अक्कलकोटात सावकार विहिरी समोरील एका तलावाकाठी एक ब्राम्हण स्त्री कपडे धूत होती पाणी आणण्याची घागरही तिने जवळच ठेवली होती त्याच रस्त्याने जाणाऱ्या श्री स्वामी समर्थांनी ती घागर हळूच पाण्यात सोडून दिली आणि ते पुढे जाऊन बसले कपडे धुऊन झाल्यावर ती स्त्री घागर पाहू लागली तर ती तिला कोठेही दिसेना तेव्हा ती घाबरून मोठ मोठ्याने रडून म्हणू लागली की आता घरी गेल्यावर मार बसणार काय करु पोहणार्यास बोलवून घागर पाहण्यास सांगितली त्याने सर्व तलाव शोधून पाहिला पण घागर मिळाली नाही गलबला सुरू झाला इकडे समर्थ पोट धरधरुन हसत म्हणाले काय ग आमच्यावर आळ आणतेस तुझ्या पायाजवळ घागर असून थोतांड करुन लोकांस रडून दाखवितेस काय बाई पायाजवळ पाहते खरेच घागर तेथेच होती.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ 

भगवान श्रीकृष्ण लीलेत वर्णन केलेल्या श्री स्वामी समर्थ खोंड्यासारख्या गवळणीच्या अशाच खोड्या काढायचे श्री स्वामीसुद्धा अनेकदा म्हणायचे मीच कृष्ण होतो बरं त्यांच्या वचनाची येथे आठवण येते परंतु या लीलेच्या खोलात शिरुन त्यातील मथितार्थाचे माखन शोधून काढूया पूर्वीच्या काळी बाया बापड्या पोरी बाळी यांच्या डोक्यावरील पाण्याने भरलेली घागर हे ओझ्याचे प्रतीक असे पूर्वी या सासुरवाशिणी त्यांच्या सुख दुःखाच्या गोष्टी पाणवठ्यावर नदी तळी तलाव विहिरीवर बोलत असत या लीलेत असलेली बाई ही घर प्रपंचात बुडालेली आहे त्यात असलेल्या काळज्या कर्तव्य कर्मे यांनी ती वेढलेली आहे या लीलेतील तलाव म्हणजे समग्र प्रापंचिकाच्या आसक्तीचे जीवन आहे प्रपंचात गुरफटलेल्या त्या स्त्रीचे तिच्या पायाजवळ विषय विकाराची घागर ठेवलेली आहे धुणे म्हणजे संसारातील सर्व विषय बोलून झाल्यानंतर आसक्तीचेच पाणी त्या घागरीत भरुन घेऊन जायचे थोडक्यात म्हणजे सर्व सामान्यांचा आसक्तीने माखलेला भिनलेला हा नित्याचा संसार प्रपंच आहे त्या स्त्रीची घागर ज्याप्रमाणे श्री स्वामींनी पाण्यात सोडून दिली आणि तिला शोधायला भाग पाडले त्याप्रमाणे देव अनेकदा प्रपंचात बुडालेल्या आपल्या सारख्याची परीक्षा घेतो आपल्या विषय विकाराची घागर लपवितो विषय विकाराची पूर्ती होत नसल्यावर आपण कावरे बावरे अस्वस्थ होतो आपल्या मनास की जे मन पट्टीचे पोहणारे असते त्याच्याही हातास ही विषय विकाराची घागर लागत नाही मिळत नाही जर प्रापंचिकांमध्ये प्रपंचाचीच आसक्ती विषय विकार आणि विषयसुख हेच जीवन ध्येय असेल त्याचाच जर फार पगडा असेल तर तो देव तरी काय करील तो खुशाल प्रपंच करु देतो त्यात आकंठ बुडू देतो त्यासाठी राग लोभ मोह मद मत्सर माया या षडरिपूंनी ग्रस्त होऊ देतो याचा अर्थ प्रपंच करुच नका असा नाही तो सारासार विवेकाने आणि भान ठेवून सावधतेने करा एवढीच परमेश्वराची अपेक्षा असते या लीला कथेचा सारांश रुपात बोध इतकाच की प्रपंचात गुंतून पडणारे जीव त्यातच फार गुंतून पडतात अडकतात आत्मकेंद्रित होतात त्यांना कशाचे म्हणून भान राहत नाही विषय विकाराची घागर जपण्याचाच ती भरण्याचाच ते आटोकाट प्रयत्न करतात ती घागर क्षणभर जरी नजरेआड झाली तरी ते अस्वस्थ होतात हाय रे देवा हायरे दैवा ए माझ्या कर्मा असे म्हणत देवाला स्वतःच्या दैवाला दोष देतात त्याबाबत श्री स्वामींनी काढलेले उदगार काय ग आमच्यावर आळ आणतेस तुझ्या पायाजवळ घागर असून थोतांड करुन लोकास रडून दाखवितेस आपणच संसार व षडरिपूग्रस्त असताना त्यातून बाहेर येण्याची इच्छा नसताना देवावर उगाचच दोषारोप करण्यात काय अर्थ विषय विकारातून मुक्त व्हायचे किंवा नाही हे आपणच ठरवायचे आहे त्यातून मुक्त होण्यासाठी श्री स्वामी समर्थ उपासना हा एक चांगला मार्ग आहे.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?



लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १



सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या