावणारे आहे त्यामुळेच जीवनात लांडी लबाडी फसवा फसवी विश्वासघात त्यासाठी कटकारस्थाने यास अजिबात स्थान नसावे ही कृत्ये करीत असता क्षणिक आनंद वाटतो परंतु केलेल्या त्या कृत्याचे समाधानही वाटते परंतु अंतिमतः त्यातून दुःखाचीच निर्मिती होते हाच इथला अर्थबोध आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या