बाबासाहेब जाधव चार पाच स्वामीनिष्ठ भाविक सेवेकर्यांसह श्री समर्थ बागेहाळीहून इडगी गावी आले आणि मारुतीच्या देवळात उतरले त्या गावच्या रावण्णा वाण्यास शेत नांगरताना सर्पदंश झाला त्याला कांबळ्यात गुंडाळून मारुतीच्या देवळात आणून बसविले विष अंगात भिनून रावण्णा गतप्राण झाला सेवेकर्यातील एकाने बाबासाहेब जाधवाने रावण्णास आराम पडावा म्हणून सहज महाराजांचा जोडा घेऊन रावण्णाच्या डोकीवर नेऊन ठेवला तेवढ्यात निजलेले महाराज एकाएकी खाडकन उठून बसले आणि रागाने संतप्त होऊन हत तुझ्या आईला गध्या गाढवा मुडद्याच्या डोकीवर जोडा कशाला ठेवला असे म्हणून बाबासाहेबास ते शिव्या देऊ लागले त्यांनी रागाने डोक्यावरची टोपी फेकून दिली कफनीही काढून टाकली रागाने लंगोटी फेडून ते दिगंबर झाले महाराजांचा हा रुद्रावतार बघून बाबासाहेब एका कोपऱ्यात लपून उभे होते त्यांनी त्यास जवळ बोलावताच थरथर कापू लागले ये भोसडीच्या ये चोदीच्या या शिव्या ऐकून बाबासाहेब भीत भीत श्री स्वामींजवळ आले भोसडीच्या मुडद्याच्या डोकीवर जोडा ठेवण्यास तुला कोणी सांगितले बाबासाहेबास जवाब देववेना.


अर्थ - भावार्थ - मथितार्थ

बागेहाळीहून श्री स्वामी समर्थ इडगी गावी चार पाच सेवेकर्यांसह आले त्यात बाबासाहेब जाधव हा निष्ठावंत सेवेकरीही होता ते सर्व मारुतीच्या मंदिरात उतरले या लीलेवरुन श्री स्वामी महाराज केव्हा कोठे जातील काय करतील कोठे उतरतील याचा काहीच धरबंध नसायचा ते सोडून कुणासही कल्पना नसायची ब्रह्याभाव बलवान महा अशीच त्यांची सदैव अवस्था असायची त्यामुळेच तर अक्कलकोटहून बागेहाळी तेथून इडगीला तेथेही मारुती मंदिरात सर्पदंश झालेल्या रावण्णास कांबळ्यात गुंडाळून मारुतीच्या देवळात आणून बसविले तोवर त्याच्या अंगात विषभिनून तो मरण पावला त्या दिवशी श्री स्वामी महाराजही उपाशी पोटीच मारुतीच्या देवळात झोपले होते (झोपले कसले) झोपल्यासारखे इतरांस वाटत होते तेव्हा श्री स्वामीस न उठविता त्यांचा जोडा बाबासाहेब जाधवाने श्रद्धेपोटी रावण्णाचे प्राण वाचावेत म्हणून रावण्णाच्या डोक्यावर ठेवला बाबा जाधवाची ही कृती त्याच्या अज्ञानातून घडली होती प्रत्यक्ष परब्रम्ह श्री स्वामींच्या जोड्याचा असा वापर झाला होता बाबासाहेब जाधवाची ही कृती म्हणजे नियतीच्या कामात केलेली लुडबुड म्हणा अथवा ढवळा ढवळ म्हणा अशीच होती म्हणून तर श्री स्वामी संतप्त झाले त्या संतप्त अवस्थेत त्यांनी डोईवरची टोपी अंगातील कफनी आणि कमरेची लंगोटी फेडून ते दिगंबर झाले केवढा रुद्रावतार त्यांनी धारण केला कारण असे एखाद्या मृत व्यक्तीला वाचवणे केव्हाही अनुचितच त्यामुळे त्यांनी बाबासाहेबास शिव्यांची लाखोली वाहिली मुडद्याच्या डोक्यावर जोडा ठेवण्यास कोणी सांगितले असा संतप्त सवाल त्यांनी त्यास केला कारण त्याचे हे कृत्यच मुळी अनुचित होते परंतु श्री स्वामी समर्थ बाबासाहेब जाधवासारख्या आपल्या भक्ताची सेवेकर्यांची अनावधानाने घडलेली कृती कशी फोल जाऊ देतील त्याची तर लाज राखावयास हवीच ना बाबासाहेब जाधवाच्या श्री स्वामींवरील श्रद्धेपोटी घडलेल्या जोडा मुडद्याच्या डोकीवर ठेवण्याच्या कृतीतून मृत रावण्णा जिवंत झाला हे वास्तव होते ह्या लीला कथाभागाला अर्थबोधाचे अनेक पदर आहे उदा बाबासाहेब जाधवाची श्री स्वामी समर्थ निष्ठा त्यांच्या प्रती असलेली सेवा परायणता पण कोणत्याही हेतूने का होईना त्या महत्त्वाच्या प्रसंगी जाधवाने श्री स्वामींच्या परवानगीशिवाय त्यांना न विचारता केलेली कृती अशा प्रसंगी आपण ही कसे वागावे याचा बोध घ्यावा परंतु श्री स्वामींप्रती आपली खरी खुरी आत्मिक निष्ठा असेल तर श्री स्वामी आपल्या हातून घडलेल्या अपराध चुका याबद्दल रागावतीलही पण ते भक्त वत्सल भक्ताभिमानी असल्यामुळे कृपाही करतील सांभाळूनही घेतील याचा अर्थ आपण सतत चुका करायच्या का याचाही अर्थबोध घ्यायचा.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Live ! १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ? २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ? ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ! ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ? ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ? ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?लोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १सर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या